कधी चिंब भिजून, कधी छत्रीखालून, कधी रेनकोटातून तर कधी घरातच भजीसोबत गरम गरम चहाचे घुटके घेत अनुभवला असेल.. क्वचित शब्दांत पकडला असेल.. तर असा हा पाऊस आता तुम्हाला कॅमेर्यात पकडायचा आहे. आपल्या फोटो स्पर्धेचा विषय आहे- 'पाऊस'. चला तर मग कॅमेरा तयार ठेवून वरुणराजाची वाट पहा किंवा आधीच घेतलेले एखादे छायाचित्र शोधा..
स्पर्धेचे नियम :
१. पावसासंबंधी असलेला कशाचाही फोटो चालेल.
२. फोटो स्पर्धकाने स्वतःच काढलेला असावा.
३. फोटो काढतांना वापरलेला कॅमेरा आणि असलेले/ठेवलेले कॅमेर्याचे सेटींग (नक्की माहीत नसेल तर साधारण सेटींग) सांगावे.
४. फोटोत एखाद्या सॉफ्टवेअर ने काही बदल केले असतील तर तसे सांगावे. तसेच सहभागी झालेल्या आयडीने स्वतःच हे बदल केलेले असावेत.
५. एका आयडीला एकापेक्षा जास्त फोटो पाठवता येतील. एका वेळी एका पोस्ट मध्ये एकच फोटो पाठवावा.
६. फोटो स्पर्धेपूर्वी मायबोलीवर प्रकाशित केलेला नसावा.
७. विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला या ग्रुपचे सभासद व्हावे लागेल.
स्पर्धा संपली आअहे आणि लवकरच मतदानाचा दुवा देण्यात येईल.