१/२ कप अनसॉल्टेड बटर
१/४ + १/८ कप केक फ्लार ( मैदा सुद्धा चालेल)
चिमुट्भर मीठ
२ अंडी
१/२ टीस्पुन वॅनिला एक्सट्रॅक्ट
१/२ टीस्पुन अल्मंड एक्सट्रॅक्ट
१/४ + १/८ कप अल्मंड पेस्ट
१ टेबल्स्पुन पॉपी सीड्स (खसखस)
१/२ कप साखर
१/४ टीस्पुन बेकिंग पावडर.
प्रथम अवन ३५० ला तापत ठेवावा. लोफ टीन (९ बाय ५) बटर चोळुन आणि मैदा भुरभुरुन तयार करुन ठेवा. एक बोल मधे मैदा, मीठ आणि बे. पा. चाळुन घ्या. वेगळ्या बोल मधे अल्मंड पेस्ट इलेक्ट्रिक मिक्सर च्या लो स्पीड वर बीट करा. पेस्ट्चे लहान क्रंब्स झाले पहिजेत्.आता त्यात हळुहळु साखर मिसळा. सगळे एकजीव झाले पाहिजे. आता एका वेळी १ टेबलस्पुन बटर याप्रमाणे मिक्स करत जा. मिडियम स्पीड वर २ ते ३ मिनिटे हे मिश्रण बीट करा. त्यातच हलके फेटलेली अंडी एका वेळी एक अशी मिक्स करा. वॅनिला आणि अल्मंड एक्स्ट्रॅक्ट मिश्रणात घाला.
वरील मिश्रणात मैद्याचे मिश्रण आणि खसखस २ बॅच मधे अॅड करा. तयार केकचे मिश्रण लोफ पॅन मधे ओतुन ३५ ते ३७ मिनिटे बेक करा.
अल्मंड पेस्ट सुपरमार्केट्मधे न मिळाल्यास :- १/२ कप बदाम ब्लांच करुन घ्यावेत. नंतर कॉफी ग्राईंडर मधे बदामाची पावडर करुन घ्यावी. त्यात १/४ कप किंवा मावेल तितकी पिठीसाखर आणि १/२ टीस्पुन अल्मंड एक्स्ट्रॅक्ट मिसळुन घट्ट्सर गोळा बनवावा.
(No subject)
मस्त वाटतोय केक.
मस्त वाटतोय केक.
मस्त केक!!
मस्त केक!!
छानच झालाय केक.
छानच झालाय केक.
मस्त दिसतोय. छान असेल ना
मस्त दिसतोय.
छान असेल ना चवीला..
आभार मंडळी. @ झंपी >> बदामाची
आभार मंडळी.
@ झंपी >> बदामाची चव पुर्णपणे उतरते केक मधे, आणि पॉपी सीड्स चे क्रंची टेस्क्स्चर लज्जत आणते.
मस्त वाटतोय.. नक्की करुन
मस्त वाटतोय.. नक्की करुन बघणार. Lemon & poppy seed केक मैत्रिणीने केला होता, तो पण छान झाला होता.