१०-१२ खजुर बी काढलेला..
७-८ आमसुले..
मीठ,साखर,२ काश्मीरी लाल मिरच्या ,जिरेपुड..
फोडणीसाठी तेल २ चमचे ,हिंग ,जिरे.
चिरलेली कोथिंबीर वरुन घालायला
खजुराचे तुकडे अर्धा तास पाण्यात भिजवा.
आमसुले गरम पाण्यात अर्धा तास वेगळी भिजत घाला.सार करतानाच्या वेळेत हा अर्धा तास मोजला नाही.
खजुर मिक्सर मधे अगदी बारीक वाटुन घ्यावा.त्यात २ कप पाणी घालावे.एका चाळणीवर हे मिश्रण ओतुन गाळुन घ्यावे.
आमसुले बारीक वाटुन त्यात १ कप पाणी घालुन हे मिश्रण चाळणीवर ओतुन गाळुन घ्यावे.हे पाणी एका वेगळ्या भांड्यात ठेवावे.
खजुराच्या पाण्यात चवीनुसार मीठ,साखर घाला.
तेलाची हिंग-जिरे व लाल मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करा व खजुराच्या मिश्रणावर घाला .
या साराला उकळी आणा.
त्यात आमसुलाचे पाणी व कोथिंबीर घाला.
तोंडाला चव यावी व भुक वाढावी यासाठी काल माझ्या वहिनीने आईसाठी हे सार केले होते .म्हणजे आई चे निमित्ताने सगळ्यांनी आस्वाद घेतला.
खजुर आकाराने लहान -मोठा असतो त्यामुळे खजुर व एकुण पाण्याचे काटेकोर माप दिले नाही.शिवाय साराचा दाटपणा आवडी प्रंमाणे कमी -जास्त ठेवता येईल.मीठ ,साखर,जिरेपुड ही चवीनुसार घालावी.
हम्म... वेगळी आणि इंटरेस्टिंग
हम्म... वेगळी आणि इंटरेस्टिंग रेसिपी
आंबट-गोड चव येते का?
होय्,खजुर आणि साखरेची
होय्,खजुर आणि साखरेची गोड,आमसुलांची आंबट तर फोडणीतल्या मिरच्यांमुळे किंचित तिखट अशी चव येते.आमसुले ओलसर असली तर रंग उत्तम येतो.
छान प्रकार आहे. चिंचेचा रस
छान प्रकार आहे. चिंचेचा रस वापरुनही करता येईल (पुर्वी असे सार दिवाळीनंतर करत असत.)
गल्फ मधे खजूर भरपूर. तिथे आम्ही करकाटे (आंबाडीच्या बोंडाच्या सुकवलेल्या पाकळ्या) वापरुन असा प्रकार करायचो. त्या पाकळ्यांना सुंदर रंग आणि चव असते.
परवा हे सार करुन पाहिले. खुप
परवा हे सार करुन पाहिले. खुप मस्त होते या प्रकारे