'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
=======================================================================
=======================================================================
एव्हाना सुधीरने (विवेकचा भाऊ) आम्हाला निवतीच्या समुद्रात नेण्यासाठी बोट तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही "निवतीच्या समुद्रात"सफर करण्यास निघालो". या समुद्रसफरीचे वैशिष्ट्ये होते ते "निवती रॉक्स". निवती समुद्रकिनार्यापासुन काही अंतरावे मोठ मोठे खडक आहेत. या समूहालाच "निवती रॉक्स" म्हणतात. या खडकांभोवती समुद्रात अनेक ठिकाणी खडकांची टोके वर आलेली आहेत. रात्री हा परिसर बोटींसाठी धोकादायक तर आहेचः परंतु दिवसाही नेमकी माहिती असल्याशिवाय येथून बोटी नेणे धोक्याचे ठरते. जळून गेल्यानंतर खडक जसा काळा दिसतो तसेच दिसत असल्याने यास "बर्न्ट आयलंड" असेही म्हणतात. सुमारे दोन तासाच्या या समुद्रसफरीत आम्ही भोगवे बीच, देवबागचा किनारा आणि निवती किल्ल्याजवळुन फिरून आलो.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
निवती रॉक्स
प्रचि ०६
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
निवती किल्ला
प्रचि १८
किल्ले निवती
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
भोगवेचा समुद्रकिनारा
प्रचि २४
मेढा निवती गाव समुद्रातुन
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
सुमारे दोन तास समुद्रात मनसोक्त भटकुन आल्यावर आम्ही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. तोपर्यंत वैनींनी दुपारच्या जेवणात ताज्या फडफडीत माशांचा बेत केला होता. "कोकणात जाताना "कालनिर्णय" घरीच ठेवून जा" हा मायबोलीकर निलवेदचा सल्ला लक्षात ठेवून सौंदाळे, बांगडा फ्राय, तिखलं कालवं यावर सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला. मीही यावेळी पहिल्यांदाच तळलेला संवदाळ आणि बांगडा मासा खाल्ला आणि आवडला
प्रचि २८
जेवणानंतर थोडावेळ आराम करून आम्ही वेंगुर्ल्याला निघालो.
(क्रमशः)
" जरा आंतली बॅटरी चार्ज करून
" जरा आंतली बॅटरी चार्ज करून येतंय ", असं माझा एक मित्र म्हणाला कीं ओळखावं, याच्या खिशात कोकणाचं एस्टी नाही तर कोकणरेल्वेचं तिकीट आलंय ! कां, तें या प्र.चिंवरून कळतंच !!!
धन्यवाद, जिप्सीजी.
आहाहा ! निवले डोळे अगदी
आहाहा ! निवले डोळे अगदी !
भुकेल्यापोटी प्रचि २८ बघू नका अशी एक टिप टाक रे
७,१०,१३,१६ भारी !
१६ वर घर बांधावं का ? ( लहानपणीचे व्यापार आठवले )
मस्त , धन्यवाद जिप्सी !
सुंदर प्रचि.... मासे तर लय
सुंदर प्रचि.... मासे तर लय टेस्टी दिसतायेत....
मस्त. २रा फार आवड्ला.
मस्त. २रा फार आवड्ला.
कोकणात जाताना "कालनिर्णय"
कोकणात जाताना "कालनिर्णय" घरीच ठेवून जा" >>> आणि फोटो बघताना 'निर्णय' बदलून टाका. :p
मस्तच, जिप्या भोगवेचा किनारा
मस्तच,
जिप्या भोगवेचा किनारा तर अप्रतिम
खुप छान.. कालच भराडीदेवीच्या
खुप छान..:)
कालच भराडीदेवीच्या जत्रेसाठी आंगणेवाडीला जावुन आलो.. शनिवारी यात्रा झाल्यावर रविवारी निवती आणि वेंगुर्ला असा बेत होता.. पण वाटेत कर्लीची खाडी आणि धामापुर लागले.. आणि बघता बघता अर्धा दिवस तिथेच सरला.. आता नेक्स्ट ट्रिप मध्ये निवती नक्की..:)
जिप्स्या एकदम सहीच!!! आवडेश.
जिप्स्या एकदम सहीच!!! आवडेश.
लै भारी जिप्सी शेट!!! भन्नाट
लै भारी जिप्सी शेट!!!
भन्नाट झालीय तुझी कोकण ट्रिप.
प्रचि नेहमी प्रमाणेच सुंदर!!!
भाऊकाकांनू, फोटो बघतांना
भाऊकाकांनू, फोटो बघतांना डिस्चार्ज व्हायला होतंय!! ..आता लवकरच आतून चार्ज होऊक जांवचा लागात.
जिप्सी, बर्न्ट आयलंड म्हणजे निवतीच्या समोर समुद्रात जे दिपगृह दिसते तो खडकसमुह. आसपासच्या खडकांना वेंगुर्ला रॉक्सही म्हणतात. निवतीच्या जवळ आहेत ती निवती रॉक्स!
या वेंगुर्ला रॉक्स वर स्विफ्ट पक्ष्यांची घरटी भरपूर आहेत. त्या घरट्यांना विदेशात भरपूर मागणी आहे. बहुधा त्याचा 'सूप' मध्ये वापर होतो असं वाचल्याचं आठवतंय. त्यासाठी या घरट्यांची तस्करी चालायची. पुण्याच्या पक्षीमित्र सतिश पांडेंनी सहकार्यांच्या व इथल्या कोळी बांधवांच्या मदतीने या प्रकाराला वाचा फोडली.
आत्यंतिक सुंदर प्रचिंसाठी तुला खूप खूप धन्यवाद!!
छान फ़ोटो
छान फ़ोटो
मस्त रे प्रचंड सुंदर किनारे
मस्त रे प्रचंड सुंदर किनारे तितक्याच सुंदर प्रचि आवडेश
जिप्स्या, माझा झब्बु - निवती
जिप्स्या, माझा झब्बु -
निवती रॉक्स -
निवती बीच -
जिप्सी,निवती रॉक्स चे सुंदर
जिप्सी,निवती रॉक्स चे सुंदर दर्शन घडवलेत.प्रचि २ मस्तच.समुद्राच्या जवळ राहात असले तरी वेगळ्या ठिकाणचा समुद्र भावतोच!
@अतुलनीय .. मस्त प्रचि.
त्याची निळी नवलाई त्याची निळी
त्याची निळी नवलाई
त्याची निळी अथांगता
अशा निळ्या प्रवासाची
कशी करतो सांगता?
कसे धजते रे मन
कसे निघतो तेथुन
कशी पाउले वळती
त्या निसर्गापासुन?
रिफ्रेशिंग!
रिफ्रेशिंग!
मस्त फोटो. काहीच टिपी नसेल
मस्त फोटो. काहीच टिपी नसेल तर निवतीला जाऊन या दगडांमध्ये झोपलेली मगर, सिंह. इ.इ. आकार शोधत निवांत बसावे.
आणि तो 'सौंदाळो' रे.. उगीच सवंदाळ वगैरे लिहुन त्याला मराठी रुपडे देऊ नकोस
मस्त रे... झकास
मस्त रे...
झकास फोटोज्...
च्या मारी तो माशाचा फोटो पाहून जाम भूक लागली...
असे फोटोज् टाकुन जळवत जाऊ नकोस...
>>भाऊकाकांनू, फोटो बघतांना
>>भाऊकाकांनू, फोटो बघतांना डिस्चार्ज व्हायला होतंय!>> अगदी अगदी!!
तरी पण मस्तच रे जिप्स्या. डोळे निवले अगदी
मस्त रे जिप्सी, फोटो बघून
मस्त रे जिप्सी, फोटो बघून झकास वाटलं.
एकदम झक्कास फोटोज !
एकदम झक्कास फोटोज !
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
" जरा आंतली बॅटरी चार्ज करून येतंय ", असं माझा एक मित्र म्हणाला कीं ओळखावं, याच्या खिशात कोकणाचं एस्टी नाही तर कोकणरेल्वेचं तिकीट आलंय>>>>भाऊकाका
मासे तर लय टेस्टी दिसतायेत>>>>खरंय. टेस्टीच होते.
भुकेल्यापोटी प्रचि २८ बघू नका अशी एक टिप टाक रे
असे फोटोज् टाकुन जळवत जाऊ नकोस...>>>>>:फिदी:
बर्न्ट आयलंड म्हणजे निवतीच्या समोर समुद्रात जे दिपगृह दिसते तो खडकसमुह. आसपासच्या खडकांना वेंगुर्ला रॉक्सही म्हणतात>>>>ओह्ह, धन्स हेम. तरी मी विचार करत होतो कि आधीच्या भागात तुझ्या प्रतिसादात निवती रॉक्स आणि वेंगुर्ला रॉक्स असं दोन वेगवेगळं का विचारतोयस. मी निवती रॉक्स म्हणजेच बर्न्ट आयलंड्/वेंगुर्ला रॉक्स समजत होतो.
इंद्रा
भन्नाट झालीय तुझी कोकण ट्रिप.>>>>अगदी, नीलुने म्हटल्याप्रमाणे जिवाचं कोकण करून आलो.
त्याची निळी नवलाई
त्याची निळी अथांगता
अशा निळ्या प्रवासाची
कशी करतो सांगता?>>>>>व्वाह मोनाली, मस्तच!!!.
अतुलजी, झब्बू मस्तच
आणि तो 'सौंदाळो' रे.. उगीच सवंदाळ वगैरे लिहुन त्याला मराठी रुपडे देऊ नकोस>>>भावनाओंको समझो
जिप्स्याचे फोटू पाहून डोळे
जिप्स्याचे फोटू पाहून डोळे निवती
छान प्रचि. आता ती
छान प्रचि.
आता ती पक्ष्यांच्या घरट्यांची तस्करी थांबली असे वाचले (गावकरीच आता जागृत झाले आहेत.) ती घरटी पक्षी आपल्या लाळेपासून करतात, आणि त्याचे सूपच करतात.
(काही वर्षांपूर्वी बँकॉकच्या विमानतळावर हि घरटी, शार्क फिन्स विकायला ठेवलेली
बघितली होती. अजूनही असतील !!)
मस्त ... झकास फोटोज्...
मस्त ...
झकास फोटोज्...
माशाचा फोटो पाहून जाम भूक लागली...
मी निवती रॉक्स म्हणजेच बर्न्ट
मी निवती रॉक्स म्हणजेच बर्न्ट आयलंड्/वेंगुर्ला रॉक्स समजत होतो.
जिप्स,! निवती रॉक्स, वेंगुर्ला रॉक्स आणि यो रॉक्स तिनही वेगवेगळे आहेत!!
सुंदर प्रचि.
सुंदर प्रचि.
<< भावनाओंको समझो >> कोणाच्या
<< भावनाओंको समझो >> कोणाच्या ? माशाच्या ?? त्या ताटातल्या बिचार्याला काय फरक पडतोय म्हणा, निदान आतां तरी, "संवदाळा"म्हटलं काय किंवा "सौंदाळा" !!
वॉव्..जिप्सी..मस्त भटकंती
वॉव्..जिप्सी..मस्त भटकंती रे.. काय छान छान आहे आपल्या देशात पाहायला.. ते तुझ्यामार्फत कळतंय..
सुपर्ब!!!!
जिप्स्या साष्टांग रे... अरे
जिप्स्या साष्टांग रे...
अरे हातात काय जादू आहे तुझ्या....
भेट आता एकदा विक्रोळीला
आणि काही टिप्स दे , फोटू काढायच्या
Pages