Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 22:38
नमस्कार रसिकहो,
हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे
खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.
चला तर मग.. करा सुरवात !
चित्रकोडे क्रमांक १६
चित्रकोडे क्रमांक १७
चित्रकोडे क्रमांक १८
चित्रकोडे क्रमांक १९
चित्रकोडे क्रमांक २०
प्रकाशचित्रे सौजन्य : आदित्य बेडेकर, जिप्सी, डॅफोडिल्स, बी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७. अहिनकुल हा वळसे घालित आला
१७. अहिनकुल
हा वळसे घालित आला मंथर नाग.
२०. देवाच्या दारी?
अहिनकुल बरोबर ! लोला हे
अहिनकुल बरोबर !
लोला हे घ्या
बाकी अजून प्रयत्न करा !!
१६. गर्जा जयजयकार
१६. गर्जा जयजयकार क्रांतिचा
१७. अहिनकुल - मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
१८. कोलंबसाचे गर्वगीत - नक्षत्रापरि असीम नीलामध्ये संचरावे
१९. आश्वासन - फुलरास फुलो वा फुलो निखारा चरणी
किंवा
कुतुहल - लवले होते फुलुन ताटवे नव्या वसंतात
२०. मूर्तीभंजक - पाहून परंतु मोकळा गाभारा
१६. म्यानातून उसळे तलवारीची
१६. म्यानातून उसळे तलवारीची पात
प्रत्येक कविता/गीत एकदाच
प्रत्येक कविता/गीत एकदाच घेतले आहे. तेव्हा 'म्यानातून उसळे' बाद- चित्रहार १ मधील चित्रकोडे ३ चे उत्तर होते ते.
अश्विनी,
थोडा अजून प्रयत्न करा गाभार्याच्या दिशेने.
२० : गोदाकाठचा संधिकाल - देऊळ
२० : गोदाकाठचा संधिकाल - देऊळ ते अन् भग्न
किंवा
ध्यास - जुन्या देवळात उजळते वात (त्या गाभार्यात एक बारीकसा ठिपका दिसतो आहे ती समई असावी).
२० : गाभारा : गाभारा सलामत तो
२० : गाभारा : गाभारा सलामत तो देव पचास
(२७ तारखेला मुंबई आकाशवाणीवरून ही कविता विक्रम गोखलेंच्या आवाजात ऐकली)
२०) उत्तर अगदी बरोबर आहे भरत
२०) उत्तर अगदी बरोबर आहे भरत मयेकर
'गाभारा' कविता सौमित्र यांनी मराठीत सादर करताना आणि गुलजार यांनी हिंदी अनुवाद सादर करतानाचे ध्वनिचित्रमुद्रण युट्युबवर आहे. नक्की पहा !
१६ चार होत्या पक्षिणी त्या
१६ चार होत्या पक्षिणी त्या -
तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली.
१८ गर्जा जयजयकार क्रांतिचा-
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
निलीमा, क्रमांक १६ अचूक १८
निलीमा, क्रमांक १६ अचूक
१८ साठी प्रचि मध्ये एक चिन्ह आहे त्याचा काही संबंध जुळवता येतोय का ते बघा
१८ सर्वात्मका सर्वेश्वरा
१८ सर्वात्मका सर्वेश्वरा -
आदित्य या तिमिरात व्हा.
किंवा
१८ सर्वात्मका शिवसुंदरा
तिमिरातुन तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना
पसायदान आहे नक्की!
कोड १९ : उमर खय्याम : देख
कोड १९ : उमर खय्याम : देख चाहूल लगता फुलतसे वाटेतला ताटवा
किंवा - शेवटचे पान : जाणारच का - सुखात जा तर, बाग मोहरो तव वाटेवर
ते शांती चे दूत असं काही आहे
ते शांती चे दूत असं काही आहे का? आठवत नाहीये अजिबात
शूम्पी | 2 March, 2012 -
शूम्पी | 2 March, 2012 - 12:21 नवीन
ते शांती चे दूत असं काही आहे का? आठवत नाहीये अजिबात
>> world peace म्हणजे पसायदान असा आपला मी अर्थ लावला.