वाळवणाचे वडे (सांडगे) - १ वाटी (हरभरा डाळी चे, मिक्स्ड डाळींचे, बाजरीचे ई.ई. कुठलेही)
कांदे - २ मोठे, लसूण ८-१० पाकळ्या,
धने - १ टी स्पून, जीरे- अर्धा टी स्पून, ४-५ मीरे, ४-५ लवंगा, २ वेलदोडे, २-४ तमाल्पत्र, दालचीनी १ ईंच तुकडा, ४-५ मेथी दाणे, लाल मिरच्या ३-४, सुक्या खोबर्याचा कीस अर्धी वाटी, गोडे तेल - ३-४ मोठे चमचे, ३-४ वाट्या गरम पाणी, कोथींबीर.
फोडणी चे साहित्य - मोहरी, हींग, हळद ई.
चवीनुसार मीठ
हे या पा कृ त वापरलेले वडे-
थोड्या तेलावर वाळवणाचे वडे परतून घ्यावेत.
कांदे फ्लेम वर भाजून, सोलून, तुकडे करून घ्यावेत. लाल मिरच्या, लसूण लालसर तळून घ्यावेत. धने, जीरे, लवंगा, मीरे, तमलपत्र, दालचीनी, मेथ्या आदि मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर परतून घ्यावेत. कांदे, लसूण आणि सगळे मसाल्याचे पदार्थ मिक्सरमध्ये सरबरीत वाटून घ्यावेत.
कढईत दोन चमचे तेलाची मोहर्या-हींग वापरून फोडणी करून घ्यावी त्यात मस्साल्याचे वाटण, हळद घालून छान परतून घ्यावे. त्यात ३ वाट्या गरम पाणि घालून आमटी ऊकळून घ्यावी. कोथींबीर घालावी. चवीनुसार मीठ घालावे.
सर्व्ह करतांना डीश/ वाटीत आधी थोडे तळलेले वडे घालून त्यावर आमटी घालावी अन फुलके/ पोळी किंवा भाता सह सर्व्ह करावी.
आवडत असल्यास टोमॅटो भाजून, सोलून वाटणात घालावेत.
छान वेगळा प्रकार. वडे पण
छान वेगळा प्रकार. वडे पण वेगळे दिसताहेत !
कसले मस्त दिसतंय ते.. हाय पाय
कसले मस्त दिसतंय ते.. हाय पाय धुवून येतो आणि लगेच जेवायलाच बसतो म्हणतो...
मस्त चमचमीत दिसत आहे ही
मस्त चमचमीत दिसत आहे ही डिश!!!
खान्देश, विशेषतः नाशिक
खान्देश, विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या खान्देश चा भाग, हा कायमच खूप ऊष्ण भाग असतो. साधरणतः फेब्रुवारीतच इकडे उन्हाळा सुरु होतो, तो थेट जुलाई - ऑगस्ट पर्यंत ! या दिवसांत हिरव्या भाज्या दुर्मिळ होतात! त्यामुळे मग रोजच्या जेवणात रोज नवीन काय? हा प्रश्न सोडवण्यासाठी वाळवणे मदतीला येतात.
वर दिलेले 'वडे' (वड्या) घरा घरात मुबलक प्रमाणात साठवलेले असतात! वडे बनवण्यासाठी महाराष्ट्रात सगळ्या प्रांतात बनवण्यासाठी अवलंबली जाणारी कृती इकडे ही वापरली जाते, पण थोडा फरक हा की वडे वाळवायला घालतांना, हाताने तोडुन न घालता, चाळणीत घासत घासत घालतात! एका घरात माणशी १ किलो एवढ्या प्रमाणात वडे घातले जातात!
मित्रांनो, ही पारंपारिक पाककृती गेल्या शेकडो वर्षांपासून घरा घरात बनवली जात आहे, माबो वर बर्याच जणांना माहित असेलही! कृती आवडली असल्यास जरूर करून पहा! धन्स!
पाकृ अपुर्ण
पाकृ अपुर्ण आहे..........................ते वडे कसे करायचे? ते सांगा आधी.........
चातक, असे वडे बाजारात मिळतात
चातक,
असे वडे बाजारात मिळतात ना!
तरी पण हवी असल्यास वडे बनवण्याची कृती लवकरच इतरत्र टाकेन !
मस्त ,चटकदार भाजी. एक
मस्त ,चटकदार भाजी.
एक प्रश्न्,मसाल्याच्या आमटीत हे बारीक वडे घालुन [एक वाफ आणायची नसते का?]शिजवत नाही का? तळलेल्या वड्यांवर आमटी घातली कि लगेच शिजतात का?
छान आहे रेसिपी. माझी आई
छान आहे रेसिपी. माझी आई मूगवड्या करायची अशीच.
हे वडे म्हणजे सांडगे का?
हे वडे म्हणजे सांडगे का?
इथेच द्या साहेब कशाला त्रास
इथेच द्या साहेब कशाला त्रास करुन घेता......पदार्थ कितीही फेमस असला तरी सर्वांनाच रेसिपी माहीत असेल असे होत नाही.
ताट छान दिसतोय म्हणुन हा आग्रह.
सुलेखा, >>> मसाल्याच्या आमटीत
सुलेखा,
>>> मसाल्याच्या आमटीत हे बारीक वडे घालुन [एक वाफ आणायची नसते का?]शिजवत नाही का? तळलेल्या वड्यांवर आमटी घातली कि लगेच शिजतात का?>>>
हे वडे शिजवायला हरकत नाही, पण आमटीत घातल्यावर लवकरच विरघळतात, म्हणून डीश/ वाटीत आधी थोडे तळलेले वडे घालून त्यावर आमटी घालावी...याचा एक फायदा असा की असे वडे मस्त क्रंची क्रंची लागतात.
हाताने तोडून घातलेले वडे (सांडगे) आकाराने मोठे मोठे असतात, ते मात्र आमटीत शिजवूनच घ्यावे लागतात!.
चातक, तुझ्या आग्रहास्तव पण
चातक, तुझ्या आग्रहास्तव पण समस्त मराठी सुगरणींची (आणि 'सुगरां' चीही बरकां) माफी मागून वडयांची कृती देत आहे-
हे वडे मुख्यत्त्वे वाळवणा चा आणि साठवणीचा प्रकार आहे म्हणूनच बनवायला मेहेनत ही जास्त लागते.
ह्या वडयां नाच अनेक जण सांडगे म्हणतात आणि कमीत कमी ५० वेग-वेगळ्या प्रकारांनी बनवले जातात, अगदी ऊपवासा साठी ही बनवले जातात.
आमच्या कडे प्रचलीत पद्धत ----
मूग डाळ - १ वाटी, मठाची (मटकीची) डाळ - १ वाटी, हरभरा डाळ - १/२ वाटी, ऊडिद डाळ १/४ वाटी, चवळीची डाळ १/४ वाटी या प्रमाणात डाळी घेऊन वेग-वेगळ्या भिजत घालाव्यात (८ ते १० तास भिजवा). (अर्थातच सबंध / साबूत कडधान्ये ही वापरता येतील) म्हणजे रात्री आठ वाजता भिजत घातल्यास सकाळी ८ वाजे पर्यंत वाटायला तयार होतात.
भिजवलेल्या सगळ्या डाळी, पाण्यातून ऊपसून मिक्सर वर वेग-वेगळ्या सरबरीत वाटून घ्या.वाटतांनाच त्यात १ टी स्पून जीरे आणि चवीनुसार - आवडीनुसार हिरव्या मिरच्या / लाल मिरच्या वाटून घ्या. (हवं तर लसूणही घाला, आमच्याकडे घालत नाहीत कारण कुळधर्माला चालत नाही!)
मोठ्या ताटात / परातीत वाटलेल्या डाळी- हींग, हळद, मीठ , कोथींबीर सुद्धा घालून चांगल्या एकत्र करून घ्या.
प्लास्टीक पेपर वर/ कापडावर/ ताटांमध्ये लहान लहान वडे घालून कडक ऊन्हात वाळवा!.( किंवा नेहमीपेक्षा थोडी मोठी छिद्रे असलेली चाळणी वापरून प्लास्टीक पेपर वर विरळ पसरून घालतात - जास्त क्वांटिटी असेल तर चाळणीने घालतात).
वडे ३ - ४ दिवस खडखडीत वाळल्या नंतर हवाबंद डब्यांमध्ये साठवा!
वाळवायला घालायच्या आधी जे डाळींचे मिश्रण तयार असते त्याचे पीठले, आमटी करतात किंवा चटणी सारखे जेवणात घेतात, या चटणीला म्हणतात - डांगर! हे डांगर नंतर शेजार्याकडे, आप्तेष्टांकडे थोडे थोडे पाठवतात - शेअर करतात!
घरात लग्नकार्य / मुंज वैगैरे असेल तर कार्याच्या कामांची सुरुवात वडयांच्या मुहुर्ताने च होत असते. एखादा चांगला दिवस पाहून पाच सुस्नात सुवासिनी पाटावर प्रत्येकी पाच पाच तरी वडे घालतात, मग पुढची कामे म्हणजे - कुरडया, पापड, हळद, मसाला आदि करायला सुरुवात होते!
(हुश्श !)
सांडगे या विषया वर दिनेशदा
सांडगे या विषया वर दिनेशदा यांच्या लेखाची ही लिंक अवश्य बघा-
http://www.maayboli.com/node/15717
मस्त चविष्ट
मस्त चविष्ट
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
हे चाळणीवर घासून घालायचे काम
हे चाळणीवर घासून घालायचे काम मात्र बेस्ट. वडे / सांडगे हातानी तोडायला
बराच वेळ लागतो. (माझा शॉर्टकट आयसिंग नॉझल !)
चाळणीची आयडीया छान आहे मी
चाळणीची आयडीया छान आहे मी चकलीच्या सो-याने चकली किंवा लांब नळी पाडून वाळल्यावर तुकडे करते छान एकसारखे सांडगे होतात
गिरीशजी, मठ म्हणजे मटकी का
गिरीशजी, मठ म्हणजे मटकी का
परिणीता, >>> मठ म्हणजे मटकी
परिणीता,
>>> मठ म्हणजे मटकी का
>>>
हो, मठ म्हणजे मटकीच !
अजून एक (ग्रामिण) नाव - घुगर्या !
भारी रेसिपी. गिरीश, ती
भारी रेसिपी.
गिरीश, ती वड्यांची रेसिपी प्रतिसादात न लिहीता वेगळा धागा म्हणुन लिहीली तर नंतर गरज पडल्यावर शोधताना सोपे जाईल.