स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 March, 2012 - 01:37

लेकीची फरमाईश......स्टोल.....काळ्या रंगाचा....!!
वाढदिवस पण जवळ आलेला..........मग नाही कसं म्हणणार....... Happy
आणला दोरा आणि केली सुरवात....

DSC00497.JPGDSC00496_0.JPGDSC00501_0.JPGDSC00507.JPG

लेक खुश होईल असं वाटतंय Happy

गुलमोहर: 

खूप च छान दिसत आहे स्टोल.
हा धागा कोणता आहे ? मला इकडे तसा धागा दिसला नाही. भारत मधून मागवावा लागेल कि काय ?
एकसारखी वीण येण्याकरता काही युक्ती आहे का ?

फार छान झालाय जयावी. आवडला. त्यात थोडे स्पार्कली टिकल्या किंवा बीड्स अ‍ॅड केले तर आणखी मस्त दिसेल.

वॉव!! सुंदरच झालिये स्टोल Happy

मम्माज डियर डॉटर एकदम खुष होणार Happy वाढदिवसाच्या शुभेछा लेकीला Happy

सीमा +१

वॉव्,जयश्री.. सुरेख झालाय्..एकदम स्टायलिश!!!!
लेक खूश झाली असेल अगदी!!

किती भरभरुन कौतुक करताहात सगळे...... !! मनापासुन धन्यवाद लोक्स Happy खूप खूप सुखावलेय Happy

अबोली, पारुबाई...... मी इथे मिळणारा बॅबिलो चा १० नंबरचा दोरा वापरलाय आणि ट्युलीपची १.५ मी.मी ची क्रोशे सुई वापरलीये. हाच दोरा मी टॅटींग साठी सुद्धा वापरते.

पारुबाई.... तिकडे सुद्धा शोध ..नक्की मिळेल. इथे कुवेतला "बराकत" म्हणून फार सुरेख दुकान आहे. त्याच्या भरपूर शाखा पण आहेत. सगळं भरतकाम, वीणकाम, क्राफ्ट, पेंटींग, शिवणकाम........अशा सगळ्या गोष्टींचं सामान मिळतं. तिकडे गेलं ना.......की वेडं व्हायला होतं...... !!

सीमा.........हो गं...... खरंय तुझं..... काळ्या टीकल्या वगैरे लावल्या तर अजून छान दिसेल....कल्पना आवडेश Happy

आणि हो............. लेकीला खूप आवडला बर्का Happy

जयश्रीतै तुम्हाला __/\__
हे असं बघून आपल्याला आयुष्यात कधी असलं काही जमेल असं वाटत नाही.
(आता मी विचार करत्येय की अस्लं कै पण बघायचं नै, फारच inferiority complex निर्माण होतो!) Wink

शांकली....... कमाल करतेस हं तू. अगं कॉम्प्लेक्स कशाला ...... !!
धावपळीच्या आयुष्यात सगळीकडे वेळ देता येत नाही. आता आम्ही त्यामानाने बरेच मोकळे आहोत त्यामुळे राहून गेलेल्या आवडत्या छंदासाठी आता वेळ देता येतो.....दुसरं काय !!
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं अतिशय सोप्पं आहे .... फक्त पेशन्स हवा Happy

जयवी, खुप सुंदर झालाय स्टोल Happy

इथे कुवेतला "बराकत" म्हणून फार सुरेख दुकान आहे. त्याच्या भरपूर शाखा पण आहेत. सगळं भरतकाम, वीणकाम, क्राफ्ट, पेंटींग, शिवणकाम........अशा सगळ्या गोष्टींचं सामान मिळतं. तिकडे गेलं ना.......की वेडं व्हायला होतं...... !! >>>> हे तर काहीच नाही ! Wink आमच्या भुलेश्वरला तर अख्खं मार्केटच्या मार्केट आहे आणि वेडं होऊन हॉस्पिटलात जावं लागायच्या आधी तिथून सटकावं लागतं Proud

.
.
("हे तर काहीच नाही !" हे वाक्य आर्चच्या लेखावरुन हुरुप येऊन लिहिलंय बरं का Happy )

अश्विनी, बेफिकीर, मोनाली, जयु, धन्यवाद Happy
अश्विनी........ ये भी खूब रही Happy
मोनाली.......नाही ........हे क्रोशे वर्क आहे.

Pages