Submitted by प्रीति on 2 April, 2012 - 22:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
६ मध्यम आकाराचे ग्रॅनी स्मिथ सफरचंद
सफरचंदांना घोळवायला
१ टेबल स्पून साधी साखर
१/२ टि. स्पून दालचिनी पावडर
१ टेबल स्पून मैदा
क्रिस्पसाठी
१ १/२ कप ओटस
१/२ कप मैदा
१ कप ब्राऊन शुगर
१ चिमुट बेकिंग सोडा
४ टेबल स्पून बटर
क्रमवार पाककृती:
सफरचंदांची सालं काढुन बिया काढुन घ्याव्या, एका सफरचंदाचे ६ तुकडे करावेत.
कापलेल्या फोडींना दालचिनी, मैदा, साखर लाऊन बेकिंग ट्रेमधे सेट करावे.
ओटस, मैदा, ब्राऊन शुगर आणि सोडा एकत्र करुन सफरचंदांवर पसरवावे. आता ह्यावर बटरच्या चकत्या कापुन पसरुन ठेवाव्यात.
ओव्हन ३५०फॅ.ला सेट करुन १ तास बेक करावे.
गरम गरम आईस्क्रिमसोबत सर्व्ह करावे.
वाढणी/प्रमाण:
६-८
अधिक टिपा:
गार झाले तरी गरम करुन घेतले तरी चालते.
हमखास हिट होणारी पाककृती आहे.
क्रिस्पी ओट्स आणि मऊ सफरचंद खुपच छान लागतात.
सफरचंद आधी कापुन लिंबाचा रस लाऊन ठेवल्यास पार्टीच्या वेळी बेक करायला ठेवता येते.
माहितीचा स्रोत:
आंतरजालावर बेसिक रेसिपी वाचुन, फेरबदल करुन स्वतः तयार केलेली पाककृती.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! आम्ही याला अॅप्पल
मस्त!
आम्ही याला अॅप्पल क्रंबल म्हणतो