खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी... रोजच्या बोलीभाषेतील आणि काही अलंकारिक असे शब्द घेऊन तो अशी काही शब्दांची सरमिसळ करतो कि बस...ऐकणाऱ्याला धुंदी चढावी...मराठी भाषेत इतकी सुरेख गाणी आणि तीही तरुण पिढीला आवडणारी फक्त आणि फक्त संदिपच लिहू शकतो.
सरीवर सर् नंतर संदीपची गाणी ऐकणे हा एकच छंद जडला...त्याची जवळपास सर्व गाणी माझ्या संग्रहात ठेवली... तस बघायला गेल तर तोही आमच्या सारखा रुक्ष अभ्यासातला (संदीप इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे...माझाही पहिला विश्वास बसला नव्हता), तरीदेखील तो इतक्या मनाला भेदून टाकणाऱ्या कविता लिहितो...हॅटस ऑफ!!!!
“दिवस असे कि” अल्बम ऐकल्यावर वाटल कि अरेरे किती रुक्ष आणि वास्तव कविता आहेत... पण त्याचा “सांग सख्या रे” ऐकला आणि वाटल बस आता काही ऐकूच नये... त्या वेळी नुकताच सुरु झालेला कार्यक्रम “आयुष्यावर बोलू काही” फक्त तिकीट परवडत नाही या कारणाने तो मित्रांसोबत बघायचा राहिला...नंतर तो यथावकाश आम्ही दोघांनी बघितला तो भाग आणि त्याची गोडी वेगळीच...पण त्यानंतर संदीपची गाणी हा एक स्वतंत्र विषय कोणीही अभ्यासासाठी घेऊ शकत अस मला मनापासून वाटतं...
अगदी सुरुवातीला “सकाळ” पेपर मध्ये त्याचा अगदी एक छोटंसं मनोगत आल होत. त्यात त्याने त्याची आणि सोनीया(संदीपची बायको) यांची भेट कशी झाली याच सविस्तर वर्णन केलय...तो सांगतो कि “काळोख्या अंधारात लख्ख सोनेरी उन पडाव तशी अवचित ती सामोरी आली...” अगदी अप्रतिम वर्णन!!! ती एक मानसशास्त्राची विद्यार्थिनी... कदाचित त्यामुळेच त्याचं एवढ ट्युनिंग असेल...त्याने तिला काहीही नसताना प्रपोझ केल त्याविषयी तो सांगतो “ फाटका शर्ट घालून मी तिला विचारणारा वेगळाच..आणि काहीही पुढचा मागचा विचार न करता मला होकार देणारी तीही आगळीच”. मला वाटत कि सोनिया एवढी भाग्यवान मुलगी फक्त तीच कारण या सर्व गाण्यांपैकी ९९% गाणी तो बहुतेक सोनीया साठीच लिहीत असेल...
त्याची “मौनाची भाषांतरे, नेणीवेची अक्षरे” हि पुस्तके संग्रहात असण मस्ट...त्याचा नवीन कार्यक्रम आहे “कधीतरी वेड्यागत वागायला हवे”...
संदीप म्हटल कि सलील हे नाव ओघाने येताच त्याच्या अप्रतिम कवितांना अतिशय मोलाची साथ दिलेली आहे सलीलने... त्या दोघांच ट्युनिंग बघाव “आयुष्यावर बोलू काही” कार्यक्रमात...फक्त नजरेने ते एकमेकांची भाषा ओळखू शकतात...दोघांचाही सेन्स ऑफ हुमर जबरदस्त आहे...पण तेवढाच हसवताना कधी “दमलेल्या बाबाची कहाणी” हे गाण चालू होत आणि अगदी पाषाणहृदयी माणूसहि आतून हलून जातो...शब्दांची इतकी ताकद फक्त त्या जादुगाराकडेच आहे... तोच मग वातावरण गंभीर केल्याची नैतीक जबाबदारी घेत थोडस हलक फुलक गाणं घेतो...
“दमलेल्या बाबाची कहाणी किंवा दूरदेशी गेला बाबा” हि गाणी ऐकवून लहानांपासून मोठ्यापर्यंत रडवणारा हि तोच.... तर कधी “कितीक हळवे कितीक सुंदर, लागते अनाम ओढ श्वासांना, वेड लागलं” सारखी गाणी ऐकवून मनात मोरपीस फिरवणाराहि तोच....
संदीपच्या विषयी जितकी वाटत ते सर्व तर काही मी लिहू शकत नाही तरी जाता जाता त्याच्याच भाषेत त्याच्याविषयी थोडस –
“ ये दिवानो कि बाते है इनको लब पर लाये कौन,
इतना गहरा जाये कौन खुदको यु उलझाये कौन”
.
.
मी पण पंखी!!
मी तर महापंखी उसकेसिवा अब कोई
मी तर महापंखी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उसकेसिवा अब कोई भाताही नही
मला संदिपच्या प्रत्येक कविता माझ्याशी निगडीत आहेत असं वाटतं..अगदी 'हे भलते अवघड असते' घ्या किंवा 'तुझ्या-माझ्या सवे' घ्या....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि कदाचित आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाच...
म्हणूनच त्याला तरुणांच्या आयुष्यात हे'' स्थान मिळालं असावं..
खरंतर आताच्या पिढीत कविता आवडणारे तरुण खुप कमी आहेत पण संदिपच्या कार्येक्रमांना जी गर्दी असते तेच त्याचं यश आहे असं माझं मत आहे
प्रियाला अनुमोदन गंभिर विषयही
प्रियाला अनुमोदन
गंभिर विषयही किती सहजपणे मांडतात नाही !!!!!!!!
बादवे.. संदीपच्या काही नवीन
बादवे.. संदीपच्या काही नवीन कार्यक्रमाबद्दल कोणाला माहित आहे का??
संदीपच्या कविता मलाही खूप
संदीपच्या कविता मलाही खूप आवडतात पण त्याला आणि सलीलला एक नम्र विनंती आहे. आपल्या गाण्यांचे व्हिडिओ काढणं आणि त्यात स्वतः अभिनय (?) करणं बंद करावं. मूळ गाणी ऐकायला कितीही चांगली असली तरी योग्य प्रकारे व्हिडिओमधे सादरीकरण झालं नाही तर त्याचा प्रभाव खूप कमी होतो. उदा. आयुष्यावर बोलू काही..खूप सुंदर गाणं..पण व्हिडिओमधे वाट लागली आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण चिकू त्यांच्या live
पण चिकू त्यांच्या live कार्यक्रमाबद्दल तर माझ तस माहित नाहीये. खर तर त्यांच्या मिश्कील स्वभावानेच त्या कार्यक्रमाची रंगत वाढते. अर्थात हे माझ वैयक्तिक मत:)
ख-यांबद्दल खरे लिहिले आहे.
ख-यांबद्दल खरे लिहिले आहे. एकदम आवडले
आवडॅश सगळ्याच कविता बेश्ट
आवडॅश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्याच कविता बेश्ट आहेत..
माझ आवडत आहे..कितीक हळवे ,,कितीक सुंदर आनि नसतेस घरी तु जेव्हा....दी बेस्ट आहे...:)
आवडल. मस्त हळुवार लिहिले आहे.
आवडल. मस्त हळुवार लिहिले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संदीप खरे च्या कविता छान पण
संदीप खरे च्या कविता छान पण खूप 'शब्दाळलेल्या' वाटतात कधी कधी... अर्थात माझे वैयक्तिक मत!
सुलू - संदीपच्या कविता
सुलू - संदीपच्या कविता शब्दाळलेल्या असतात हे मान्य. पण ते इतकेही अवघड शब्द नसतात. बऱ्यापैकी रोजच्या बोलीभाषेतले शब्द वापरून कविता करणे हीच तर त्याची खरी खासियत आहे.