चिकन ब्रेस्ट - सुमारे अर्धा पाउंड - थोडे कमी जास्त चालते
न्योकी- १ बोल - हे एक प्रकारचे डंपलिंग असतात. सुपर मार्केट मधे फ्रोझन किंवा कुक्ड पास्ता सेक्शन मधे मिळतात.लहान आकाराचे बघून घेणे, साधारण सांडग्याच्या आकाराचे
लाजोने इथे रेसिपी दिल्याप्रमाणे न्योकी घरीही करता येतात.
न्योकी असे दिसतात
हाफ न हाफ मिल्क किंवा साधे दूध + क्रीम - २ कप
चिकन ब्रॉथ - २ कप
कांदा बारीक चिरून - पाउण वाटी
लसूण बारीक केलेला - १-२ लहान पाकळ्या
सेलरी बारीक तुकडे करून - अर्धी ते पाउण वाटी
गाजर बारीक पातळ चकत्या किंवा जूलियन कट करून - १ वाटी
पालक - मूठभर पाने
फ्लेवर साठी- पार्स्ली किंवा इटालियन हर्ब मिक्स किंवा इटालियन सीझनिंग , मिठ, मिरी पावडर , जायफळ पावडर,
२ चमचे कॉर्न फ्लावर किंवा साधी कणिक
बटर २ चमचे, ऑलिव ऑइल २ चमचे
ऑलिव्ह गार्डन (अमेरिकेतले एक चेन रेस्टॉ.))मधे हे सूप अगळ्यात आधी चाखून पाहिलं आणि आवडलं होतं.
मग नेट वर शोधा शोध करून एक दोन रेसिप्या ट्राय केल्या. ही रेसिपी सगळ्यात त्या चवीच्या जवळ जाणारी वाटली. यात माझे श्रेय खरे तर फार काही नाही. करून पाहणे इतकेच!
पूर्वतयारी-
चिकन उकडून घेणे- त्याचे उकळलेले पाणीच ब्रॉथ ऐवजी वापरू शकता
न्योकी थोडे मीठ घातलेया पाण्यत उकळून मऊ होईपर्यन्त शिजवून बाजूला ठेवा. फार वेळ उकळायची गरज नाही.
जाड बुडाच्या भांड्यात बटर + ऑलिव ऑइल मध्यम आचेवर गरम करा. त्यात चिरलेला कांदा, लसूण पारदर्शक होइपर्यन्त परता. त्यात गाजराचे आणि सेलरीचे तुकडे घालून अजून थोडे परता. आता गॅस ची आच मंद करा. थोडे कॉर्न फ्लावर किंवा साधी कणिक २-३ चमचे घालून नीट हलवून घ्या. मग चिकन ब्रॉथ,उकडून लहान तुकडे केलेले चिकन आणि हाफ अॅन्ड हाफ दूध घालून उकळी येइपर्यन्त हलवत रहा. दूध आणि ब्रॉथ चे प्रमाण थोडे कमी जास्त करून कन्सिस्टन्सी हवी तशी ठेवा. हे सूप तसे घट्ट असते, साधारण पिठल्याइतके किंवा किंचित पातळ. पण करून झाल्यावर थोड्या वेळाने अजून घट्ट होते त्यामुळे आत्ता थोडे अजून पातळ ठेवले तरी चालेल. उकळी आल्यावर न्योकी घाला. आता पार्स्ली, ( फ्रेश नसेल तर ड्राय इटालियन सिझनिंग मिळते ते वापरू शकता) मीठ- मिरी पावडर, चिमूट भर जायफळ पावडर (हे मला इन्टरेस्टिन्ग वाटले होते, पण त्याचा फ्लेवर फार मस्त येतो सूप ला. जायफ्ळ नव्हते म्हणून मी एकदा चक्क वेलदोडा पावडरही वापरली होती , वर्क्ड वेल! )घाला, वरून जरासा ओबड धोबड तुकडे केलेला पालक घाला, अन थोडा वेळ अजून उकळू द्या. दोन तीन मिनिटांनी बंद करून झाकण ठेवा अन थोडे मुरु द्या.
आता बेस्ट पार्ट सूप नीट हलवून बोल मधे ओतून वरून हवे तर थोडे पार्मेजान चीज घालून आवडीच्या डीनर रोल/ पाव बरोबर गरमागरम एन्जॉय करा !!
* एक टिप - माकाचु मोमेन्ट अॅक्चुअली - मला - सहसा बहुतेक देशी लोकांना कांदा लसूण सढळ हाताने वापरायची सवय असते. इथे तसे अज्जिबात करू नये! स्वानुभव! कांदा - लसूण जास्त पडले तर यात मुळीच चांगले लागत नाही!
फारच मस्त पाककृती मै. आजच
फारच मस्त पाककृती मै. आजच करून बघते. न्योक्की विकत आणायला लागेल.
सहीच रेसिपी. मलाही ऑलिव्ह
सहीच रेसिपी. मलाही ऑलिव्ह गार्डनमधलं न्योकी सूप फार आवडलं होतं. आता घरी करुन बघता येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही आहे रेसिपी. एक मित्र
सही आहे रेसिपी. एक मित्र न्योकी घरी करतो नेहमी. त्याच्याकडनं थोडा वानोळा आणून करणेत येईल
यम्मी !! खतरा दिसतंय , करून
यम्मी !! खतरा दिसतंय , करून बघण्यात येईल
.
अवांतर :- जायफळाची पूड व्हाईट सॉसबरोबर छान मॅच होते , इतर कोणत्याही उदा. ब्रोकोली सूपमध्ये किंवा कॅनलोनी मध्ये सुद्धा जायफळाची चव मस्त लागते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ही लेकीकरता थोड्या
मी ही लेकीकरता थोड्या प्रमाणावर करुन बघेन.
फोटो चांगलाय मै.
व्वा! न्योकी सूप मलापण आवडते.
व्वा! न्योकी सूप मलापण आवडते. मस्त दिसतयं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! आमच्या घरचे एकदम खूष
अरे वा! आमच्या घरचे एकदम खूष होतील ही रेसिपी बघून. त्यांना देणेत येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे सुप न्योकी शिवाय बनवलं तर?
हे सुप न्योकी शिवाय बनवलं तर? रेसेपी वरून तर हा प्रकार आवडेल असं वाटतंय. आता ह्याचं थोडं देसी व्हर्जन सुचवा बरं इथे करण्याजोगं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
न्योकी ऐवजी माझ्या मते
न्योकी ऐवजी माझ्या मते बटाट्याच्या लहान फोडी घातल्या तर चालावे( गंंमत नाही खरेच म्हणत आहे
) चिकन मात्र हवेच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओके. करून बघते २-४ दिवसात.
ओके. करून बघते २-४ दिवसात.
न्योकी ही बटाटा, अंड व
न्योकी ही बटाटा, अंड व मैद्याचे गोळेच असतात. तेव्हा बटाटा चालू (पळू शकतो) शकतो. घरी बनवू शकता.
मला सांगितलेले एकीने की उकडलेल्या बटाट्यात एक अंडे व मावेल तितके पीठ टाकून उकळत्या पाण्यात टाकून शिजवून घ्यायचे.
न्योकी न घालता करुन बघणार
न्योकी न घालता करुन बघणार पेक्षा चिकन मेंब्रांना करायला लावणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त! मी न्यॉकी घरी करते.
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी न्यॉकी घरी करते. रेसिपी टाकु का?
नेकी और पूछ पूछ
नेकी और पूछ पूछ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
न्योकीची मजा बटाट्याने येणार
न्योकीची मजा बटाट्याने येणार नाही पण न्योकी घरी बनवणे सहज शक्य आहे. त्यात बटाटा, अंडं, मैदा, मीठ, मिरपूड हेच जिन्नस असतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, सचित्र रेसिपी लिहीच
सायो, अगो लिहीते... अत्ता
सायो, अगो लिहीते...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अत्ता फक्त रेसिपी लिहीते. या विकेंडला करुन मग तीस सचित्र करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं दिसतंय. लाजोची न्योकी
मस्तं दिसतंय.
लाजोची न्योकी रेसिपी आली की करून बघणार.
तीस कशाला एकच चित्र बास
तीस कशाला एकच चित्र बास![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडे
सिंडे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33271
इथे न्योकी/न्यॉकी पाकृ लिहीली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा. मस्त सूप. आजच करते.
अरे वा. मस्त सूप. आजच करते.
बादवे, हा कुठला प्रकार? नावावरून जपानी वाटतोय. नाहीतर न्युयॉर्कीचा शॉर्टफॉर्म वाटतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
न्योकी इटालियन आहे. असं
न्योकी इटालियन आहे. असं स्पेलिंग आहे त्याचं : Gnocchi
Curious George मधल्या मांजरीचं नाव न्योकी आहे.
धन्यवाद राखी. देवा! ही
धन्यवाद राखी. देवा! ही स्पेलिंग्ज आणि त्यांचे उच्चार अजून पाठ सोडत नाहीत.
भारी दिसतंय सूप. तोंपासु!!
भारी दिसतंय सूप. तोंपासु!!
ह्म्म्म भारी
ह्म्म्म भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान, याच्या बरोबर इतर मेनु
छान, याच्या बरोबर इतर मेनु काय केला होता
?
तोंपासू आहे सुप अगदी! आता
तोंपासू आहे सुप अगदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता अगोदर लाजोने लिहिलेली न्योकी ची रेसिपी वाचते, मग हा सूप ट्राय करेन...
आज न्यॉकी सूप (वेजिटेरियन)
आज न्यॉकी सूप (वेजिटेरियन) आणि घरी केलेला ब्रेड असं कॉम्बो आहे लंचला. सूपाच्या रेसिपी बद्दल धन्यवाद.
सूप अगदी सुरेख दिसतं आहे.
सूप अगदी सुरेख दिसतं आहे.
हे माझं व्हेज न्योकी सूप. सेम
हे माझं व्हेज न्योकी सूप. सेम रेस्पी वापरली. फारच चविष्ट झालं होतं. सुपात मशरूम्स, गाजरं आणि ब्रोकली आहे. बरोबर घरी बेक केलेला कणकेचा ब्रेड :
Pages