Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 September, 2008 - 01:09
मी पाहील एक चॉकलेटच जंगल
जंगलात होती झाडे सुंदर
मुळे होती डेरिमिल्कची
फांद्या होत्या जेलीच्या
पान होती चिंगमची
जेम्सच्या कळ्यांनी भरलेली
फुले होती इक्लैर्सची
कुणाला फळे लिमलेटची
लॉलीपॉप आणि पेपरमिंटची
वेगवेगळ्या रंगित फ्लेवर्सचा
जंगलात सुटला होता वासच वास
तुम्हाला कोणत आवडत ह्याच्यातल खास?
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे
छान आहे
अति सुन्दर
अति सुन्दर
धन्यवाद
धन्यवाद अखि आणि डॉ. उमेश.
जगु गोड
जगु गोड गोड झाल तोंड.
जगु... मस्त
जगु... मस्त कविता...
थँक्स.. एकदम लहान केलंस... 
मला खूप आवडली. लहानपणीच काय पण अजूनही मला लिमलेटच्या गोळ्या फार आवडतात.
जगु, मस्तच
जगु, मस्तच गं..... खुप छान लिहितेस...
(काही काही शब्दांच्या वर टिंब पाहिजे असे वाटले, उदा. पाहील, चॉकलेटच, ह्याच्यातल )