ही मृण्मयी ची पाककृती आहे. मी फक्त माझ्या विचारपुशीतून इथे आणतेय.
खस्ताम्हणजे पापुद्रे सुटलेलं. तेव्हा कचोरीला छान पापुद्रे सुटले पाहीजेत. फारतेलकट लागु नये म्हणून कचोरी-चाट केली तर जास्त छान लागते. एक पोटभरीचापदार्थ होतो.
पावणे दोन वाट्या मैदा
पाव वाटी कॉर्न फ्लावर
एक चमचा बारिक रवा
एक चमचा मीठ
पाव चमचा इनो फ्रुट सॉल्ट
पाव स्टिक बटर वितळवून
एक कप गरम पाणी
आतलं सारण :
१ कप पिवळी मूग डाळ
२ मोठे चमचे बेसन
जिरं
मीठ
तिखट
आमचूर पावडर
चमचाभर साखर
१ चमचा आलं-मिरची पेस्ट
चमचाभर बडीशेप पावडर
चमचाभर गरम मसाला
एक चमचा धणेपावडर
३ मोठे चमचे तेल.
गरम पाण्यात मीठ, इनो, बटर घालून एकत्र केलेलं कॉर्न फ्लावर आणि मैदा घट्टभिजवून घ्यायचा. गोळा फुलक्यांच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट भिजवायचा.त्याव्हे १०-१२ गोळे करून ओल्या कपड्यात गुंडाळून घट्ट डब्यात बंद करूनअर्धा तास तरी मुरु द्यायचे.
मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि निथळायची. फोडणीत तेल घालून जीरं,हिंग,मूगडाळ घालून परतायचं (पाणी निघून जायला हवं). आलं मिरची पेस्ट घालूनपरतायचं. बाकी पावडरी घालून झाकण ठेवून न जळू देता ४-५ मिनिटं वाफवायचं.रुम टेंप ला थंडं करून फूड प्रोसेस्रमधून जितपत बारिक होईल तितपट (पाणी नघालता) वाटूण घ्यायचं. बारा भागात डिवाइड करायचं.
हे सारण मोदकाप्रमाणे वरच्या पारित (कव्हरमधे) भरून हलक्या हातानीलाटायचं. सगळ्या कचोर्या लाटून फ्रिजमधे तासभर ठेवून मग गरम तेलात खरपूसतळायच्या. सारण लाटाताना बाहेर यायला नको. तळण्याआधी प्रत्येक कचोरीलाबोटाने मध्यभागी हलकं दाबून तो भाग आधी वर घेऊन तळायचं.
खायला देताना गार दह्यात चाट मसाला-तिखट मीठ साखर घालून फेटायचं. हेदही कचोरीवर घालून त्यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेवघालून द्यायचं.
सौजन्य : मैत्रिणीची आई. (मारवाडी पध्दत).
मी पण काल केल्या. कचोरी चाट
मी पण काल केल्या. कचोरी चाट एकदम हिट झाली होती. धन्स रेसिपीसाठी.
बेक्ड कचोरीची पण रेसिपी होती
बेक्ड कचोरीची पण रेसिपी होती इथेच कुठेतरी... शोधायला पाहिजे.
बेक्ड खस्ता कचोरी - लॉ कॅलरी
बेक्ड खस्ता कचोरी - लॉ कॅलरी खस्ता कचोरी
बेक्ड कचोरीची रेसिपी
बेक्ड कचोरीची रेसिपी सार्वजनिक नाही आहे....
just FYI.....
वेका ती कृती बघण्यासाठी
वेका ती कृती बघण्यासाठी आहारशास्त्र ग्रूप्मध्ये सामील व्हा. सोप्पय ते. या पानाच्या उजव्या बाजूला वर "सामील व्हा" पर्याय आहे तो वापरा.
धन्यवाद, नक्की करून बघणार
धन्यवाद, नक्की करून बघणार
ओके झाले सामील रुनी
ओके झाले सामील रुनी ...आभार्स ..:)
पण आता वाचनमात्र (माझ्यासारख्या) लोकांना ही पाकॄ दिसायला हरकत नाही म्हणुन लिहिलं होत ते वरती ..:)
कॉर्न फ्लावर आणि कॉर्न
कॉर्न फ्लावर आणि कॉर्न स्टार्च मधे काय फरक आहे? येथे कॉर्न फ्लावरच वापरायचे आहे ना?
(No subject)
Kal hya recipene kelya kachorya. Masta jhalya hotya. Pan as someone said above hya pramanat saran khupch hota. Ajun ek batch karata yeil itaka Saran urala ahe.
साहित्यात बेसन आहे, कृतीमध्ये
साहित्यात बेसन आहे, कृतीमध्ये ते कधी आणि कसं वापरलं कळलं नाही. कळलं तर मी पण प्रयत्न करते कचोरी बनवायचा.
मिनी, कचोऱ्या जबरदस्त
मिनी, कचोऱ्या जबरदस्त दिसतायंत!! एकदम तोंपासू!!
करना पडेगा एक बार!!
मी बनवून पाहिल्या.. छान
मी बनवून पाहिल्या.. छान फुगतात कचोर्या..
फक्त eno ऎवजी चिमूटभर baking soda वापरला..
मला सांगा कुणीतर बेसन कधी
मला सांगा कुणीतर बेसन कधी घालायचं सारणात???![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला सांगा कुणीतर बेसन कधी
मला सांगा कुणीतर बेसन कधी घालायचं सारणात??? Sad
Submitted by पवनपरी11 on 25 October, 2017 - 11:41>>>>>>> mi fodnit jira hing mugdal ghaltanach besan ghatle..
Thanks jui
Thanks jui![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद राय करुन बघ. मस्त
धन्यवाद राय
करुन बघ. मस्त होतात कचोर्या.
मला सांगा कुणीतर बेसन कधी
मला सांगा कुणीतर बेसन कधी घालायचं सारणात??? Sad
Submitted by पवनपरी11 on 25 October, 2017 - 11:41>>>>>>> mi fodnit jira hing mugdal ghaltanach besan ghatle.. >> मी पण.
(No subject)
फोटो जरा घाईतच काढला..
बाकी पावडरी घालून झाकण ठेवून
बाकी पावडरी घालून झाकण ठेवून न जळू देता ४-५ मिनिटं वाफवायचं.>>> बहुधा या स्टेजला घालायच असाव
Pages