Submitted by संयोजक on 5 September, 2008 - 02:26
नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
३) एका आयडीवरुन तुम्ही कितीही प्रवेशिका टाकू शकता फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल
४) विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.
आजची जोडी :
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सैफ - पहिली
सैफ -
पहिली झाली जुनी,
दुसरीचा आला कंटाळा,
तिसरी केली करीना
आता लागतो चौथीच्या शोधाला!
करीना -
मला मिळाला सैफ
माझी आहेच नवाबी आवड..
हीच माझी मंझिल? छे, छे...
हा तर फक्त मैलाचा दगड... !!
करीना: जब
करीना:
जब वी मेट
दिल भेटले थेट
फिरवली शाहिदकडे पाठ
सैफ, माझी तुझ्याशीच गाठ
सैफः
'अमृता'च्या जाडीनंतर
'रोसा'च्या उंचीनंतर
भावला तुझा साईझ झीरो,
करीना, मीच तुझा हीरो
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
करिना: माझं
करिना:
माझं नाव हातावर गोंदवल
इतका त्याला माझा कैफ
आता मी ह्रुदयावर गोंदवलय
नुसतं सैफ, सैफ, सैफ....
सैफ..
सेंकड हॅंड असली तरी आवडते मला करिना
आधीच्या म्हातारी पेक्षा ही कोवळी बरी ना...
करिना अन
करिना अन बरी ना??
करीना : आज
करीना :
आज आहे सैफ झोकात म्हणून हा सारा साज
उद्याचं कुणास ठाऊक नवा गडी नवा राज!!
सैफ :
आपलं काय जातंय म्हणायला की माझीच आहे करीना
चार दिवस मजा मारू उद्या कुणाचा का हात धरीना..!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
सैफू- चिपाड
सैफू-
चिपाडात चिपाड उसाचं
अन फुलात फुल कारल्याचं
कसंही असो, नशीबच माझं, म्हणून-
कौतूकच करतो करीनाचं!!
--
करीना
सँडल नवी अन पर्फ्यूम नवा बाई
पर्स नवी माझी, नेकलेस नवा
पिंटूशी फुगडी झाली बाई आता
झिम्म्यासाठी जुना सैफूच हवा!!
(No subject)
सैफ...... अमृत
सैफ......
अमृताहूनी गोड....... नांव तुझे करिना.... नांव तुझे करिना.....
मन माझे आता, अमृता न लगे.... अमृता न लगे.......
करिना.....
लग्न झालेल्या मुलाशी, लग्न करायची आहे चित्रपटसृष्टीत फशन.....
दिसत असला म्हणून पिता तरी सैफच माझा हिरो अक्शन....
करिना: चांग
करिना:
चांगला धडा शिकवते, त्या शाहिदच्या कार्ट्याला
सैफ काही म्हातारा नाही, मच्युअर म्हणतात याला
सैफः
आता माझी झाली, ती दुसर्याची व्हावी ना
अमृताते पैजा जिंकी अशी माझी करिना
सैफः करीना
सैफः
करीना ...करीना... बोलशील का ग मझी वाणी,
होशील का ग माझी राणी?
करीना:
स्वपनातच बघ माला झालेली तुझी राणी,
सैफ ...मी तर होणार बोल्लीवूडची राणी !!!!
करीना : करत
करीना :
करत होते वेणीफणी समोर होता आईना
सैफ आला घरात तरी शाहीद बाह्येर जाईना
सैफ :
पहिली होती आडदांड आणि दुसरी आहे वांड
नखचढ्या करीनाशी जन्माची भांडाभांड
१) करीना: अं
१)
करीना:
अंगणात ओतले पोतभर गहू,
लिस्ट आहे (लफड्याची) मोठी कुणाकुणाचे नाव घेउ,
सैफ आहे(सध्याचा) माझा राऊ
(आता) बाकी सगळे भाऊ.
सैफः
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
दगडापेक्षा(अमृता) वीट (करीना) बरी मऊ
करीना: माझ्
करीना:
माझ्या प्रेमात शहीद खपला
तुझ्याशी लग्न करून जन्म तुझा धुतला(धुपला).
सैफः
आजची माझी करीना,
उद्या माझीच असेल 'खर' ना?
मी आपला खेळतो सेफ,
उगाच नाही नाव सैफ.
किंवा
सैफः
जुणं काकडी(अमृता) कडवटली कडवटली,
कवळी कवळी काकडी आवडली बाई आवडली.
भन्नाट.... -::-
भन्नाट....
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-
सैफ : अमृता
सैफ :
अमृता झोपत असते नुसती ढाराढुर
म्हणुन केली आता करीना कपूर
करीना :
ज्वारीच्या शेतात शोभतय बुजगावण छान
करीनाच्या यादीत आता सैफ अली खान
करिना: मुंब
करिना:
मुंबई इंडियन्सचा टीशर्ट घालुन खेळते रोज चेंडुफळी
कित्येक क्लिनबोल्ड केले सांगा सैफ माझा कितवा बळी?
सैफ:
अमृताला दिले सोडुन करिनाला पकडलय आज
टेस्टचा जमाना गेला आता ट्वेंटी ट्वेंटीचाच माज
करीना: शाही
करीना:
शाहीद्च्या बिडीला विद्या लावी काडी,
सैफ चे नाव घेते कपूरान्ची घोडी.
सैफः
हिच्या कमरेचा झोका,
चुके काळजाचा ठोका,
सैफ विनवी जनलोका,
आता काड्या करु नका.
lol सही रे
lol सही रे पुषकर..
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८