Submitted by Geetanjalee on 2 March, 2012 - 06:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१०-१२ टोमॅटो ,५-६ कांदे ,१०-१२ लसूण, मिरे पूड, फ्रेश क्रीम, दिड चमचा साखर,चवीपुरते मिठ
क्रमवार पाककृती:
टोमॅटो , कांदे , लसूण मोठे चिरून कुकर मध्ये अगदी थोडेसे पाणी घालून उकडून घ्या .
थंड झाले की मिक्सरवर वाटून घ्यावे, ही चाळणीवर गाळून घ्यावी, गाळलेले मिश्रण पातेल्यात घ्या .
त्यात मीठ , साखर, आणि मिरेपूड घालून चांगले उकळावे . वरून क्रीम हवे तसे घालावे . आणि ............
गरम गरम पिऊन टाकावे
वाढणी/प्रमाण:
अस कस सांगणार ???
माहितीचा स्रोत:
जाऊबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गीतांजली, ह्या पद्धतीने सूप
गीतांजली, ह्या पद्धतीने सूप केले. छान झाले होते. कांदा उकडायला विसरले, मग सालासकट गॅसवर साल काळी होईतो भाजून मग वाटले.
नक्कीच करुन बघेन.
नक्कीच करुन बघेन.
यात गाजर/ टोमॅटो/ बीटरूट/ लाल
यात गाजर/ टोमॅटो/ बीटरूट/ लाल भोपळा अॅड करु शकतो
हो अमि. मी नेहमी बीट नाहीतर
हो अमि. मी नेहमी बीट नाहीतर गाजर आणि इल्लुसं आलं घालून करते. सायोने लिहीलं होतं वाट्टं असं कुठेतरी.
पण आज ह्या रेस्पीने वेगळी चव आली. आवडली.