- २०० ग्रॅम चॉकलेट - डार्क/मिल्क किंवा मिक्स,
- २५० ग्रॅम बटर (रुम टेम्परेचर),
- २०० ग्रॅम साखर (पूर्ण मिल्क चॉकलेट वापरले तर १५० ग्रॅम),
- ४ अंडी,
- ४ टेबलस्पून (हिप्ड - वरती उंचवटा येइल असे) सेल्फ रेझिंग फ्लार,
- ४ टीस्पुन कोको पावडर (पूर्ण मिल्क चॉकलेट वापरले तर घाला)
- व्हाईट चॉकलेट चंक्स/बटन्स / अक्रोड तुकडे / हेझलनट तुकडे / ग्लेस चेरीज, पाकवलेले आले, संत्र्याची किसलेली साल या पैकी काहिही - ऐच्छिक.
१. सर्वप्रथम ओव्हन २०० डिग्री सेंटीग्रेडला तापत ठेवा आणि बेकिंग ट्रे ला बटर आणि बेकिंग पेपर लावुन तयार ठेवा,
२. चॉकलेटचे तुकडे आणि रुम टेंपरेचर बटर फुडप्रोसेसर मधे घालुन अगदी जस्ट मिक्स होइल इतपत फिरवुन घ्या,
३. आता यात साखर घालुन परत एकदा फिरवा,
४. सेल्फ रेझिंग फ्लार, कोको (घालणार असलात तर) घालुन परत एकदा फिरवा,
५. आता एका वेळेस एक अंडे घालुन प्रत्येक अंड्यानंतर एकदा मिक्स करुन घ्या.
६. हे मिश्रण तयार केलेल्या ट्रे मधे ओता,
७. यात आपल्या आवडी प्रमाणे चॉक चंक्स / अक्रोड इ इ या पैकी काहिही घालुन एकदा चमच्याने मिक्स करुन घ्या,
८. तापलेल्या ओव्हनमधे २० मिनीटे बेक करा.
९. तयार चॉकिनी व्हॅनिला आयस्क्रिम / व्हिप्ड क्रिम किम्वा नुसतीच गट्टम करा
हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!
१. मी अर्धे मिल्क आणि अर्धे डार्क चॉकलेट वापरले आहे, कोको घातला नाही.
२. अनसॉल्टेड बटर वापरले तर मिश्रणात चिमुटभर मिठ घाला - चॉकलेट ची चव वाढते
३. मी अर्ध्या मिश्रणात व्हाईट चॉकलेट बिट्स घातले आणि अर्ध्या मिश्रणात कॉफी ग्रॅन्युल्स घालुन मोक्का चॉकिनी केल्या,
४. चॉकिनीज आतुन थोड्या मऊसरच (कच्च्या नाही) राहिल्या पाहिजेत.
मस्त!
मस्त!
वॉव लाजो! मस्त आहेत चॉकिनी.
वॉव लाजो! मस्त आहेत चॉकिनी. निम्म्या प्रमाणाच्या एकदा करून पाहणारच
बर्याच दिवसांनी ट्रीट
बर्याच दिवसांनी ट्रीट मिळाली, लाजो.
मस्तच!
मस्तच!
चॉकीनी आताच करुन पाहिली.
चॉकीनी आताच करुन पाहिली. अर्धे माप घेतले होते. १०० ग्र. चॉकलेटला १२५ ग्र बटर. तयार चॉकनीजची चव बरी वाटली (थोडीफार चॉक लावा केकसारखी) पण केक खुपच बटरमय झाला.
वर रेसिपीत दिलेय २५० ग्र. दिलेय ते बरोबर आहे ना?
सही यार........ !!
सही यार........ !!
लाजो.... फोटो कसले जबरी दिसत
लाजो.... फोटो कसले जबरी दिसत आहेत.. इथे शेफला बनवायला सांगायला पाहिजे...
यम्म्म्म्मी इंस्टंट
यम्म्म्म्मी
इंस्टंट बनवल्यास ना...आता इंस्टंट इकडे पाठवुन दे भारतात
लाजो मस्तच एकदम. तोंपासु.
लाजो मस्तच एकदम. तोंपासु.
लाजो.. मस्तय रेसिपी.. वेळ
लाजो.. मस्तय रेसिपी.. वेळ मिळेल तेव्हा करुन बघेन..
सेल्फ रेझिंग फ्लार >> हे फ्लार नसेल तर काही दुसरा पर्याय आहे का लाजो??
कसलं टेम्प्टिंग दिसतंय, एकदमच
कसलं टेम्प्टिंग दिसतंय, एकदमच तोंपासु, लाजो, पुढच्या पुणे ट्रिप ला हे करून घेऊन ये ग
यम्म्म्म्मी.............
यम्म्म्म्मी............. मस्तच!
हे फ्लार नसेल तर काही दुसरा
हे फ्लार नसेल तर काही दुसरा पर्याय आहे का लाजो??>> मला वाटते मैदा + बेकिंग पावडर
धन्स मंडळी @दिनेशदा हल्ली
धन्स मंडळी
@दिनेशदा हल्ली वेळ मिळत नाहीये काही नविन प्रयोग करायला....
@ साधना - बटरचे प्रमाण बरोबर आहे. तुझं सेरे फ्लार थोड कमी पडलं असेल बहुतेक.
@ मेधा - सेरे फ्लार नसेल तर चिऊ म्हणत्येय तसं मैदा + बेकिंग पावडर वापरु शकतेस.
लाजो, कसल टेंप्टींग आहे ग?
लाजो, कसल टेंप्टींग आहे ग? स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
मस्त्.खुपच मस्त.
मस्त्.खुपच मस्त.
टॉक... खरच आवाज आला तोंडातुन
टॉक... खरच आवाज आला तोंडातुन फोटो पाहिल्या पाहिल्या
ती केक खाली ठेवलेली प्लेट पण मस्तच
खूऊऊऊऊउप छान..
खूऊऊऊऊउप छान..
बर्याच दिवसांनी ट्रीट
बर्याच दिवसांनी ट्रीट मिळाली<<<<<<<<+१
मस्त टेंप्टींग दिसतायत चॉकिनीज!!!
लाजो, अगं माझा वरचा लेअर
लाजो, अगं माझा वरचा लेअर क्रिस्प झाला. गार झाल्यावर तर सगळा केकच कोरडा कोरडा. शी: ! मी तशाच्या तशा स्टेप्स फॉलो करुनही नेहमीच असं का होतं? मागे ते वर्षुचं (सोप्पं) पुडिंग आणि या वेळेस केक....अगदीच फियास्को. माझं काय चुकलं? माझं काय चुकलं?
सहीच! सोप्पं डेझर्ट.. नक्की
सहीच! सोप्पं डेझर्ट.. नक्की करणार!
मनिमाऊ,कदाचीत जास्त वेळ ठेवले
मनिमाऊ,कदाचीत जास्त वेळ ठेवले असशील्.म्हणुन कोरडेपणा आला असावा.
@मनीमाऊ, सुलेखा म्हणतायत तसं
@मनीमाऊ, सुलेखा म्हणतायत तसं जास्त वेळ ठेवला गेला असेल केक ओव्हनमधे, किंवा ओव्हनचे टेंपरेचर जास्त झाले असेल.