'काकाक' दुर्लक्ष निषेध कविता !!!!

Submitted by नानुभाऊ on 28 April, 2012 - 06:06

नमस्कार!

गेल्या काहि दिवसात 'काकाक' कडे झालेल्या दुर्लक्ष वजा अन्यायाचा तीव्रं निषेध नोंदवून हि 'काकाक' पोस्ट्त आहे! Proud

व्रुत्त नसेल, पण 'व्रुत्ती' पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे Happy

चुभुद्याघ्या! धन्यवाद! Happy

===================================================================

लहान तोंडी घेई 'नानु' मोठा-मोठा घास म्हणे !
काल मनाला झाला माझ्या थोडा-थोडा त्रास म्हणे!

'माबो'लीवर काय लिहावे ? कुठे लिहावे ? कळेच ना!
'काकाक'च मग उरला आता एकच माझा ध्यास म्हणे!

जमतच नाही मजला तुमचे ' लगा लगागा लगा लगा'
'लगा लगागा लगा लगागा, असे फक्त बकवास म्हणे!

सात-वीस ची लोकल आली घेऊन सोबत गर्दीला
चढण्या आधी घेउन ठेवा जगण्या पुरते श्वास म्हणे!

तीने लावले जुनेच अत्तर, सुगंध पसरे किती अहा!
हजार स्प्रे मी मारुन थकलो, येतो थुकरट वास म्हणे!

"लव यु" ऐसे 'ता.क.' लिहुनी प्रेम पत्र मी संपवीले
उत्तर- "अय्या! मलाहि खुपच आवडते रे छास!" म्हणे!

आज-कालचा पोरी फारच लबाड, तुम्ही सावध व्हा!
जो-जो करेल खर्च तयाला "आहेस माझा खास" म्हणे!

कितीही सुंदर हार घालुदे वधु-वर एका मेकांना
नंतर त्यांचा, कुणास ठाऊक कैसा होतो फास म्हणे!

किती लिहावे उगाच 'नानु' कंटाळा आला आता
हात लिहूनी थकले आणि मनहि "आता बास!" म्हणे!

=================================================================

- नानुभाऊ

शब्दखुणा: 

अप्रतिम विनोदी गझल आहे.

माबोलीवर किती त्या गजला वृत्तच नुसते पेलायला
नानुने काकाक लिहीली, अवि तिजला झकास म्हणे!

Pages