रबडी साठी---
१ १/२ लिटर दुध.
पाव वाटी साखर.
१/८ चमचा जायफळ पुड..
दुधमसाला १/२ चमचा..
पुरीसाठी-
२ वाट्या कणिक.
पाव चमचा मीठ.
अर्धा चमचा मोहनासाठी तेल.
पुर्या तळण्यासाठी तेल.
मोठी जाड बुडाची कढई/मोठे पॅन घ्या .
त्यात दुध ओतुन ते तीव्र आचेवर उकळुन घ्यावे..झार्याने सतत ढवळत रहावे ..
एकदा छान उकळले कि गॅस ची आच अगदी कमी करावी व झारा कढईतच ठेवावा.
आता दर ५-१० मिनिटानी दुधावर आलेली साय कढईतच एका बाजुला सरकवुन ठेवावी व दुध कढईच्या तळापासुन ढवळावे म्हणजे तळाला लागणार नाही..[दुध करपणार नाही]
दुधावर आलेली साय अशीच प्रत्येक वेळा एका कडेला सरकवायची..
एकुण दुधाच्या साधारण निम्मे दुध झाले कि दुध घट्ट होईल्,दुधाला पिवळसर रं ग आलेला दिसेल आता त्यात जायफळ पुड,दुधमसाला आणि पाव वाटी साखर घालावी व पुन्हा साखर विरघळे पर्यंत सतत ढवळत रहावे.आता रबडी तयार झाली .ती एका बाऊल मधे काढुन थंड झाली कि फ्रिज मधे ठेवावी ..२ ते ३ तासानंतर मस्त्,घट्ट ,थंडगार "लच्छेदार" 'रबडी तयार होते.हा फ्रिज मधे ठेवण्याचा वेळ मोजलेला नाही.फ्रिज मधुन बाहेर काढल्यावर जर ही रबडी खुपच घट्ट वाटली तर थोडेसे दुध घालता येते.
पण रबडी घट्टच खातात.
नेहमीप्रमाणे पुर्या करायच्या आहेत.
कढई/पॅन चा बेस जाड हवा .जर नसेल तर एकदा दुध उकळल्यावर खाली तवा ठेवुन त्यावर कढई/पॅन ठेवावे.
दुधातले पाण्याचे प्रमाण कमी होईपर्यंतच सतत ढवळावे लागते,लक्ष द्यावे लागते..त्यानंतर मंद आचेवर होत रहाते तेव्हा दुसरे काम करता -करता रबडी वर ची साय बाजुला सरकवता येते
घट्ट झालेल्या दुधात गोडपणा नैसर्गिक्च येतो त्यामुळे गोड कमी हवे असल्यास साखर पाव वाटीपेक्षा थोडीशी कमी घालावी..वाटल्यास वरुन पिठी साखर घालता येते..
रबडी घरी केलेली असली तर खात्रीलायक असल्याने बिनधास्त खाता येते.
सुरवातीला आटापिटा वाटला तरी १-२ वेळा करुन पाहिली तर त्यातला सोपेपणा कळतो.
मुख्य म्हणजे विकतच्या रबडी/बासुंदी सारख्या दुधाच्या पदार्थांची खात्री नसते.
यात लहान लहान रसगुल्ले थोडेसे पिळुन टाकावे .तसेच द्राक्ष घातल्यास अंगुर रबडी तयार होते.
एकदा रबडी तयार झाली कि रुम्-टेंप्रेचरला आणुन ती झाकुन फ्रिज मधेच ठेवायची आहे.
गरम जिलेबी आणि रबडी हे
गरम जिलेबी आणि रबडी हे कॉम्बोही फार यम्मी लागते. विशेषतः हिवाळ्यात.
रबडी करून बघणार नक्की.
व्वा तों पा सु...
व्वा तों पा सु...
गरम जिलेबी आणि रबडी हे
गरम जिलेबी आणि रबडी हे कॉम्बोही फार यम्मी लागते. ...हो प्राची खरेच आहे...
तोंपासु गरम जिलेबी आणि रबडी
तोंपासु
गरम जिलेबी आणि रबडी हे कॉम्बोही फार यम्मी लागते<<< आणि गुलाबजाम/कालाजाम सोबत पण भारीच लागते.... रबडी मालपुवा म्हणजे डाएट करणार्यांसाठी न्युक्लीयर मिसाईल
रबडी/बासुंदी/आटवलेले मसाला दूध मी स्लो कुकर मधे करते. पातेल्यात दुध गरम करायचे... एक उकळी आली की दुध स्लो कुकरात ट्रान्स्फर करायचे.... आणि मधुनच एखाद वेळा ढवळायचे... खाली लागत नाही... सारखे लक्ष ठेवावे लागत नाही... दुसरे पदार्थ करायला गॅस च्या शेगड्या मोकळ्या रहातात - स्पेशली सणासुदीला जेव्हा इतर बरेच पदार्थ बनवायचे असतात तेव्हा... सुंदर बासुंदी/रबडी बनते....शिवाय नंतर पातेले घासायचे कष्टही कमी पडतात कारण स्लो कुकरच्या भांड्याला खाली, बाजुला आटलेले, करपलेले दुध्/खरपुड्या रहात नाहीत...
कसली भारी दिसतेय रबडी!
कसली भारी दिसतेय रबडी!
अगदीअगदी लाजो. वाचूनच किलोभर
अगदीअगदी लाजो. वाचूनच किलोभर वजन वाढलं माझं
कसली भारी दिसतेय रबडी!! एकदम
कसली भारी दिसतेय रबडी!! एकदम तोंपासू!!
मस्त तोंपासु.... मावे मध्ये
मस्त तोंपासु.... मावे मध्ये नाही का करता येणार? करुन पाहिली पाहिजे. कोणाला माहित असेल तर सांगाना मावेत कशी करायची !!!!
फोटो खुप मस्त.....
मी मिल्कमेड ची करते जास्त लोक येणार असतिल तर. ती पण छान होते. त्यात तर साखर घालायची गरजच नाही. मस्त स्वाद येतो. घट्ट पण होते लौकर.
मोमी ,एकदा दुध उकळले कि
मोमी ,एकदा दुध उकळले कि त्यातले पाणी आळते मग ते मावेत ठेवता येते ना..
एक अजुन, मावेत दुध घट्ट होईल पण घट्ट साय्/लच्छा येणार नाही ना..मावे नविनच घेतला होता तेव्हा हा प्रयोग करुन पाहिला.तसेच गाजरहलवा गाजर परतुन भरपुर दुध घालुन आळायला ठेवला अधुन मधुन ढवळला पण शेवट काय तर किसलेले गाजर मुळ सुंदर रंग जाऊन काळे पडले ,दुधाचा मावा तयार झालाच नाही त्यामुळे त्यात दुध तसेच राहिले--शेवट वाया गेले सर्व..
फोटो मस्त आहे. फुलफॅट दूध
फोटो मस्त आहे. फुलफॅट दूध आणून एकदा अश्या प्रकारे रबडी करायला पाहिजे. ती पुरीबरोबर चांगली लागते की जिलबी/गुलाबजाम/काला जामूनसोबत चांगली लागते हे एकदाचं ठरवता येईल
दीड लिटर दुधाला पाव वाटी साखर म्हणजे अगोड नाही ना होणार?
कारण मी बासुंदीसाठी एक लिटर दुधाला पाऊण वाटी साखर घालते. आणि रबडी बासुंदीपेक्षा जास्त आटवायची ना?
झक्कास.
झक्कास.
मंजुडी, खरे तर जिलबी बरोबर
मंजुडी,
खरे तर जिलबी बरोबर बासुंदी चालेल पण मालपुवा बरोबर रबडी च हवी.असाच प्रघात आहे..
दिड लिटर दुधाला आळल्यावर पाव वाटी साखर पुरते छान गोड होते रबडी..प्रचि त दिलेल्या बाउलभर रबडीला मी पाव वाटीच साखर घातली आहे. साखर दुध आटवल्यावर च घालायची आहे.दुध फुल फॅट चे दिड लिटर घेतले होते. रबडी+ आइसक्रीमचा गोळा ही खातात.
माझी एक सुगरण मैत्रीण दूध
माझी एक सुगरण मैत्रीण दूध आटवताना साय पातेल्याच्या कडेला चिकटवून ठेवते. अशी गोळा झालेली साय नंतर एका निराळ्या भांड्यात काढून घेते, थोडावेळ फ्रीजमधे ठेवून त्या सायीच्या गठ्ठ्याचे सुरीने बारीक बारीक तुकडे करते (भरतासाठी भाजलेलं वांगं जसं आपण चॉप करतो तसं) आणि ती चॉप केलेली साय मग आटवलेल्या रूम टेंपरेचरच्या दुधात मिसळते. अशाने रबडीला दाटपणा येतो, शिवाय ज्यांना साय बिलकुल आवडत नाही (उदा. मी) अशांनाही रबडी खाता येते.
(मी आजतागायत फक्त एकदा आस्वाद घेत रबडी खाल्लेली आहे, जी तिनं केलेली होती.)
ललिता-प्रीति-खरंच सुगरण
ललिता-प्रीति-खरंच सुगरण मैत्रीण आहे ही..खुप खुप पेशन्स ठेवावे लागतात त्यासाठी.हलवायांच्या मोठ्या कढयांवर असे सायीचे गठ्ठे लावलेले दिसतात.
सुलेखा...यम्म!!!!!!!!! बघूनच
सुलेखा...यम्म!!!!!!!!! बघूनच दोनेक किलो वाढल्यासार्खं वाटलं......... पण नो प्रॉब्लेम.. खाणारच करून... स्लर्प!!!!!!!!!!!
मला फार म्हणजे फारच आवडते
मला फार म्हणजे फारच आवडते रबडी! वर्षातुन २-३ वेळा एका वेळी किमान ४-५ लिटर दुधाची २-२.५ लि रबडी करते. मला हा पदार्थ करायला फार आवडते कारण फारसे काही कष्ट नाहीत आणि पब्लिक खुष होते!
लाजो, मी कँपिंगच्या स्टोव्हवर जाड बुडाच्या कढईत दुध आटवायला लावते. ४-५-६ तासात लच्छेदार रबडी तयार होते. पण पुढच्या वेळी स्लो कुकरमध्ये नक्की ट्राय करते!
धन्यवाद काकु!
मस्त फोटो. त्या सायीमुळेच मला
मस्त फोटो. त्या सायीमुळेच मला बासुंदी प्रकरण घशाखाली उतरत नाही. बायदवे, रबडी आणि बासुंदीत काय फरक? फक्त नावाचाच का?
सुलेखा, ललिता, अशी बाजूला काढलेली साय पराठ्यांमध्ये वगैरेही घालता येत असेल ना?
>>रबडी आणि बासुंदीत काय
>>रबडी आणि बासुंदीत काय फरक?>>
बासुंदी आरेच्या दुधाइतकी पातळ असू शकती पण रबडी मात्र घट्टच असायला हवी!
सायो,काहीतरीच काय गं.पराठ्यात
सायो,काहीतरीच काय गं.पराठ्यात साय कां भरायची?
त्यापेक्षा भाजलेला मावा+पिठीसाखर+वेलची पुड घालुन मस्त साटोरीसारखा पराठा छान लागतो ना!!!!
अजुन एक कंदी पेढा भरुन केलेला पराठाही मस्त लागतो.वरुन तुप च हवे तेल नक्को.
बासुंदी म्हणजे आटवलेले दुध..
वर्षु,आमच्याकडे सगळ्यांना फारच आवडते.परवा दुपारी आईने अचानक झोपेतुन उठल्याबरोबर मला रबडी-पुरी खायची आहे असे म्हटले.त्यामुळे खास तिच्यासाठीच केली..एरवी तीची खाण्याबद्दल आवड-निवड कधीच नसते..
अहो सुलेखाताई, माझी पंजाबी
अहो सुलेखाताई, माझी पंजाबी मैत्रिण असा साय घातलेला मऊसूत पराठा घेऊन यायची ब्रेकफास्टला आणि माझ्याबरोबर शेअर करायची. अप्रतिम लागतो.
कोल्हापूरात, माझ्या ताईकडे एक
कोल्हापूरात, माझ्या ताईकडे एक आजोबा कुरुंदवाडहुन घरगुती रबडी घेऊन यायचे, त्यांच्या गोठ्यातल्या म्हशींच्या दुधाची....आज्जींनी बनवलेली.... केव्वळ अ प्र ति म
मला स्वतःला साय आवडत नाही म्हणून ही रबडी मला माझी ताई ब्लेंडरमधे घुसळुन द्यायची .... याला झाली असतिल ५-७ वर्ष... आता ताईनेही घर बदलले आणि चौकशी केली तर ते आजोबाही नाही भेटले परत
ही रबडी इतकी घट्ट आणि रिच असायची पण मिट्ट गोड नाही. एक वाटी जेमतेम एकावेळेस खाता यायची आणि खल्ली की गपागपा डोळेच मिटायला लागायचे इतकी जड अज्जुन चव रेंगाळत्येय जीभेवर
सुलेखाताई, कंदी पेढ्यांच्या पोळ्या जबरी टेस्टी लागतात... आणि हो त्यावर साजुक तूप मसटच्च....
नुसते वाचुन आणि इमॅजिनुन आज २ किलो वजन वाढणार आहे
सुलेखा.. कित्ती गोड.. लहानपणी
सुलेखा.. कित्ती गोड.. लहानपणी आईने तुझे हट्ट पुरवले असतील ना??
मस्त दिस्तीये रबडी..तोंपासु..
लाजो.. आय लव 'साय' !! आज माझं ऑलरेडी २ किलो वजन वाढलं सुद्धा!!!
मस्त !
मस्त !
मस्त आहे फोटो... लाजो, स्लो
मस्त आहे फोटो...
लाजो, स्लो कुकर मधे दूध फाटत नाही का?मी एकदा गाजराचा हलवा करायचा प्रयत्न केला होता..सगळे दूध चोथा पाणी मग रबडी करायची हिंमतच नाही झाली.
स्नेहा, नाही फाटत दुध
स्नेहा, नाही फाटत दुध अजिब्बात. मी नेहमी स्लो कुकरमधेच करते. बासुंदी, रबडी, मसाला दूध सगळं
लाजो, करून बघीन आता...तुझ्या
लाजो, करून बघीन आता...तुझ्या पद्धतीने
रविवारच्या सकाळी अशी छान
रविवारच्या सकाळी अशी छान रबडी-पुरी मिळाली तर ...अहा... तोंपासु
>>रविवारच्या सकाळी अशी छान
>>रविवारच्या सकाळी अशी छान रबडी-पुरी मिळाली तर ...>> तर उरलेला रविवार व्यायाम करण्यात घालवावा लागेल, आहे तयारी?
आजचा बेत असा होता!
आजचा बेत असा होता!
व्वॉव वत्सला... मस्तच गं
व्वॉव वत्सला... मस्तच गं
अक्षय तृतिया म्हणून खास बेत का? मोठा फोटो टाक ना जरा
Pages