बाप्पा, बाप्पा ऐकतोस ना ?
रोज करते नमस्कार
अग्दी वाकून वाकून तुला
चुकून सुद्धा देत नाहीस
सुट्टी कध्धी शाळेला ........
कित्ती बाई सांगते याला
मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
ग्राऊंड बागा सोडून सार्या
शाळा तेवढ्या बंद पाड
कित्ती माझे हात दुखतात
एव्ढाss होमवर्क लिहिताना
उमटू दे की आपोआप
नुसती वही उघडताना
कसलं भारी दिस्तं
फुलपाखरु भिर्भिरताना
एक्दा तरी पंख दे ना
मज्जा येईल उडताना.......
एकदाच अस्सा कोन बनव
आईस्क्रीम मस्त खाताना
संपणारच नाही तो
यम्मी यम्मी म्हणताना.......
बाकी काही नाही केलेस
तरी म्हणेन जाऊं दे
आज्जी मात्र पुन्हा माझी
लग्गेच घरी पाठवूं दे.........
(शेवटचे कडवे हे कोवळ्या बालमनावर आघात करु शकेल - छोट्यांना वाचून दाखवताना कृपया सोडून द्यावे ही नम्र विनंती)
त्याऐवजी हे कडवे कसे वाटेल -
कित्ती सांगावे लागते तुला
नक्की तू ऐकतोस ना रे ?
मग जर्रा मान हलवून
'हो' तरी म्हण की रे .......
फारच छान ! वही उघडता उघडता
फारच छान ! वही उघडता उघडता होमवर्क होण्याची इच्छा तर फार आवडली.
छान कविता आवडली बाकी काही
छान कविता
आवडली 
बाकी काही नाही केलेस
माझ्या आईला खुप मिस करते ती 
तरी म्हणेन जाऊं दे
आज्जी मात्र पुन्हा माझी
लग्गेच घरी पाठवूं दे......... <<< अगदी माझ्या लेकीच्या मनातले...
माझ्या बालपणी मी आणि खूप
माझ्या बालपणी मी आणि खूप मित्रानी हे कडवे गाळले असते. आम्हाला शाळा आवडायची.
<<कित्ती बाई सांगते याला मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
ग्राऊंड बागा सोडून सार्या शाळा तेवढ्या बंद पाड>>
"मध्यम" आवडली.