Submitted by Geetanjalee on 2 March, 2012 - 06:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पडवळ , बेसन , लाल तिखट अंदाजे २ चमचे ,गरम मसाला १ चमचा ,मीठ घालावे. १ लहान चमचा हळद, १ टेबलस्पून धणे-जिरे पावडर, २ चमचे तेल ,आल लसून पेस्ट
क्रमवार पाककृती:
पडवळ मधून उभे कापून आतील बी काढून टाका.......
नंतर त्याचे पातळ तुकडे करून तेलावर थोडासा रंग बदलेपर्यंत खरपूस परतून घ्या....
फोडणी: १ चमचा तेलात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी द्यावी, आल लसून पेस्ट पण घाला...
परतलेले पडवळ घालून थोडेसे वाफेवर शिजुद्यात ...... थोडस तेल जास्त असुदे .....
वरून बेसन पीठ टाकून परता ....छान लागते....किंवा भिजलेली हरभरा डाळ घालून पण करतात....
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला प्रकार. पडवळाला असे
चांगला प्रकार.
पडवळाला असे नटवावे लागतेच, त्याशिवाय चव येत नाही.
मी अजुन एकदाही कधी खाल्ल
मी अजुन एकदाही कधी खाल्ल नाही. पडवळ ..हे नककी करुन पाहेन
वालाची डाळ मिळते.[तूर
वालाची डाळ मिळते.[तूर डाळीसारखी]ती १५-२० मिनिटे गरम पाण्यात भिजवुन ठेवायची फोडणीला आधी ही भिजवलेली डाळ घालुन थोडी शिजवायची नंतर पडवळ घालुन थोडी धने-जिरेपुड घालुन झाकणावर आधणाचे पाणी ठेवुन भाजी शिजवायची .सगळ्यात शेवटी भाजी शिजल्यावर गरम मसाला घालायचा..वेगळी चव येते.
केटरर लोक पदवल किसून
केटरर लोक पदवल किसून कोशिम्बीर कर्तात. काकदि महाग आस्ते.म्हनुन भरिला पदवल घाल्तत.
हो, अशी भाजी छान होते. मी पण
हो, अशी भाजी छान होते. मी पण अशीच करते. कधीतरी गोडा मसाला पण टाकते. इकडच्या पडवळाची चणाडाळ घालुन भाजी अजिबात चांगली होत नाही . कारण या इकडच्या पडवळांना काहिच चव नसते.
धन्यवाद ,,,,,,, सुलेखा, तुमची
धन्यवाद ,,,,,,,
सुलेखा, तुमची रेसिपी पण छान वाटते,....नक्कि करुन पाह्ते....