नमस्कार मंडळी,
मला काही प्रश्न पडले आहेत? जाणकार मंडळी उत्तर देतील अशी आशा करतो.
१. माझ्याकडे अगोदरपासूनच एच. डि.एफ. सी. कडून उघडलेले एन. एस. डि. एल. चे डिमॅट अकाउंट आहे. फ्युचर आणि ऑपशन्स मध्ये मी नवखा आहे (थिअरीज आणि स्ट्रॅटेजीज वाचून माहीत आहेत पण अनुभव शून्य) पण गुंतवणूकीतला एक छोट्यातला छोटा हिस्सा मी फ्युचर आणि ऑपशन्स मध्ये गुंतवू (बोली लावू) इच्छितो. त्यासाठी एक सब-ब्रोकर मला सुरुवातीचे काही दिवस फ्युचर आणि ऑपशन्स मध्ये त्याच्या स्ट्रॅटेजीजनुसार गुंतवून नफा करून देण्यास (त्याच्या मतानुसार) मदत करणार आहे. पण त्यासाठी त्याच्याकडे "ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट" उघडणे गरजेचे आहे. (अर्थातच यामुळे त्याला ब्रोकरेजही मिळणार आहे) एकापेक्षा अधिक डिमॅट अकाउंट आपण उघडू शकतो का?
२. मुंबईत राहणारे आणि दुसर्यांच्या वतीने फ्युचर आणि ऑपशन्स, करन्सी, कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करणारे "प्रोफेशनल्स" तुमच्या ओळखीचे आहेत का? असल्यास त्यांची फी कुठल्या स्वरूपात असते. ती फी फिक्स्ड (मंथली/इअरली) असते की प्रॉफीट मार्जीन वर असते? प्रॉफीट मार्जीनवर ठरत असल्यास लॉस झाल्यास फी कशी ठरते? (मला थिअरीज माहीत असल्यातरी, फुल टाईम ट्रेडर होण्यास सध्या इच्छा नाही, त्यामुळेच असा ट्रेडर शोधतो आहे जो रेग्युलर बेसीस वर "इन्कम इन्वेस्टमेंट" ह्या दृष्टीकोनातून माझ्या अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन्स करू शकेल.)
धन्यवाद.
१. फ्युचर ऑप्शनसाठी डिमॅटची
१. फ्युचर ऑप्शनसाठी डिमॅटची गरज नसते.
२. अनेक दिमॅट अकाउंट उघडू शकता.
३. शक्यतो दोन्हे अकाउंट एकत्रच असावेत.
गुगलमध्ये नीड फायनान्शियल
गुगलमध्ये नीड फायनान्शियल इन्वेस्त्मेंट एक्स्पर्ट असा सर्च मारा.. ते लोक % मध्ये फी घेतात.. लॉस झाला तर बहुदा फी घेत नसावेत.
धन्यवाद, जागोमोहनप्यारेजी. पण
धन्यवाद, जागोमोहनप्यारेजी. पण "प्रोफेशनल्स" विश्वासार्ह असावा असे वाटते, त्यामुळेच इथे कोणाला माहीत असल्यास उत्तम! असे वाटते.
नमस्कार मित्रहो,
नमस्कार मित्रहो,
गुंतवणुकीच्या क्षेत्रात मी नवीन आहे.कृपया मला यासाठि सवीस्तर माहिति ह्वी आहे.मी ग्रामिण भागात राह्तो.मोतिलाल ऒस्तवाल यांचेकडे ओनलाइन डिम्यट खाते उघडित आहे.त्याचेशि करार करतांना कुठलि काळजी घ्यावी.त्यांचे कमीशन कसे असते. कृपया यावर मार्गदर्शन करावे.माझ्यासारख्या नविन लोकांना तुमचे अनुभव सांगावे.