विंडोज ७
माझ्या पी सी वर एक्स पी होते.. तेंव्हा माझे काही सॉफ्टवेअर्स ( शेअर मार्केट बाबत) व्यवस्थीत सुरु होते... त्यावेळी .नेट ३.५ अॅडिशनली इन्स्टॉल केलेले होते.
मग विंडो करप्ट झाली.
पुन्हा एस्क पी टाकले. पण .नेट ३.५ ते काही केल्या घेत नाही आहे. ( लायसन की नॉट वॅलिड येत आहे... मग पूर्वी कसे चालले ? ) त्याशिवाय ते सॉफ्टवेअर चालणार नाही.
याला उपाय म्हणजे विंडो ७ टाकणे. त्यात .नेट ३.५ बाय डिफॉल्ट असतात ( म्हणे) . विंडो ७ नेटवरुन बसल्याबसल्या मला इन्स्टॉल करता येईल का? ( नाही तर पुन्हा त्या कॉम्प्युटरवाल्याला बोलवून जुने एक्स पी काढून विंडो ७ टाकवेच लागेल.. )
सध्या कुठले विंडो सुरु आहे...? ( अज्ञानाला हसु नये ! मी २००५ पर्यंत ९८ वापरत होतो.. नंतर एक्स पी. आजतागायत. ) विस्टा म्हणून काही आहे का? ( तो क्याम्प्युअटरवाला कुठेतरी विष्ठा टाकली असे म्हणत होता.. ) आता यातले चांगले काय? हे टाकले तर ऑफिस कुठले टाकावे? ३ की ७?
मराठी शब्द वापरा म्हणून आरोळ्या ठोकणार्यानी यातल्या चुका काढण्यात वेळ घालवू नये...
विंडो ७ सध्या बाजारात आहेत. ८
विंडो ७ सध्या बाजारात आहेत. ८ beta मधे आहे. नवीनच ताकायचे असेल तर ७ किंवा ८ (जेंव्हा येईल तेंव्हा) टाका.
ऑफिस नुसतेच हवे असेल तर libre office टाका. ते फुकट आहे.
लायबरमध्ये वर्ड एक्सेलच्या
लायबरमध्ये वर्ड एक्सेलच्या फाइल ओपन होतात का?
तुम्ही एक्स पी वरून इतके
तुम्ही एक्स पी वरून इतके स्फोटक धागे उघडताय तर ७ आल्यावर काय कराल ?
बस एक ही एक्स पी काफी है,
माबोपर आग लगानेको.
अब तो सेव्हन आया है
अंजामे गुलिस्तां क्या होगा.
(दिव्यांची माळ)
विंडोज ७ सेल्फ ईन्स्टॉलेबल
विंडोज ७ सेल्फ ईन्स्टॉलेबल असते, त्यामुळे एक्स पी वरून 'EXE' किंवा 'Setup' ला क्लिक केले की पुढची प्रोसेसिंग आपोआपच होते
त्यात .नेट ३.५ बाय डिफॉल्ट असते त्यामुळे काळजी करायचे कारण नाही.
काही मदत लागल्यास वि.पु. मधून ईमेल करा
ते कसे करायचे? विपु कशाला,
ते कसे करायचे? विपु कशाला, इथेच सांगितले तरी चालेल.
.net फुकट आहे. तुम्ही फक्त
.net फुकट आहे. तुम्ही फक्त ईंटर्नेट तात्पुरते खंडीत करुन मग टाकुन पहा.
Windows XP फास्ट होतं Windows
Windows XP फास्ट होतं Windows & पेक्षा असा बरेच जन म्हणतात .
आणि मला ही तसचं वाटत .
कारणे आणि उपाय सुचवा .....
मी ७ टाकले. चांगले सुरु
मी ७ टाकले. चांगले सुरु आहे... एक्स पी इतकेच फास्ट आहे.. स्पीडात काही फरक नाही.. इतर रंग रुप देखील छान वाटले.
लायबर इन्स्टॉल झाले नाही..
लायबर इन्स्टॉल झाले नाही.. करप्ट म्हणून मेसेज येत होता.. त्यामुळे ऑफिसच टाकले.