Submitted by भानुप्रिया on 7 March, 2012 - 06:07
Hindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?
म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?
कायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
आणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे!
धन्नो!
गुलमोहर:
शेअर करा
लग्नाचं प्रमाणपत्र (marriage
लग्नाचं प्रमाणपत्र (marriage certificate) म्हणजेच लग्न झाल्याचा पुरावा ही एकमेव गोष्ट कायद्याला पुरेशी असते.
>>लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
यासाठी वेगळा धागा काढा.
धन्नो!>>>> भाग धन्नो
धन्नो!>>>>

भाग धन्नो तेरी इज्जत का सवाल है
जाउ देत हा माझा प्रांत
जाउ देत
हा माझा प्रांत नाहिये'
अनुनभवी आहे मी
@
@ मंदार_जोशी:
>>>>>>>>>>>>>>>>>>>" >>लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
यासाठी वेगळा धागा काढा. "
मी स्त्रीवादी विचारसरणीच्या जवळपास आहे..त्यामुळे माझी भांडाभांडी होईल वेगळा धागा काढला तर..
अन् हे वाक्य इथे मी rhetorical question म्हणून लिहिलंय!
भानुप्रिया
भानुप्रिया
कालच म टा मधे ह्या विषयाशी
कालच म टा मधे ह्या विषयाशी संबंधीत लेख वाचला. ही लिंक.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12152728.cms
लग्नानंतर स्त्रीने नाव बदल
लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?>>>>>>> नाही
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?>>>>> हो
म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?>>>>>> हो
भानुप्रिया हे लग्नाच्या आधीचं नाव व लग्नानंतर बदलुन 'धन्नो' असं हाये का?
वरच्या प्रतिसादातील तीनही
वरच्या प्रतिसादातील तीनही उत्तरांशी असहमत
जरी पटत नसले तरी सद्ध्याच्या
जरी पटत नसले तरी सद्ध्याच्या प्रचलित गोष्टींनुसार वरच्या प्रतिसादातील तिनही उत्तरांशी सहमत
कारण नाव बदलल्यामुळे बर्याच गोष्टी सोप्या होतात (अर्थात यामधे फक्त आडनाव गृहित धरले आहे)
नव्या कायदेशीर तरतुदी मला
नव्या कायदेशीर तरतुदी मला माहित नाहीत. (हि चर्चा इथे झाली होती आधी.)
फक्त २ मुद्दे (जुनेच)
१) नाव बदलायचे ठरवले तर सगळीकडे नवे नाव लावा. एका ठिकाणी जूने नाव आणि दुसरीकडे नवे नाव असे करु नका. माझ्या अपुर्या माहितीप्रमाणे, हा
कायदेशीर गुन्हा आहे. बहुतेक इनपर्सोनेशन असे काहितरी म्हणतात याला.
२) नवर्याचे आणि बायकोचे आडनाव वेगळे असेल, तर काही देशांचा व्हिसा मिळण्यास किंवा त्या देशात वास्तव्य करण्यात, अडचणी येऊ शकतात.
यामधे फक्त आडनाव गृहित धरले
यामधे फक्त आडनाव गृहित धरले आहे>>> अर्थातच. हिंदु धर्मात लग्नानंतर नाव म्हण्जेच आडनाव बदलले जातेच. त्यात आक्षेप घेण्यासारखं मला तरी काही वाटतं नाही. बर्याच गोष्टी सोप्या आणि रीतसर होतात.
तुम्हाला नाव की आडनाव बदलण्याचा निर्णय स्त्रीला असावा असे अपेक्षीत आहे भानु?
१. लग्ना नंतर आपले नाव काय
१. लग्ना नंतर आपले नाव काय असावे हा सर्वस्वी त्या स्त्रीचा निर्णय असतो.
२. लग्नात नाव बदलले ( कधी कधी वडिलधार्यांच्या आग्रहामुळे करावे लागते), तरी मॅरेज सेर्टीफिकेट च्या अॅप्लीकेशन मध्ये जर जुनेच नाव ठेवले तरी चालते. ( माझ्या चुलत बहिणीने असेच केले)
३. मॅरेज सेर्टीफिकेट वर जे कोणते नाव्/आडनाव असेल, त्या प्रमाणे त्या स्त्री चे नाव कायद्या प्रमाणे मान्य होते. तुम्ही जर नवे नाव बदलुन घेतले किंवा मॅरेज सेर्टीफिकेट दाखवुन इतर दाखला नव्या नावाने घेतला, तरच नाव बदलते. ह्यात कायदेशीर अडचण काहीच नाही.
४. नवर्याच्या माल्मत्ता व इतर प्रॉपर्टी वर तिचा हक्क कायमच रहातो. त्यात काहिच कायदेशीर अडचणी नाही. माझ्या ऑफीस मध्ये रोज अशा केसेस येतात.
कायदा व्यक्ती ला ओळखतो. खरेतर अशा अनेक इंडस्ट्रीयालिस्ट लोकांच्या मुली आहेत ज्या लग्ना नंतरही जुनेच नाव कायदेशीर रित्या वापरतात. तेंव्हा कायद्याने अडचण काहीच नाही.
एक नुसते अॅफीडेव्हीट केले तरी पुरते.
मो कि मी, माझ्या पोस्टमधे
मो कि मी, माझ्या पोस्टमधे काही चुकीची माहिती वाटली तर दुरूस्त कर प्लीज.
भानुप्रिया,
१. भारतीय संविधानाप्रमाणे १८ पूर्ण म्हणजे सज्ञान असलेल्या व्यक्तीला आपले नाव व आडनाव काय असावे हे ठरवण्याचा अधिकार आहे. याच अधिकारामुळे कुणीही व्यक्ती आपले जन्मापासून असलेले नाव वा आडनाव स्वखुषीने इतर कुठलेही कारण न दाखवता कायदेशीरपणे बदलू शकते. तसेच याच अधिकारामुळे जन्मापासून असलेले नाव वा आडनाव स्वखुषीने आहे तेच ठेवता येते.
२. कुठलाही विवाह कायदा हा अधिकार नाकारू शकत नाही.
३. नाव बदलल्यास सर्व कागदपत्रांवर अॅफिडेव्हिट करून बदललेले नाव लावून घेणे अत्यावश्यक. बदललेले नसल्यास ती खिटपिट नाही. निवड तुमची आहे मात्र दोन्हीपैकी एकच निवडणे क्रमप्राप्त आहे. काही कागदपत्रे माहेरच्या नावाची आणि काही सासरच्या ही गोष्ट अनवधानाने/ निष्काळजीपणे घडली तरी तो गुन्हा आहे.
४. भारतात तरी कुठेही मॅरेज सर्टिफिकेट आणि पासपोर्ट यामधे योग्य नोंद असेल तर केवळ नवर्याचे आणि बायकोचे आडनाव वेगळे आहे या कारणास्तव कायदेशीर प्रॉब्लेम येत नाही.
आपले पासपोर्ट ऑफिस याबाबतीत
आपले पासपोर्ट ऑफिस याबाबतीत पुढारलेले आहे.
नवर्याचे आडनाव वेगळे याबाबत कटकट तर सोडाच पण माझा पासपोर्ट रि-इश्यूचा फॉर्म आणि कागदपत्रे दाखल करून घेणार्या माणसाला कणभरही आश्चर्य वाटले नव्हते.
लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?<<<
भारतीय संविधान स्त्रीचा निर्णय मानते.
नाव नाही बदलले तरी चालते.
नाव नाही बदलले तरी चालते. जिथे नवर्याचा संबंध येईल, तिथे मॅरेज सर्टिफिकेट जोडा.
मोकिमी, निधप, जामोप्या यांनी
मोकिमी, निधप, जामोप्या यांनी लिहिल्याप्रमाणे खरेतर जुनेच नाव ठेवायला हरकत काही नाही, प्रोब्लेमही काही नाही पण जर नविन नाव लावले (आडनाव) तर अनेक गोष्टी सोप्या होतात (आता कोणकोणत्या असे विचारून अडचणीत आणू नका
)
पण जर नविन नाव लावले (आडनाव)
पण जर नविन नाव लावले (आडनाव) तर अनेक गोष्टी सोप्या होतात <<<
आता मला आलीच नाही कधी कायदेशीर अडचण तर का बरं विश्वास ठेवू यावर?
नीधप + १ माझ्या आईचं
नीधप + १
माझ्या आईचं नावसुद्धा तिच्या लग्नाच्या आधीचंच आहे. नोकरी, प्रवास, रिटायरमेंट, पेंशन इ. कोणत्याही ठिकाणी नावामुळे प्रॉब्लेम आला नाही.
नी +१ मलाही आजपर्यंत
नी +१
मलाही आजपर्यंत कुठल्याही कायद्याच्या व्यवहारात अडचण आलेली नाही.
नाव न बदलल्यास काही अडचणी येत
नाव न बदलल्यास काही अडचणी येत नाहीत या मुद्द्याशी सहमत.
बदलणे कटकटीचे आहे, म्हणून आम्ही दोघांनीही बदललेले नाही.
मी लग्नानंतर १० वर्षे बदलले
मी लग्नानंतर १० वर्षे बदलले नव्हते. आता पासपोर्ट रिन्यु करताना बदलले स्वतःच्याच इच्छेने.
आधि बदलणार नव्हते पण मला एकदा नवर्याने पॉवर ऑफ अॅटर्नी दिली असताना देखिल फन्ड कॅश आउट करुन माझ्या चेकिंगमध्ये ट्रान्सफर करताना मॅरेज सर्टिफिकेट न्यावे लागले. काम झाले पण एक दोन खेपा उगाच पडल्या.
आजुन असा एकदा अनुभव आला. मी माझ्या मुलीची पॉलिसी घेतली माझ्या एका माहेरच्याच नातेवाइकाकडुन. त्यात तिला बरेचदा बजाउन सांगउन पण तिने पॉलिसीवर माझे सासरचे नाव टाकले मग पुन्हा ICICI च्या खेपा झाल्या.
मला आडनावाने काही फरक पडत नाही आणि निलिमाक्षी अशा नावात माशी असलेल्या नावाचे निलिमा पण करायचे होते मग टाकले पुर्ण नाव बदलुन.
एक प्रश्न लग्नापूर्वीचे
एक प्रश्न लग्नापूर्वीचे कगदपत्रे, जसे ड्रायव्हिंग लायसंस, मतदान ओळखपत्र, हे आधीच्या नावाने म्हणजे आडनाव लग्नापूर्वीचे) आणि पॅन कार्ड्वर लग्नानंतरचे आडनाव तर काही कयदेशीर गुन्हा वगैरे ठरतो की काय?
एक प्रश्न लग्नापूर्वीचे
एक प्रश्न लग्नापूर्वीचे कगदपत्रे, जसे ड्रायव्हिंग लायसंस, मतदान ओळखपत्र, हे आधीच्या नावाने म्हणजे आडनाव लग्नापूर्वीचे) आणि पॅन कार्ड्वर लग्नानंतरचे आडनाव तर काही कयदेशीर गुन्हा वगैरे ठरतो की काय?
>>
नाही कायदेशीर रित्या काहीच त्रास नाही. लोकच अडवणुक करु शकतात (मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाचे फोटो बरेचदा बरोबर न्यावे लागतात). कधी कधी कायद्याची योग्य जाण असलेले लोक भेटले तर सुखद धक्का मिळुन काम पण व्यवस्थित होते. ड्रायव्हिंग लायसंस मात्र बदललेला बरा.
सगळी कागदपत्रे एकाच नावाने
सगळी कागदपत्रे एकाच नावाने असायला हवीत.
लग्नानंतर नाव बदलले तर सगळ्या सरकारी कागदपत्रात ते बदलून घ्यावे लागते. (नाहीतर कायद्याचा भंग ठरतो.)
नाव (नाव + आडनाव) बदलणे वा न
नाव (नाव + आडनाव) बदलणे वा न बदलणे हा संपूर्णपणे मुलीचा प्रश्न आहे. नाव बदलणार असाल तर सर्व ठिकाणी (पॅन, बँक, पासपोर्ट इत्यादी) बदला. माझ्या मते मुळात नाव बदलणे हा भंपकपणा आहे आणि ह्या सर्व कागदपत्रांवर नाव बदलणे कटकटीचे आहे.
पासपोर्ट वर नवरा व बायको आपल्या जोडीदाराचे नाव दाखल करून घेउ शकतात. त्यासाठी नवीन पारपत्र दिले जात नाही. त्याच पारपत्रावर एक शिक्का मारून जोडीदाराचे नाव दाखल करून घेतले जाते. ते इतर देशांचा विसा मिळवताना पुरेसे होते.
वर दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे मीदेखील असे ऐकले आहे की काही देशात (बहुदा सौदी वगैरे) बायकोचे आडनाव व नवर्याचे आडनाव वेगळे असल्यास विसा मिळण्यास त्रास होतो/मिळत नाही. पण ह्याबाबत नक्की माहिती नाही. पण इतर बहुसंख्य देशात कसलाही त्रास होत नाही.
काही शाळातून आईचे नाव का वेगळे वगैरे मुद्दे काढून त्रास दिल्याचे ऐकले आहे. अनुभव नाही.
माझे नाव बदललेले नाही.
माझे नाव बदललेले नाही. आत्तापर्यंत तरी कुठेच कसलाही त्रास झालेला नाही. आमच्याकडे तर मी, नवरा आणि मुलगा तिघांचे आडनाव वेगवेगळे आहे. (मुलाला आमच्या गावाचे नाव लावले आहे.) तरीसुद्धा खूप काही अडचण आली नाही. अॅडमिशनच्या वेळी एका शाळेत कागदपत्र तपासताना फक्त याचं आडनाव वेगळं कसं एवढं विचारलं होतं. कारण सांगितल्यावर ठिक आहे म्हणाले. पासपोर्ट साठी पण काही त्रास झाला नाही.
मी लग्नानंतर नाव/आडनाव/मधले
मी लग्नानंतर नाव/आडनाव/मधले वडिलांचे नाव हे काहीही बदललेले नाही. लग्नानंतर पासपोर्ट, विसा, US मधील शिक्षणाची कागदपत्रे, लायसन्स, हे सगळं काही माहेरच्याच नावावर झालेल आहे. कायदा, किंवा एकंदरित सारी प्रक्रिया यामधे कुठेही अडचण नाही आली. त्रास झाला तो फक्त लोकांच्या दॄष्टीकोनाचा - तो ही फक्त भारतात. माहेरच्या वडिलोपार्जित इस्टेटिची वाटणी होताना माझे वडील निवर्तले. आम्हा बहिणींची आणि आईचे नाव लागले. काकांनी परस्पर माझे सासरचे आडनाव लावून सगळी कागदपत्रे सुरू केली. मी भारतात गेल्यावर मी त्या नावावर सही करण्यास नकार दिला कारण ते माझे नाव नाही. यावर काय वादावादी झाली रे देवा!! आणि सरकारी ऑफिसांमधे वरचे अधिकारी बर्यापैकी मदत करतात - वेगळे नाव असले तरी काही अडचण नाही येत. पण हाताखालची क्लार्क मंडळी उपदेशांनी भंडावून सोडतात.
परदेशात त्यामानाने घरी बसून होते.
बदला किंवा न बदला पण एकच नाव वापरा - एकीकडे एक दुसरीकडे मिक्स असलं काही धेडगुजरी करू नका. तो गुन्हा आहे. भारतात आणि अमेरिकेमधे सुद्धा. माझ्या काही मैत्रिणींना बरीच कागदपत्रांची उलथापालथ करावी लागली आहे आणि हो, नाव बदलण्याबाबत इमोशनल होउ नका. नाव बदलून घेणे हे भारतात तरी कटकटीचे काम आहे. काही दिवस हेलपाटे घालावे लागतात.
लग्नाच्या सर्टिफिकेट वर आणि
लग्नाच्या सर्टिफिकेट वर आणि वधू दोघांचे लग्नापूर्वीचे नाव द्यावे लागते. लग्नात नाव बदलले तरी कायदेशीर पद्धतीनेच नाव बदलावे लागते आणि राज्यशासन राजपत्रात जुने आणि नवीन नाव प्रसिद्ध करावे लागते... फक्त लग्नाचं सर्टिफिकेट चालत नाही...
पासपोर्ट वर नवरा व बायको
पासपोर्ट वर नवरा व बायको आपल्या जोडीदाराचे नाव दाखल करून घेउ शकतात. त्यासाठी नवीन पारपत्र दिले जात नाही. त्याच पारपत्रावर एक शिक्का मारून जोडीदाराचे नाव दाखल करून घेतले जाते. ते इतर देशांचा विसा मिळवताना पुरेसे होते. >> हे आता बंद झाले आहेत... मुंबई/ ठाणे मध्ये तरी... Spouse चे नाव दाखल करायचे असेल/ घरचा पत्ता बदल करायचा असेल तर नवीन पारपात्र घ्यावे लागते...
संपादित
संपादित
Pages