Submitted by आक्या on 28 April, 2012 - 11:16
मी 1 वर्षापूर्वी मी 1/2 गुंठयात घर बांधले आहे. खूप वेळेनंतर माला घरात लाइट आणि पाणी कनेक्शन मिळाले पण मला घराची नोंद ग्रामपंचायतीत करायची आहे काय प्रोसेस करावी लागेल ?
मी चौकशीत आहे पण ते लोक म्हणत आहेत की सध्या आम्ही नवीन घराची नोंद करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागेल . पण मला बाहेरून असे कळत आहे की त्याची काही गरज नाहीये
प्लीज , प्लिज मला योग्य मार्गदर्शन करावे ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
SWAPNIL
SWAPNIL
घर नंबर नसतानाही MSEB कनेक्शन
घर नंबर नसतानाही MSEB कनेक्शन आणि ग्रामपंचायत कडून नळ कनेक्शन मिळाले आहे ... अशी केस आहे का ?
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन चालु
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन चालु केले आहे असे लोक सत्तेत वाचले. जिल्ह्याच्या गावी जाउन रजिस्टर करुन मग ग्रामपंचायतीत कॉपी द्यायची अशी काही तरी प्रोसीजर असेल. कारण डाटा जिल्हा लेव्हल वर मेंटॅन होत असेल.
सर्वात प्रथम घर बाधलेल्या
सर्वात प्रथम घर बाधलेल्या जमिनीच्या तुकड्याची नोंद काय आहे? मालकी कुणाची? अगोदर तिथे घर होतं का? त्याचा नंबर पुढे चालू ठेवता येतो. आणि जुन्या घराची डागडुजी दाखवली तर काम सोपे झाले असते. मग तिथे पूर्वी विहीर चं पाणी होतं पण आता नळ कनेक्शन दाखवता आले असते.
2012 सालात काढलेला धागा आहे
2012 सालात काढलेला धागा आहे हा..
ऊफ जुना धागा विषय.
ऊफ जुना धागा विषय.
२०१२ चा आहे तर धागाकर्त्याने
२०१२ चा आहे तर धागाकर्त्याने स्वतः लिहावे पुढे काय आणि कसे केले
जागा तुमच्या नावावर असेल.
जागा तुमच्या नावावर असेल.
सिटी सर्व्हे मध्ये नोंद असेल.
प्रॉपर्टी कार्ड वर नाव असेल तर.
जास्त टेन्शन घेवून नका घराची नोंद करायची जबाबदारी आणि गरज ग्राम पंचायतीला आहे.
जो पर्यंत नोंद नाही तोपर्यंत घरपट्टी किंवा बाकी टॅक्स पंचायत तुमच्या कडून वसूल करू शकणार नाहीत.