उपवासाची अंडी

Submitted by pradyumnasantu on 20 April, 2012 - 23:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन बटाटे, अर्धी वाटी ओले खोबरे, तीन चार टीस्पून साखर किंवा मध, चवीनुसार मीठ, पाव वाटी भिजवलेले साबुदाणे, तळणासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर किसून घ्यावेत. चवीप्रमाणे मीठ घालून मळावे. छोटे छोटे गोळे करून ठेवावेत.
ओल्या खोब-यात मध/साखर घालून ठेवावे (चव).. वेलची आवडत असल्यास घालू शकता.
बटाट्याचे दोन गोळे अर्धगोल करून त्यात चमचाभर चव घालावा.
गोळे अंड्याच्या आकाराचे करून साबुदाण्यात घोळवावे. सर्व बाजूनी साबुदाणे लागले पाहिजेत.
आता ही उपवासाची अंडी तळावीत.
तशीच किंवा चटणीबरोबर मस्त लागतात.

वाढणी/प्रमाण: 
सहा अंडी व्हावीत
अधिक टिपा: 

नाव न आवडल्यास बदलून खाऊ शकता. चव मात्र तीच राहील.

माहितीचा स्रोत: 
कुठेतरी पाहिलेले
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेझिंग !! कल्पना प्रचंड भारी आहे !!
अर्थात माझ्या आजीला दिले तर अंड्याचा आकार आहे म्हणूनसुद्धा ती हात लावणार नाही. Lol
पण खरंच मस्तंय!

कल्पना खरंच खुपच छान आहे.पण उपवासाला खायचे तर नांव मात्र दुसरे हवेच ना!! साबु-बटाटा गोड वडा/पॅटिस..मोती बटाटा गोड वडा असे काहीतरी हवे.

याहूनही एक सोपी कृती आहे-
१] एक कोंबडी पाळावी
२] तिला फक्त उपवासाचे पदार्थ (साबुदाणा, रताळी इ.इ.) खायला द्यावेत.
३] यथावकाश ती जी अंडी घालेल त्यांना 'उपवासाची अंडी' म्हणता येईल.
४] त्याच कोंबडीचे चिकन 'उपवासाचे चिकन' म्हणूनही खाता येते.
संदर्भ- अन्नः कैच्याकै प्राणा:

भारी कल्पना Happy

पण ती साबुदाण्यात घोळलेली अंडी 'पिंपल्स' आलेल्या अंड्यासारखी दिसतिल की...

त्यापेक्षा साबुदाण्याच्या पिठात घोळली तर??? Uhoh जरा स्मुथ तरी दिसतिल....

<<<पण ती साबुदाण्यात घोळलेली अंडी 'पिंपल्स' आलेल्या अंड्यासारखी दिसतिल की.>>>> Happy
उपसाची अंडी..... छान प्रकार आहे.

छे छे,
एकतर बटाता, वरुन साबुदाणा ते ही तळुन........................
आमचे चमन मास्तरांच्या शिकवणीत हे कॅलरी वाढवणार ड्येन्जर कॉम्बिनेशन आहे.
हे मी आता खाणार नाही.
वजन कमी झाल्यानंतर एकदा ट्रायल म्हणुन खाइन. Happy