४-५ शेकटाच्या(शेवग्याच्या) शेंगा.
एक वाटी बेसन
दोन चमचे तिखट
एक चमचा हळद
धणे-जिरे पूड
पाव वाटी गूळ
थोडी चिंच
थोडा ओवा,
चवीनुसार मीठ.
पाणी
रेसिपी बनवायच्या अर्धा तास आधी चिंच आणि गूळ पाण्यात भिजत ठेवावेत.
१. शेंगांच्या शिरा काढून त्यांचे बोटाएवढे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे+थोडं मीठ्+अर्धा चमचा हळद कुकरमध्ये टाकून एक शिट्टी काढून उकडून घ्यावेत.
२. शिट्टी येइपर्यंत कळसण तयार करावे. त्यासाठी बेसन, भिजवलेला गूळ आणि चिंच, मीठ, हळद, तिखट, धणे-जिरे पूड,ओवा आणि थोडे पाणी घालून भज्यासाठी जाडसर बॅटर तयार करावे. (हाताने लावता येईल इतपतच पाणी घालावे, खूप पातळ नको.) ५ मिनिटे मुरू द्यावे.
३. उकडलेल्या शेंगांच्या बिया काढाव्यात. त्यावर वरील बॅटर चोळून गरम तेलावर शॅलो फ्राय करावे.
आता गरम गरम भजी खायला सुरूवात करावी
१. ही भजी दोन पद्धतीने बनवता येतात. माझ्या माहेरी आम्ही नेहमी उकडलेल्या शेंगा नेहमीइतक्या पातळ बॅटरात बुडवून डीप फ्राय पण करायचो. वर दिलेली पद्धत माझ्या सासरची आहे. या पद्धतीने कुरकुरीत आणि खमंग होतात भजी.
२. चिंच थोडी जास्त घातली तर मस्त आंबटगोड चव लागते. ही भजी कशाच्याही सोबत किंवा नुसतीच खा
आधीचा फोटो जास्त तोंपासु होता
आधीचा फोटो जास्त तोंपासु होता
मसालाची दोन तिकिटे मिळवणारच
मसालाची दोन तिकिटे मिळवणारच असा पण केलायेस का टोके तू
छान वेगळाच प्रकार. आमच्याकडे
छान वेगळाच प्रकार.
आमच्याकडे शॅलो फ्रायच करतात. आता अशी करायला पाहिजेत.
अरे वाह... नविनच आहे.
अरे वाह... नविनच आहे.
मस्त गं... भुंगा +१
मस्त गं...
भुंगा +१
वा मस्तच
वा मस्तच
वा वेगळीच पध्दत.. आंम्हाला
वा वेगळीच पध्दत.. आंम्हाला फक्त डाळ, सांबार किवा भाजी करण्याचीच पध्दत माहित होती. बनवायला आवडेल..
धन्यवाद लोक्स दिनेशदा ह्या
धन्यवाद लोक्स
दिनेशदा ह्या फोटोत शॅलो फ्राय केलेल्या शेंगाच आहेत. डीप फ्रायमधे शेंग दिसतच नाही, नुसतच आवरण दिसतं, बटाटा भज्यासारखं.
मयु, भुंगेश यू नेव्हर नो!
व्हीमिनल तो मी चुकून चिकन ६५ चा फोटो टाकलेला
छान. आम्ही शेकटाच्य शेंगा
छान.
आम्ही शेकटाच्य शेंगा चिंच गुळ घालून फोडणी देऊन करतो त्याही चविष्ट लागतात. भजी मी डायरेक्ट करते. वाफवत नाही. शॅलोफ्रायच करते. बेसन ऐवजी तांदळाच्या पिठाने अजून कुरकुरीत होते.
जागू नुसतच पीठ घालतेस की
जागू नुसतच पीठ घालतेस की बेसनात मिक्स करतेस? न वाफवता शेंगा बहुतेक कच्च्या लागतील.
शेवग्याची शेंग माझा माझा
शेवग्याची शेंग माझा माझा अत्यंत नावडता प्रकार. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांची आमटी कधीच करत नाही. पण हा प्रकार चटपटीत वाटतोय. नक्कीच करून पाहणार
व्वा. व्वा. शाकाहरी बोंबील
व्वा. व्वा. शाकाहरी बोंबील भजी मस्तच दिसत आहेत.
मस्त... आम्ही असेच करतो ..
मस्त...
आम्ही असेच करतो ..
माझी फेवरेट्ट्ट्ट आहेत
निंबे तुला शेवग्याची शेंग
निंबे तुला शेवग्याची शेंग आवडत नाही? (स्वगतः मला त बै खुप्प खुप्प आवडते)
नवर्याची पण फेवरेट्ट! त्यामुळे कुठलाही प्रकार असु देत, आमच्या घरी आम्ही पाव किलो शेंगा एका वेळेस फस्त करतो...
धन्यवाद किशोर
शेफू
शेवग्याला शेकटा म्हणतात का ?
शेवग्याला शेकटा म्हणतात का ?
हो युरी
हो युरी
मी ते वाचलं <<< शेपटाच्या
मी ते वाचलं <<< शेपटाच्या शेंगांची भजी>>>
शेवग्याच्या शेंगांनी कुटुंब
शेवग्याच्या शेंगांनी कुटुंब एकत्र येते
मस्त ग टोके आनि चकक फोटो
मस्त ग टोके आनि चकक फोटो टाकला आहेस तु
युरी ते कसे????? अनुडे खास
युरी ते कसे?????
अनुडे खास तुझ्यासाठी आहे तो फोटो