माझ्या मातीचे गायन...

Submitted by जिप्सी on 1 May, 2012 - 01:56

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!!!

महाराष्ट्राची माती गाते, मंगलमय गाणी
इथे जन्मले ज्ञानेश्वर, अन् देहुचा वाणी

मराठमोळी भोळी इथल्या भक्तीची पेठ
ब्रह्म इथे अवघडले येता पायाशी वीट
हरिनामने पावन अवघ्या संतांची वाणी

मेणाहुन मउ मोकळ्या हृदयाची ओल
मन वृंदावन होते येता तुळशीला फूल
फुलापरी कनवाळू इथल्या काट्याची धरणी

जन्म येथला मरण येथले, सामर्थ्याच्या टिळा
डोळ्यामधुनी सुर्य गोंदला, विठु परी सावळा
सोन्याहुन किमती इथल्या शब्द्वांच्या खाणी
महाराष्ट्राची माती गाते मंगलमय गाणी

"नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी" अशी महती कवी यशवंतनी महाराष्ट्राची केली आहे. अगदी भारताची छबी वाट्णारा माझा महाराष्ट्र. १०५ हुतात्म्यांचे बलिदान यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आकाराला येऊ शकला. "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाल" असे अभिमानास्पद उद्गार सेनापती बापट यांनी काढले होते. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. "अमृतातही पैजा जिकंणारी" माझी मराठी. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" जननी आणि जन्मभूमी हि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. याच मातीत जन्माला आलो त्याचा सार्थ अभिमान वाटतो.

वैविध्यतेने नटलेल्या माझ्या महाराष्ट्रात एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मनाला मोहविणारे समुद्रकिनारे, इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांच्या या महाराष्ट्रात जवळपास ३५० गडकिल्ले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने जे हवं ते असलेला असा हा महाराष्ट्र माझा. चला तर आज "महाराष्ट्र दिनाच्या" निमित्ताने माझ्या नजरेतुन पाहुया हि "महाराष्ट्राची लोकधारा"
=======================================================================
=======================================================================

गावातील एक रम्य पहाट. कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते. जागेसरशी कानावर येतात ते जात्यावर दळण दळणार्‍या माउलीच्या ओवीचे स्वर "कोंबडा घाली साद, जग समदं गं झालं जाग,समदं गं झालं जाग, जग समदं गं झालं जाग........". घरच्या माऊलीची दिवसाची सुरूवात सकाळी सकाळी सडा-शिंपण करून, अंगण सारवुन, दारात रांगोळी घालुन होते. तुळशीवृंदावनात दिवा लावताना माऊली गुणगुणते..."तुळस वंदावी वंदावी, संतांची सावली तुळस वंदावी.....". आईची ती कामाची गडबड पाहुन लेकरही गुणगुणतात "अंगणात सडा, सड्यावर रांगोळी, रांगोळीवरती रंग, आमची माऊली कामात दंग, आमची माऊली कामात दंग". काहि वेळाने "दान पावलं...दादा दान पावलं" म्हणत गाव जागवित येतो वासुदेव आणि म्हणतो, "उजुन आलं आभाळ रामाच्या पारी, अन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" घरातुन माऊली येते आणि पसाभर धान्यचं दान वासुदेवाला देते. एव्हाना सारं गावचं जागं झालयं. सकाळची न्याहरी झाल्यावर बळीराजा आपल्या जिवा-शिवाच्या बैलजोडीला घेऊन शेतावर जायला निघतो. पेरणीचे ते दिवस, कामाची लगबग. बळीराजाही आपल्याच मस्तीत गाण गुणगुणतोय, "गेला वळीव निघुन, आला मिरग फिरून, तुर्‍या चालल्या रानात सुरू झालीया पेरण". दुपारी घरधनीला भाकरतुकडा घेऊन घरमालकिण शेतावर निघालीय. तिला बघुन राम्या म्हणतोय, "दिस आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर, तिची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर, पाय भाजत्याती चरचर अन् कशी चालतेया भरभर".

तिथं गावात पारू आणि शंकर यांच्या लग्नाची गड्बड सुरू आहे. एकिकडे मायेची माणसं, बालपणीच्या मैत्रीणी दुरावणार तर दुसरीकडे नवीन आयुष्याचे स्वप्न असे एका डोळ्यात आसु आणि दुसर्‍या डोळ्यात हासु घेऊन पारु म्हणतेय "उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा". नवर्‍याची वरात वेशीपाशी आली आणि सगळ्यांचीच धांदल उडाली. नवर्‍याची वरात वेशीवर अडवून करवल्या नवरदेवाची थट्टा करत विचारतात, "नवरा आला वेशीपाशी, नवर्‍या नवरी कशी नेशी" त्याला उत्तर म्हणुन "देईन येसकर्‍याचा मान, नवरी जिंकुन नेईन, जिंकुन नेईन" असं उत्तर देऊन नवरदेव नवरी घेऊन जातो. रात्री लग्नाच्या जागरण गोंधळाची तयारी सुरू होते. गोंधळीने आई तुळजाभवानी आणि खंडोबाची पूजा मांडलीय. गोंधळी सर्व देवांना गोंधळाला येण्याचं आव्हान करत आहेत, "मोरेश्वर गना...गोंधळा यावे, वाईच्या गणपती...गोंधळा यावे, कोल्हापूरच्या लक्ष्मी, पुण्याची पर्वती, सातारची मंगळाई....गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे, कृष्णा कोयनामाय, तुळजापुरची भवानी, पसरणीच्या भैरीदेवा, नाशिकच्या काळारामा, फलटणच्या रामा तुम्ही गोंधळा यावे, म्हसवड सिद्धा, रत्नागिरी जोतिबा, कवठ्याची यमाबाई, जुन्नरची शिवाबाई, सातिसमिंदरा, नवलाख तारांगणा अन् राहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा, तेहतीस कोटी देवा गोंधळा यावे...." अंबाबाईच्या नावाने गोंधुळ मांडला न देवा गोंधळाला यावे. आम्ही गोंधळी हो आंबेचे गोंधळी....उदे...उदे...उदे!! "येळकोट येळकोट जय मल्हार" "अंबाबाईच्या नावाने उदे उदे" च्या जयघोषात जागरण गोंधळ चालु असतो.

एकिकडे लग्नाची घाई तर दुसरीकडे शिर्प्याला दुसर्‍या गावच्या जत्रंला जायची घाई. "कांदा न भाकरी खाऊ द्या कि रं मला बी जत्रंला येऊ द्या कि रं" म्हणत तो जाण्यार्‍याला विनवतोय. एकदाचा शिर्प्या जत्रंत पोहचतो आणि थेट जातो तो जेजुरकराच्या तमाशाच्या फडात. सुरुवातीला गण, गौळण, बतावणी झाल्यावर थाप पडते ती ढोलकीवर आणि गाणं ऐकु येतं आणि खेळ रंगतो तो लावणीचा....."अशी गाडी आणावी बुरख्याची, बुरख्याची दोन चाकी".

इकडे गावात बळीराजा दिवसभर काम करून थकुन संध्याकाळी आपल्या लाडक्या जिवाशिवाच्या बैलजोडीला घेऊन घरी परततो. घडीभर विसावा घेऊन जातो ते लाडक्या विठुरायच्या भेटीला गावच्या देवळात. रात्र रंगते टाळ, चिपळ्या आणि तंबोर्‍याच्या तालात आणि कानावर येतं "विठु माऊली तु माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठ्लाची...". अभंगाच्या सुरात रंगुन बळीराजा घरी परततो. अर्धागिनीच्या हातातली चटणीभाकर खाऊन सुखाने झोपतो.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१

=======================================================================
लोकसंगीतातला — महाराष्ट्र माझा
=======================================================================
जेजुरीच्या खंडेराया जागराला या
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

=======================================================================
सणांचा/उत्सवाचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

=======================================================================
गडकोटांचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================

भगवा झेंडा घेतला हाती, मावळे आम्ही शिवबाचे
ध्यास घेतला गडकोटांचा, वेड आम्हाला इतिहासाचे

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

=======================================================================
पर्यटन क्षेत्रातील राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
राजधानी मुंबई
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
तिर्थक्षेत्र
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
धबधबे
सह्याद्रीच्या कडेकपारी खेळे, शुभ्र जलांचे निर्झर
माझ्या मातीचा गुण ऐसा, फोडी दगडालाही पाझर

प्रचि २८

प्रचि २९
समुद्रकिनारे
प्रचि ३०

प्रचि ३१
लेणी
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

=======================================================================
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

=======================================================================
निसर्ग सौंदर्य महाराष्ट्राचे
=======================================================================
प्रचि ३९

प्रचि ४०
तटी: अशा या "महा"राष्ट्राची व्याप्ती खुप मोठी आहे जी या एका भागात मांडता येणार नाही. सदर मालिकेत मी जास्तीत जास्त महाराष्ट्राचे प्रचि दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जास्त प्रचि असल्याने आणि यातील बरेचसे माझ्या इतर भागात प्रदर्शित झाल्याने कोलाज स्वरूपात प्रदर्शित करत आहे. आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला नक्कीच आवडेल. Happy
==============================================================================================================================================

गुलमोहर: 

अफलातुन!!!
मला तुझा हेवा वाटतो यार. नाही, मी फोटोंबद्दल नाही बोलतये. तु ज्या थीम शोधुन काढ्तोस त्या बद्दल बोलतोय मी. मस्त असतात सगळ्याच थीम्स. Happy

जिप्सी.. काय सुप्पर्ब थीम्स करत असतोस .. __/\__
डोळ्याचं पारणं फिटलं!!!
तुझ्या डोक्यात नक्कीच दुसरी थीम झाली असेलच तयार.. वाट पाहतोय!!

"नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी" अशी महती कवी यशवंतनी महाराष्ट्राची केली आहे. अगदी भारताची छबी वाट्णारा माझा महाराष्ट्र.>> अप्रतिम!

महाराष्ट्र म्हणजे काय??? हे अत्यंत नेटके मांडले आहे....... खूप खूप आवडली ही संकल्पना आणि फोटो दोन्ही Happy

बरेच फोटो स्लो ईंटरनेट मुळे दिसत नाहियेत पण खात्री आहे सर्व जबरा असणार आहे.. Happy सुरुवात लै झ्याक झालिये. Happy आज-उद्या फोटो पाहता नाही आले तर शुक्र्वारी धागा वर काढीनच.. Wink

जिप्सी पुन्हा एकदा रॉक्स... Happy प्रचि ३७,३८ खासम्म खास.. Wink

जिप्सी, फोटुग्राफी करता करता तुझा लेखकूसुद्धा कधी झाला ते तुला तरी माहित आहे का??

किती सुंदर लिहिलेयस... आता फोटू सुंदर म्हणावे की लिखाण सुंदर म्हणावे हा संभ्रम पडलाय... मला तर हल्ली तुझ्या धाग्यावर प्रतिक्रियाही द्यावीशी वाटत नाही, नक्की किती गोष्टींना सुंदर म्हणावे हा प्रश्न पडतो Happy

तुझे खादाडीचे फोटो बघत असताना अचानक एकदम खमंग वास नाकाला जाणवु लागला. तुझ्या फोटोंनी ही किमयाही आता केली की काय असे वाटत होते इतक्यात लेकीने 'हा खमंग वास समोरच्या घरातल्या किचनमधुन येतोय' ही जाणीव करुन दिली. पण तरीही फोटोंमधुनही खमंग वास पोचलाच माझ्या नाकापर्यंत....

वा मस्तच! महाराष्ट्र दिना निमीत्य आखलेली ही कल्पना, त्याची केलेली मांडणी अगदी अप्रतिम झाली आहे. फोटो,लेख सर्वच छान झालेत. लेख वाचताना गाव डोळ्यासमोर उभा राहतो...त्यातील गाणी अगदी चपखलतेने बसवली गेली आहेत. त्यामाग तुम्ही किती मेहनत घेतली हे ही जाणवते.

अप्रतीम प्रची माझ्या महाराष्ट्राचे ! लेखण अगदी मनाला भावणारं , जीप्सी धन्यवाद अन तु लय भारीच भौ ! Happy

Pages