भाड्याने घेण्याकरता एक घर खूप आवडलय. घर नुकतच रिनोवेट केलेलं आहे. कधी नव्हे ते बस अॅक्सेस वगैरे पण चांगला आहे. (आम्हाला ऑफिसला जायला दररोजचा प्रवास आहे)
खाजगी मालकीचे घर आहे (तरिही एका कम्युनिटीचा भाग). ओनर भारतीय नाही.
१. ओनर रेंटच्या किमतीच्या जवळपास दीडपट रक्कम सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागतोय.
त्याचं म्हणणं त्यांनी आताच घर रिनोवेट केलय तर भाडेकरुनं नासधूस केली तर त्यांच्याकडे तेवढच काय ते सेफ्टी नेट आहे.
आम्ही बाकी कुणाला एवढं डिपॉझिट मागताना ऐकलं नाही.
२. आम्ही ह्याआधी कधी अपार्टमेंट शिवाय काही रेंट केलं नाहिये. तर हे रेंट करताना काय काळजी घ्यावी?
३. घरावर काही कर्ज असेल त्याचे हफ्ते चुकले असतील वगैरे तर आम्हाला कसं कळेल? एकूणच घरमालकांची बॅकग्राऊंड/ऑथेंटिसिटी/घर त्यांचच आहे ना वगैरे कळण्याकरता काय मार्ग आहे?
फारच बेसिक प्रश्न पडताहेत.
नानबा, सिक्युरिटी डिपॉझिट
नानबा, सिक्युरिटी डिपॉझिट किती घ्यावं, घेता येतं ह्याकरता नियम आहेत. ओनर मनाने हवं तितकं घेऊ शकत नाही. इथे न्यू जर्सीत जास्तीत जास्त १.५ महिन्याचा रेंट इतकंच घेऊ शकतो. तुमच्या स्टेटचे नियम चेक कर.
घर घेताना स्नो काढणं, लॉन मोईंग वगैरेचा खर्च घरमालक करणार का, हे विचारुन घ्या. बाकी घरात पुशपिन्स, खिळे ठोकणं चालणार, नाही हे विचारलं असशीलच कदाचित. नसल्यास ती चौकशी कर. रेंटमध्ये आणखीन काय इन्क्लुडेड आहे हे लिस्टींगमध्ये लिहिलेलं असल्यास ते ही बघून घ्या.
तिसर्या प्रश्नाबद्दलः तुम्ही काळजी करावीत असं वाटत नाही. इनफॅक्ट घरमालकच तुमचं क्रेडीट रेटिंग चेक करु शकतो.
नानबा , प्रत्येक राज्यात
नानबा , प्रत्येक राज्यात कायदे अन प्रथा थोड्या वेगळ्या असतील.
आम्ही लास्ट मंथ रेंट + एक महिन्याचे भाडे सेफ्टी डिपोझिट + पहिल्या महिन्याचे भाडे एवढे करार करताना घेतो . दर महिन्याचे भाडे आगाऊ भरायला लागते.
घर मालकाला तुम्ही विचारू शकता की हे घर तुमचेच कशावरुन . ते तुम्हाला टायटल इंशुरंस किंवा मॉरगेज पेपर्स दाखवू शकतात. आम्हाला तरी कोणी विचारले नाहीये आजपर्यंत.
स्नो काढणं, लॉन मोईंग वगैरेचा >> होम ओनर्स असोसियेशनची ही सुद्धा कधी कधी जबरदस्त असू शकते . ती किती आहे अन कोण भरणार हे स्पष्ट करावे.
ओनरकडून घर रेंट करण्यात फार
ओनरकडून घर रेंट करण्यात फार काही रिस्क आहे असं मला वाटत नाही. तेवढा खालील मुद्द्यांचा विचार करा.
शक्यतो मधे रिअल्टर व्यक्ती किंवा कंपनी असावी, जी दोघांचे हित बघते, म्हणजे अॅग्रीमेंट मधल्या कलमा कुणासाठी जाचक नाहीत ना वगैरे.
रिअल्टरची फी बहूतेक लँडलॉर्डकडून घेतली जाते, जी शक्यतो १ महिन्याचा रेंट असतो.
जर तुम्ही ओनरला डायरेक्ट अॅप्रोच झाला असाल तर तुम्ही त्याचे एका महिन्याच्या रेंट ईतके पैसे वाचवत आहात आणि हे तुम्ही रेंट निगोशिअट करतांना लँडलॉर्डच्या नजरेला आणून देऊ शकता.
ओनर घराचे हप्ते भरत असेल तरी टीनन्टला त्याने काही फरक पडू नये.
लॉन मोईंग, स्नो रिमूवल वगैरे कामं कोण करणार आणि त्याचे पैसे कोण भरणार हे अगोदरच बोलून घ्या.
टाऊनहोम, काँडो असेल तर असोसिअशन फी वगैरे कोण भरणार?
तुम्ही ठरवलेल्या लीज पीरीअड मध्ये लॅंडलॉर्ड ते घर विकू शकत नाही असा क्लॉज लीजमध्ये ठेवा.
आणि विकणे अपरिहार्य असल्यास निगोशिअटिंग टर्म्स काय असतील तेही ठरवून ठेवा.
लीज पिरिअडच्या मध्येच प्रॉपर्टी टॅक्स वाढल्यास त्याचा बोजा तुमच्यावर पडणार नाही हे ही बोलून घ्या.
टीनन्ट ईंश्यूरन्स नक्की घ्या...वर्षासाठी फार तर $१०० असतो. लँडलॉर्डचाही स्वत:चा ईंश्यूं आहे त्याची खात्री करा.
युटीलीटीज कोणाच्या नावावर असणार तेही बोलून घ्या.
महत्वाचे म्हणजे रेफ्रीजरेटर, हीटींग कुलींग सिस्टीम ई. नादुरूस्त झाली तर रिपेरिंगची जबाबदारी (खर्चासहित) कोणाची?
जबाबदारी लँडलॉर्डकडे असल्यास किती वेळात ती दुरूस्त झालीच पाहिजे हे ही ठरवून घ्या.
आग, वॉटर लाईन लीकेज किंवा हेवी रेन, टॉर्नॅडो थोडक्यात ज्या गोष्टींवर तुमचा कंट्रोल नाही अश्या गोष्टींनी फ्लोअर, वॉल्स, कारपेट, गॅराज ई. खराब झाल्यास रिपेरिंगची जबाबदारी (खर्चासहित) कोणाची? ईंशू. यासाठी हवाच.
घरातील सामानाची यादी करून ठेवा आणि त्यांचे फोटोही काढून ठेवा.
मुख्य म्हणजे लँडलॉर्डचा स्वभाव लक्षात घ्या.
बाकी लीज मधल्या टर्म्स थोड्याफार फरकाने अपार्टमेंट लीज सारख्याच असतात.
तिघांनाही खूप खूप थँक्यू..
तिघांनाही खूप खूप थँक्यू..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी घरमालकीणीशी डिटेल मधे ह्या गोष्टी बोलून घेईन ...
>> शक्यतो मधे रिअल्टर व्यक्ती
>> शक्यतो मधे रिअल्टर व्यक्ती किंवा कंपनी असावी, जी दोघांचे हित बघते, म्हणजे अॅग्रीमेंट मधल्या कलमा कुणासाठी जाचक नाहीत ना वगैरे.
+१
रिअल्टरच्या थ्रूच गेलेलं बरं. कॉन्ट्रॅक्ट्स वगैरेंचे बारकावे त्यांना समजतात. (कोण कसला खर्च बेअर करणार, लीजची टर्म इ.). एकदा फी द्यावी लागते पण इट्स वर्थ इट.
तसंच रेन्टर्स इन्शुरन्स घ्याच.
>>रिअल्टरची फी बहूतेक
>>रिअल्टरची फी बहूतेक लँडलॉर्डकडून घेतली जाते>> ९५% टक्के टेनंटला भरावी लागते. एक महिन्याचा रेंट कमिशन म्हणून घेतला जातो. फार क्वचित लँडलॉर्ड भरतो किंवा लँडलॉर्ड - टेनंट शेअर करतात.
>>टाऊनहोम, काँडो असेल तर असोसिअशन फी वगैरे कोण भरणार?>> हे ही लँडलॉर्ड भरतो पण लिस्टींग टर्म्स नीट वाचलेल्या, विचारलेलंच बरं.
९५% टक्के टेनंटला भरावी
९५% टक्के टेनंटला भरावी लागते. एक महिन्याचा रेंट कमिशन म्हणून घेतला जातो. फार क्वचित लँडलॉर्ड भरतो किंवा लँडलॉर्ड - टेनंट शेअर करतात. >> सायो, ही पद्धत सिटी/एरिया नुसार बदलते. न्यूपोर्टसारख्या ठिकाणी टेनंट कडून(सुद्धा) घेतात पण ते शक्यतो प्रायवेट रिअल्टर असतात, म्हणजे थोडक्यात एजंट, त्यांच्या एथिक्सबद्दल न बोललेलंच बरं. काही हाय डीमांड असलेल्या अपार्टमेंटसमध्ये तर रेंटल ऑफिस अपार्टमेंट अवेलेबल नाही म्हणून सांगतात आणि एजंट तुम्हाला त्याच कम्यूनिटीमधलं अपार्टमेंट दाखवतो, तेही कम्यूनिटी प्रॉपर्टी (प्रायवेट नव्हे). ज्याला जागेची खरंच गरज आहे तो ही अडवणूक्/फसवणूक आहे हे कळत असूनही देणारच. कारण डिमांड/ सप्लायचा गोल्डन रूल.
जर तो एजंट $१००० कमिशन घेऊन, $१५०० चा रेंट $१४०० निगोशिएट करून देणार असेल तर टेनंट त्याला कमिशन देईन, नाहीतर त्याच्या कुठल्या सर्विसेससाठी टेनंट त्याला कमिशन देणं लागतो?
रिअल्टर व्यक्ती/कंपनी जागा रेंट होईपर्यंत लँडलॉर्डसाठी टेनन्ट शोधणे, अॅड्स टाकणे, विझिट्स अरेंज करणे, लीज डॉक्यूमेंट तयार करणे आणि लँडलॉर्डला वेळेअभावी शक्य नसेल तर टाऊनशिप ईन्स्पेक्षन सुद्धा अरेंज करते. तर ह्या सगळ्या सर्विसेससाठी त्यांनी लँडलॉर्डलाच चार्ज करणं बरोबर नाहीये का?
हां भले लँडलॉर्ड जागेचा रेंट ठरवतांना त्यामध्ये रिअल्टरची फी अॅड करून ठरवेन, शेवटी ती त्याची कॉस्ट आहे, पण ती डायरेक्ट टेनंटकडून वसूल करणे मला एथिकल वाटत नाही.
जागेच्या खरेदीविक्रीत तर कमिशनची ही रक्कम फारच जास्त असते. माझ्या माहितीप्रमाणे जागा घेणार्याचे आणि विकणार्याचे रिअल्टर वेगवेगळे असले तरी दोघेही कमिशन जागा विकणार्याकडूनच घेतात. (बायर पार्टीचा रिअल्टर, सेलर पार्टीच्या रिअल्टरच्या कमिशनमधला हिस्सा घेतो)
शेवटी गणित एरिया किती हॉट आहे तिथेच येते. न्यूपोर्ट मॉलमध्ये पार्किंग फी कस्टमर पे करतो पण प्रिन्सटन, पार्सिपनी वगैरे एरियात मॉल पार्किंगसाठी अशी फी बहूधा दिसणार नाही.
धन्यवाद स्वाती! 'रेन्टर्स ईंश्यूरन्स' ही बरोबर टर्म आहे. 'टेनन्ट ईश्यूरन्स' नाही.
चमन, नंतर लिहिते.
चमन, नंतर लिहिते.
सगळ्यांना पुन्हा एकदा
सगळ्यांना पुन्हा एकदा थॅंक्यू..
आम्ही शेवटी अपार्टमेंटमधे मूव्ह होण्याचा विचार पक्का केला आहे
वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर छान पॉझिटिव आली पण इतर पर्सनल कारणांमुळे आज सकाळीच हा विचार पक्का केला
चमन, नंतर लिहिते.>> एवढं एकच
चमन, नंतर लिहिते.>> एवढं एकच वाक्य पुर्ण मराठीत आहे... छान, बरं वाटलं....