Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2012 - 06:27
बोल सोना लवकर बोल.....
माऊ करते म्यॉव म्यॉव
चिऊ करते चिव चिव
काव काव करतो काऊ
भू भू करुन दाखव पाहू
हम्मा हम्मा करतं कोण
में में में में करतं कोण
कुकुचकू करतं कोण
सोंड मोठी हलवी कोण
टॉक टॉक करतं कोण
डरॉव डरॉव करतं कोण
ढुम ढुम ढुमाक वाजतो ढोल
बोल सोना लवकर बोल.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
वा... सुंदर.
वा... सुंदर.
शगले म्हंतात देइन खाऊ गाणे
शगले म्हंतात देइन खाऊ
गाणे म्हणून दाखव पाहू
पाहुणे काका येतात घरी
कविता म्हणून दाखव पाहू
खेळायचे अशते खुप आमाला
तरीही सोडवत नाही खाऊ
गाणे म्हणते मीच एकटी
दादाला मग का मिळतो खाऊ?
विशाल आणि शशांक सुंदर
विशाल आणि शशांक
सुंदर
अरे विशाल - काय उत्स्फुर्त
अरे विशाल - काय उत्स्फुर्त आणि गोऽऽ..ड कविता केलीस ही.....
फारच उशीरा पहातोय का मी ??? क्षमस्व.
पण मस्तच जमलीये... क्यूट..