चिकन अर्धा किलो
कांदे २
लसूण १२ पाकळ्या
आलं अर्धा इंच
हिरवी मिरच्या २
टॉमेटो २
हळद अर्धा चमचा
तिखट १ चमचा
मीठ अर्धा चमचा
लवंगा ५
मिरी ८
दालचिनीचा तुकडा १ इंच
खसखस १ चमचा
बडिशेप १ चमचा
धणे १ चमचा
ओवा अर्धा चमचा
कसुरी मेथी १ चमचा
दही २ चमचे
तेल ४ चमचे
एक कप पाणी
१. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
२. लसूण, आलं, हिरवी मिरच्या, हळद, तिखट, मीठ, लवंगा, मिरी, दालचिनी, खसखस, बडिशेप, धणे, दही हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
३. हे वाटण चिकनला लावून ठेवावे.
४. कांदे बारीक चिरून घ्यावेत.
५. टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत.
६. पसरट भांड्यात तेल तापवून त्यात चिरलेले कांदे घालावेत. कांदे लाल झाले की त्यात चिरलेल टॉमेटो टाकावेत.
७. तेल सुटे पर्यंत परतावे.
८. आता त्यात वाटण लावलेले चिकन टाकावे. कसूरी मेथी आणि ओवा त्यात टाकावा. आता हे सगळे पुन्हा नीट परतावे. किमान ५-८ मिनिटं.
९. यात पाणी घालावे, व हलवावे. उकळी आली की झाकण ठेऊन १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
१०. ५ मिनिटांनी वाफ जिरल्यावर "मस्साला चिकन" तयार !
हे चिकन सुके असल्याने फुलक्यांबरोबर छान लागते. किंवा नुसतेही मस्त लागते
तोपांसु
तोपांसु
व्वा छान! मस्त आहे
व्वा छान! मस्त आहे रेसिपी.
आणि बरोबर लंचच्या वेळेवर टाकलेय. तो दुसरा फोटो बघून सरळ जेवायलाच बसावे असे वाटले.
वेताळा, घे जेऊन माझ्या
वेताळा, घे जेऊन
माझ्या लेकासाठी वाङ्हलेले ताट आहे ते. अन कधी कधी फार त्रास दिला तर मी हाक मारते त्याला "वेताळा " 
"मसाला चिकन"
"मसाला चिकन"
एक लेगपिस माझा बुकींग करून
एक लेगपिस माझा बुकींग करून ठेव...
गिरी, उदय एकसे तेरा क्या
गिरी, उदय

एकसे तेरा क्या होगा
मस्त
मस्त
एकदम भारी...
एकदम भारी...
झटपट प्रकार आहे हा. छान.
झटपट प्रकार आहे हा. छान.
वॉव्..खरोखरीच
वॉव्..खरोखरीच मस्स्स्सालेद्दार ..तोंपासु
मस्त तोपासु
मस्त तोपासु
मला आत्ताच्या आत्ता हवय हे
मला आत्ताच्या आत्ता हवय हे अवल. तोंपासु
मस्तच!!!! सोपं आणि चटपटीत
मस्तच!!!!

सोपं आणि चटपटीत वाटतय
तोंपासु नाही म्हणू शकत कारण मी शाकाहारी... पण फोटु भारीये
मस्त!
मस्त!
हं............! दिसतंय छान.
हं............! दिसतंय छान. आणि आफ्टरऑल.........अवलची कलाकृती आहे!
पण मीही शाकाहारी(घासफूस खाणारी) असल्याने इतकंच.
मला आत्ताच्या आत्ता हवय हे
मला आत्ताच्या आत्ता हवय हे अवल. तोंपासु <<<<<<<< +१
धन्यवाद सर्वांना मला वाटलं
धन्यवाद सर्वांना
मला वाटलं माझ्या गोर्यापान फुलक्यांचंच जास्ती कौतुक होईल. पण सगळे खादाड चिकनवर तुटून पडले
निदान शाकाहारींनी तरी बघायचं त्यांच्याकडे 

मानुषी, धन्स गं
मला आत्ताच्या आत्ता हवय हे
मला आत्ताच्या आत्ता हवय हे अवल. तोंपासु <<<<<<<< +१०००००००००००००००
मला पण पाहीजे
अवल कांदे २ घेतेले तर जास्त नाही का होणार ?
नाही गं. मसाले इतके आहेत ना
नाही गं. मसाले इतके आहेत ना की त्यांना थोडं हलकं करण्यासाठी लागतात २ कांदे
सर्वसाधारणपणे आलं-लसूण्-मिरची / तिखट / लवंगा-मिरे-दालचिनी या तीन प्रकारच्या तिखटांपैकी दोन एकत्र केले तर फार त्रास होत नाही तिखटाचा पण तिन्ही एकत्र आले की फणकारा खुपच वाढतो. मग त्याला कांदा अधिक वापरणे हा मार्ग असतो
शिवाय इथे खोबरेपण नाहीये ना.
मस्तच, मी विचारणार होते की ती
मस्तच, मी विचारणार होते की ती पोळी एवढी पांढरी कशी
वाटलं तांदळाची भाकरी असावी. चिकन भारीच्चे.
एकदम तोपासु.
एकदम तोपासु.
"मस्साला चिकन"मस्त आहे.
"मस्साला चिकन"मस्त आहे.
उद्या करणार!
उद्या करणार!