Submitted by स्नेहश्री on 7 April, 2012 - 00:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाची काहिली वाढत आहे.
त्यावर खास उपाय म्हणजे थंड गोष्टींचा तसेच पेय पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश हवाच.
एक माझ्या पोतडीमधल माझ खास फ्रेश फ्रेश हिरवाई तुमच्यासाठी.
दुधी १/४ किलो साल काढुन आणि चिरुन
काकड्या २ बारीक चिरुन
१५/१६ पुदिन्याची पान
४/५ मिरी
१/२ इंच आलं
काळ मीठ चवीनुसार
लिंबु रस ३/४ चमचे
क्रमवार पाककृती:
सर्व एकत्र मिक्सर मध्ये गुळगळीत वाटुन घ्यायच.
मग ते सर्व पाणी घालुन सारख करुन परत मिक्सर मध्ये फिरवुन घ्यायच.
आणि मग ग्लास मध्ये घालुन थंड करुन प्यायच.
सजावटी साठी पुदिन्याची पान बारिक चिरून वर घाला
आणि काकडीचे बारीक तुकडे पण घाला पिताना मस्त लागतात.
वाढणी/प्रमाण:
४/५ जणांसाठी
अधिक टिपा:
दुधी आणि पुदिना हे ह्रुदयरोगा साठी चांगला असतो.
त्यांनी हे जरुर प्यावे. अगदी रोज सुद्धा.
(इतरत्र पुर्वप्रसिद्ध)
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उन्हाळ्यासाठी छान आहे..
उन्हाळ्यासाठी छान आहे..
छान आहे हे पेय.
छान आहे हे पेय.
धन्यवाद सुलेखा आणि दिनेशदा
धन्यवाद सुलेखा आणि दिनेशदा
करून पहायला हवं. पण दुधीचा
करून पहायला हवं. पण दुधीचा रस... :'(
छान.
छान.
दुधी कच्चाच वापरायचा का ? कि
दुधी कच्चाच वापरायचा का ? कि थोडा वाफवून घ्यायचा. लहान मुलाना दिले तर चालेल ?
वा छान! यात लिंबाच्या रसाऐवजी
वा छान! यात लिंबाच्या रसाऐवजी थोडी किसलेली कैरी घातली तरी छान लागेल असं वाटतंय.
मस्त वाटतंय. करून बघेन, चव
मस्त वाटतंय. करून बघेन, चव आवडली तर वारंवार केले जाईलच
धन्यवाद जागुतै जुइ दुधी
धन्यवाद जागुतै
जुइ दुधी पचायला हलका असतो. त्यमुळे कच्चा वापरला तरी चालतो.
वाफवुन मी सुद्धा वापरला होता. तो पण चांगला लागतो.. पण चवित निश्चित फरक पडतो.
कच्च्या दुधीच्या रसाला गोडवा असतो. लहान मुलांना हे अतिशय आवडत.. फक्त आलं आणि काळी मिरी जपुन वापरा.
तसेच हे मॉकटेल म्हणुन देताना स्प्राईट वा लिमकाने टॉप अप करु शकता..
अरुंधती ताई.. बरोबर आहे कैरीची मस्तच चव येते..कैरीचा कीसच्या ऐवजी बारीक चिरलेली कैरी घालते. पिताना त्याचा क्रंची अस फिल येतो...
पण थोडा लिंबु रस हवाच..

मंजुडी खरच करुन बघ.. आमच्या घरी जाम हिट जात हे ..!!
मस्तय ही रेसिपी. करुन बघायला
मस्तय ही रेसिपी. करुन बघायला हवी