सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>डेक्कनचा बस स्टॉप आठवत नसेल तर पुन्हा विचार करा. कुठल्या चौकात/बोळात येऊ ते ही सांगा. @मंदार जोशी.

म्हणजे तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही आलाच नाहीत तो का? Biggrin

मंदार,
शेपूट कुणाची, कुठे गेली होती? दिवाळीचा फराळ आणला होता तुमच्या साठी. ६ वाजता 'उठत नाही' म्हटलात तुम्ही :))

<<जागोप्या, जेम्स बाँड,
ईब्लिस ,
मायबोली संकेतस्थळावर
ब्राह्मणांना नावे ठेऊ
नका. हे संकेतस्थळ
एका ब्राह्मणाने सुरु केले
आहे व
प्रशासकही ब्राह्मणच
आहेत. त्यामुळे इथे सेक्युलर
कुत्र्यांचा धूमाकुळ खपवुन
घेतला जात नाही.
भुंकायचे असल्यास
तुमच्या सेक्युलर बापाने
चालवलेली अनेक संकेतस्थळे
आहेत ,तिथे जा.>>मग संकेतस्थळाचे नाव बदलुन ब्राह्मणबोली वगैरे करायला सांगा, ब्राह्मणांशिवाय कोणीही 'ईतर' फिरकणार नाही ईकडे. मायबोली म्हणजे 'आपली मराठी' या आत्मियतेने लोक ईकडे येतात त्यांची अशी कुचेष्टा करु नका. याचा विचार करा.

"सेक्युलर कुत्रे" कुत्र्याचे स्थान दत्तगुरुंच्या पायाशी असते म्हणजे आमचे 'अध्यात्मिक प्रमोशन 'केले म्हणायचे.

<<या असल्या प्रथा बंद करण्यासाठी सरकार का नाही काही करत ? सरकार तर तुमच्या सारख्या सेक्युलर विचारसरणीचेच आहे ना ? मग त्यांना काय प्रोब्लेम आहे सुधारणा घडवून आणायला ?>>अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कायद्याला विरोध करणारे तुम्ही सुधारणा घडवुन आणायच्या बाता करत आहात, कायदा पास झाल्यानंतर हे मडे ,मढे ,मरे हि सगळी स्नानं बंद होतील. देताय का पाठिंबा कायद्याला? आहे का तयारी पुरोगामी व्हायची?

"सेक्युलर कुत्रे" कुत्र्याचे स्थान दत्तगुरुंच्या पायाशी असते म्हणजे आमचे 'अध्यात्मिक प्रमोशन 'केले म्हणायचे.

Happy

ज्यांना स्वत: चा बाप माहीत नसतो.... ते दूसर्यांना बाप दाखवतात...
नथिंगनेस ला त्याचा ााप माहीत नाही आहे... जाउ द्या.... Happy
.
.
असल्या लोकांच्या पोस्टीला उत्तर न देता...
.
.
चांगल्या वातावरणात चर्चा करा...

>>कायदा पास झाल्यानंतर हे मडे ,मढे ,मरे हि सगळी स्नानं बंद होतील. देताय का पाठिंबा कायद्याला?
पाठिंबा न द्यायला काय झालं ? या असल्या प्रथा चांगल्या नाहीचेत, त्या बंद झाल्या पाहिजेत आणि होतीलही.

Pages