खराखुरा Developer

Submitted by रीया on 3 April, 2012 - 05:38

Developer

पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन...नास्तिकचे IT Version ....

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा खरंतर Clientside लाच भर पडत असते
की कुणीतरी नुसतंच का होईना
पण प्रामाणिकपणे आजही Login केलयं या विचाराची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण
Client नी आपल्या requirements नव्याने पुन्हा बदलण्याची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा कोर्‍या नजरेने पाहत रहातो
कालचा अर्धवट सोडलेला कोड, आज बदलेलं DB Structure.....
काहीतरी का होईना पण आज Bugzilla वर raise करता येईल
याचं समाधान लाभतं मग टेस्टरलाच

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा मशिन मधला एक कप चहा कमी होत असेल कदाचित
पण मिळते आकंठ समाधान
आपलं pramotion fix या विचारानेच

Requirement पुर्ण झाल्यावर मस्त खुशीत
onsite वर बसलेल्या PM शी गप्पा मारता मारता TLला म्हणतो
"document ही वाचयला सांगा डेव्हलपरला अधुन मधुन...
तुमचं नसेल हो लक्ष कामात
पण टेस्टरचं आहे ना !"

Computer off केलेला तो खराखुरा Developer
चिडलेल्या TLला हळुवार शांत करुन पुन्हा Computer on करतो
तेंव्हा कुठे अनंत वर्षे ही IT Industry सुखाने चालतं रहायचे वचन देते
Happy

त.टी : (बगझिला वर टेस्टर लोक developer च्या चुका पोस्टवतात (माझ्या प्रोजेक्टात तरी निदान))

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

गुलमोहर: 

मूळ कविता वाचलेली नाही त्यामुळे विडंबनाचा आनंद घेता आला नाही. पण उपहास नीटच पोचलाय. Happy

निंबु,शागं ही मुळ कविता

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा शक्यता होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा…
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, ” दर्शन देत जा अधुन मधुन……..
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! “

देवळाबाहेर थांबलेला एक खरा खुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

…संदीप खरे

प्रिया मीही खरी कविता की खर्‍यांची कविता वाचलीच नव्हती..पण जुने डेव्हलपिंगचे दिवस आठवले त्यामुळे मजा आली तुझं विडंबन वाचायला....:)

मस्त!

(बगझिला वर टेस्टर लोक developer च्या चुका पोस्टवतात (माझ्या प्रोजेक्टात तरी निदान))
हे वाक्य अस्टेरिक करून तळटीप म्हणून लिही किंवा उडवून टाक (बगझिला हे software वाल्यांना नक्की माहित असेल.)

प्रिया मस्तय.
(संदिप खरेच्या कवितांना हात लावशील तर याद राख :-))
निंबुडा अगदी मला पण अमिताभच आठवला "आज खुश तो बहोत होगे तुम"

(बगझिला वर टेस्टर लोक developer च्या चुका पोस्टवतात (माझ्या प्रोजेक्टात तरी निदान))
हे वाक्य अस्टेरिक करून तळटीप म्हणून लिही किंवा उडवून टाक (बगझिला हे software वाल्यांना नक्की माहित असेल.)
>>

ते इतर लोकांसाठी लिहीलेलं
आता तळटीप म्हणुन टाकते
Happy

(संदिप खरेच्या कवितांना हात लावशील तर याद राख )
Happy

सगळ्यांना धन्स Happy

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा आधी कळ दाबतो ना?????

कळा अनेक असतात... वाचकांनी स्वेच्छेने अर्थ घ्यावा Wink

खूप सुंदर डंबन!!!