झूम इन..... झूम आउट......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 April, 2012 - 02:55

झूम इन..... झूम आउट......

कॅमेरा नेहेमी हाताळणार्‍याला झूम इन..... झूम आउटचे फार कौतुक नसते, कारण यात स्वतःचे कौशल्य असे काहीच नसते - कॅमेर्‍यातील झूम इन..... झूम आउट...... या ऑपश्नने हे सहज साधते......

मध्यंतरी कोकणवारीत चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना एका वळणावर एक निसर्गरम्य दृश्य नजरेस पडलं....चित्रात काढावे तसे वळणदार नदीचे पात्र, त्यापलिकडे झाडीत लपलेली एक चिमुकली वाडी........ मंत्रमुग्ध झाल्यासारखे गाडी थांबवून पहातच राहिलो..... ...... खाली उतरुन भान हरपून किती वेळ त्या दृश्याकडे पहातच राहिलो.......
पुढे आपोआप कॅमेरा रोखला गेला व धडाधड फोटोही काढले खूप .........

a.jpgb.jpg

त्या नदीत एक छोटी नाव दिसताच - झूम इन..... झूम आउट.....ची गंमत मुलीला दाखवावी म्हणून हे फोटोही काढले .... आधी वाटले की सहज काढू फोटो - पण फोकस करता करता लक्षात आलं- नाव फार भरभर आमच्याकडील तीराला येत होती......... या गडबडीत नाव सुटण्याचा फोटो व या तीराला लागतानाचा फोटो काढता आलेच नाहीत..........
"परचुरे तरी" असा काहीतरी बोर्ड पाहिल्याचं आठवतंय - तिथं - मुख्य रस्त्यावर .......

2_0.jpg1_1.jpg3_0.jpg4_0.jpg

गुलमोहर: 

छान ! व्वा काका, दुसर्या प्र.ची.त पाणी अगदी नितळं वाटतय. आजुन आहे एवढ पाणी नद्यांना ? मस्तच Happy

छान फोटो.
गगनबावडा हून भुईबावडामार्गे खारेपाटणला उतरताना असेच एक मस्त चंद्राकृती वळण
आहे. कधी त्या बाजूला गेलात तर अवश्य ती जागा लक्षात ठेवा.