एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.
ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).
मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे.
काही मराठीतून उपलब्ध असलेली बेसिक पुस्तके -
१. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्र (नी. पु. जोशी)
२. प्राचीन भारतीय कला (म. श्री. माटे)
३. पुराभिलेखविद्या (शोभना गोखल)
४. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (म. के. ढवळीकर)
५. महाराष्ट्र: इतिहास - प्राचीन काळ - स्थापत्य व कला (अ.प्र. जामखेडकर)
६. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (कल्पना रायरीकर व मंजिरी भालेराव)
यातील शेवटची दोन पुस्तके अलिकडची आहेत व सहजी उपलब्ध आहेत. पहिली चार ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काढली होती. त्यातील नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या ही कॉन्टिनेन्टलने पुनर्प्रकाशित केली आहेत. बाकीची मिळणं जरा दुरापास्तच आहे.
आणखी लक्षात येतील तशी इथे यादी टाकेन. उद्देश असा की ज्यांना रस आहे त्यांना ती पुस्तके वाचून स्वतःच अनेक गोष्टी उलगडतील.
त.टी.
१. खूप प्रचि आल्याने सर्व्हरवरील ताण वाढेल हे खरं आहे, पण जर वाहतं पान झालं तर डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अडचण येईल. यावर उपाय सुचवल्यास आभारी राहीन.
२. कृपया इथे हिंदू संस्कृती वि. मुस्लिम आक्रमक, जातीय व इतर सामाजिक भेदाभेद, स्वघोषित संस्कृतिरक्षक वि. स्वघोषित बुप्रावादी असे वाद घालू नयेत अशी नम्र विनंती. त्यासाठी इतर बाफांची रणांगणं झाली आहेतच. या बाफाची समिधा त्यात टाकू नये. त्यापेक्षा या उपक्रमात सहभागी झालात तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाला थोडाफार का होईना हातभार लागेल.
तसेच मला इथे ताजमहाल आणी अशाच वास्तू हिंदू आहेत का आणखी काही यावर चर्चा नको आहे. ज्यांना अशा वादांत रस आहे त्यांनी कृपया नवा धागा उघडावा. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!
चांगली कल्पना. शुभेच्छा.
चांगली कल्पना. शुभेच्छा.
धन्यवाद
धन्यवाद
वरदा, उत्तम कल्पना. आवडली.
वरदा, उत्तम कल्पना.
आवडली.
गावोगाव पसरलेल्या अशा अवशेषांचं डॉक्युमेंटेशन होण्याच्या दृष्टीने भावा अभ्यासकांसाठी ही फार महत्त्वाची मदत होइल.
ग्रेट. सर्वर्वर ताण येईल असं
ग्रेट. सर्वर्वर ताण येईल असं वर्वर वाटेल पण लोक अधुनमधुन ढेपाळतातच
तसाही प्रत्येक फोटो १५० केबीच असतो.
सद्य महितीप्रमाणे भारताचे भौगोलील भाग करुन त्याप्रमाणे केले तर जास्त योग्य होईल का?
किंवा महाराष्ट्रातील, महराष्ट्राबाहेरील पण भारतातील, आणि मग भारताच्या बाहेरील
तु सुरुवात कर की काही नावासहीत टाकुन. मुर्त्यांच्या पत्रीकेत कायकाय हवे (निदान नाही, पण शक्य झाल्यास) ते ही ठरव उदा. जन्मसन (किंवा शतक), जन्मगाव (किंवा राज्य), वंश्/कुळ (किंवा पद्धत्/राज्यकर्ते) इ.
वरदा,अत्यंत माहितीप्रद कल्पना
वरदा,अत्यंत माहितीप्रद कल्पना सुंदर आहे.वास्तव्वादी चित्रण असावे जेणेकरुन मुळ गाभा जपला जाईल असे वाटते..
ही एक काशीतील सुर्याची.
ही एक काशीतील सुर्याची. याबद्दल अजुन काय सांगता येईल? ही मुर्ती नसून तबकडी आहे. बहुदा तिथल्या १२ आदित्यांपैकी एक.
खूप छान बाफ असणार आहे हा! ..
खूप छान बाफ असणार आहे हा! .. सरसावून बसलो आहे. धन्यवाद वरदा! मी ही काही प्रचि डकवणार आहेच शंकांसाठी..
मस्त कल्पना वरदा. अगदी नक्कीच
मस्त कल्पना वरदा. अगदी नक्कीच फॉलो करणार.
वरदा, मस्त बाफ. भुलेश्वरचे
वरदा, मस्त बाफ. भुलेश्वरचे काही फोटो टाकू का गं?
वरदा ताई.. हे बाकी ब्येष्ट
वरदा ताई.. हे बाकी ब्येष्ट केलेत..
माझ्या अनेक शंका मी इथे विचारणार हे नक्कीच..
निवडक १० मध्ये आधीच टाकलाय..
भारतातील लेण्यांपैकी ७०-७५
भारतातील लेण्यांपैकी ७०-७५ टक्के लेणी महाराष्ट्रात म्हणजे सह्याद्रीत आहेत हे खरे आहे का? असावे बहुदा कारण तसे वाचले आहे.
वीरगळ आणि विजयस्तंभ उभे करायची प्रथा कधी पासून प्रचलित आली असावी?
सह्याद्रितीत लेण्यांमध्ये कुठल्या कुठल्या प्राचीन भाषामधील शिलालेख सापडतात. ते वाचावे कसे याची माहिती कुठे मिळू शकेल? (टि.म.व्ही? डेक्कन?)
धन्यवाद वरदा, अगदी गरज होती.,
धन्यवाद वरदा, अगदी गरज होती., अशा बीबीची.
मला कदाचित प्रचि देणे जमणार नाही, नुसते वर्णन करता येईल. असा प्रॉब्लेम अनेक जणांना असेल ईथे. त्याबद्दल काही करता येईल का ?
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद.
शैलजा, टाक ना भुलेश्वरचे फोटो
अस्चिग, तू टाकलेल्या फोटोत फुलांमुळे मधे काय आहे ते कळत नाहीये. आणि ती नुसतीच तबकडी वाटतेय ना? मध्ययुगीने असावी असा माझा कयास आहे.
काही अपेक्षा:
अगदीच प्रसिद्ध मंदिरांचे/शिल्पांचे, ज्यांची माहिती जरा शोधाशोध केली तर सहज मिळण्यासारखी असते असे फोटो जरा कमी टाकायचे का?
शक्यतो महाराष्ट्रातलीच प्रचि जास्त येणार हे उघड आहे. आणि मला हा बाफ 'भारत - विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र' ठेवावा असं वाटतंय. भारताबाहेरचं नको. (भारताबाहेरच्या देशातील अशा वारशाचे सखोल अभ्यास झालेले असतात.)
परत एकदा, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईलच असं गृहित धरू नका प्लीज. (उदा: प्राचीनाकडून मध्ययुगाकडे आलो की माझ्या बुद्धीची दमछाक व्हायला सुरू होते)
सेनापती, हो लेण्यांबद्दलची
सेनापती, हो लेण्यांबद्दलची माहिती खरी आहे.
या लेण्यांमधील शिलालेख सर्वसाधारणपणे ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत असतात. यांची वाचनं उपलब्ध आहेत. पुस्तकाचं नाव उद्या टाकेन. आत्ता एकदम डोक्यात येत नाहीये.
वीरगळांवर नंतर थोडं सावकाशीने लिहिन.
दिनेशदा, वर्णनं प्रत्येकवेळा बरोबर असतातच असं नाही. पण लिहायला हरकत नाहीये. जेवढं कळेल/ कयास बांधता येईल तेवढं करायचं
सेनापती, वीरगळ बद्दल फिरोझ
सेनापती, वीरगळ बद्दल फिरोझ रानडे यांचे इमारत हे पुस्तक वाच. हेमाडपंती देवळे, एका रात्रीत बांधलेली देवळे याबद्दल पण त्यात लिहिले आहे. खुद्द पैगंबरांशी संबंधित आणि जगातली केवळ दुसरी मशिदही भारतात अहे, याचाही उल्लेख आहे त्यात.
हे वाचता येतंय का बघा
हे वाचता येतंय का बघा ना..
'अलंग' किल्ल्यावरील पडक्या मंदिराबाहेरील शिलालेख...
तिसऱ्या ओळीत किल्लेदार हा शब्द वाचता येतोय फक्त मला..
ह्या वीरगळी आहेत ना? ......
ह्या वीरगळी आहेत ना?
...... उधेवाडी, राजमाची.
हो वीरगळ च आहेत. मध्ययुगीन
हो वीरगळ च आहेत. मध्ययुगीन काळातले.
लेख थोडाफार लागतोय. पण मला हे लेख इतक्या चटकन वाचता येत नाहीत (माझं एक्स्पर्टाईज यात नाही). आपण सगळ्यांनीच थोडा थोडा प्रयत्न करूयात
वाचता आलेले शब्द (खूप घाईत वाचलाय लेख. नंतर वेळ मिळेल तसा आणखी लावता येईल)
१. (श्री?) सदाशिव .....
२. श्री ... वानवीरसा
३. (हि?).. किलेदार..
पुढचीही काही अक्षरं लागताहेत, पण आत्ता खर्रंच वेळ नाहीये. नंतर येते इथे. तोपर्यंत इतरांनी प्रयत्न कराना
मस्तच धागा.
मस्तच धागा.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
मस्त. ती तबकडी नसून एलिअन्स
मस्त. ती तबकडी नसून एलिअन्स लोकांचे स्थिर झालेले यान आहे का? क्रिस्टल स्कल किंवा असे काही आणल्यास ती अॅक्टिवेट होइल असे वाटते आहे. ( हलके घ्या, मी दोन दिवसात खूप सायन्स फिक्षन सिनेमे पाह्यलेत त्यामुळे असे झाले आहे. )
उपक्रमास शुभेच्छा. यही है असली मायबोलीकी पहचान.
कंबोडियातील शहर 'सियाम
कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे. जे कोरीवकाम फक्त लाकडावरचं केले जाते किंवा सोनार ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार घडवतो तशा स्वरुपाचे शिल्पकाम ह्या मंदीरावर झाले आहे. मंदिराचा एक अन् एक दगड उरत नाही ज्यावर कोरीवकाम आढळत नाही. बघुया 'बान्ते सराई'ची काही चायाचित्रे आणि वाचुया त्यावरची थोडीशी माहिती:
१) रावणाचे एक नाव विराट असेही आहे हे मला कंबोडियात कळते. विराट सितेचे हरण करतो आहे.. तिला पळवून नेतो आहे हा प्रसंग ह्या शिल्पकामात चितारलेला आहे. बाजूला विष्णुचे वाहन गरुड दाखवले आहेत. (पण माझ्यामते विष्णुचे वाहन शेषनाग ना? मला तिथे जी माहिती मिळाली ती गरुड विष्णुचे वाहन अशी होती.)

२) हा प्रसंग महाभारतातला आहे. कृष्ण आणि अर्जुन. पण हा प्रसंग गीता सांगण्याचा नाही की कुरुक्षेत्रावरील रणभुमीतील कौरवा-पांडवा ह्यांच्यामधील युद्धाचाही नाही.

३) इथे बघा शिवशकंर उमेसोबत कैलास पर्वतावर बसलेले आहे. वानरांनी रावणाला कैलास पर्वतावर जाऊ दिले नाही म्हणून रावणानी कैलास पर्वताला उचलून धरलेले आहे. शिवा एक अलगद धक्का देऊन कैलास पर्वत रावणाच्या अंगावर पाडतो. शिवाच्या शक्तीची प्रचिती आल्यानंतर रावण १००० वर्ष शिवाची आराधना करतो. नंतर तांडवनृत्य रचतो. बघा ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत. आपल्याला लहानपणी सांगितलेल्या आणि आपण वाचलेल्या पुराणकथांची इथे कित्ती कित्ती गरज भासते हे मला तिथे गेल्यानंतर कळले.

४) मंदिराच्या समोर बसलेला हा नंदी काळाच्या ओघात मोडून गेला आहे..!

५) रावणानी कैलाश पर्वत उचलला आहे...

६) मंदिराच्या चारी भिंतिवर सुंदर अप्सरा चितारलेल्या आहेत. बघा अधेमधे दगडांमधली रेघ दिसते आहे . हे दगड एकावर एक रचत नेत नेत मंदिर उभारले गेले आहेत. सिमेंट नाही.. खिळे नाहीत! आपण चित्र/ठोकळे जुळवण्याचा जिगसॉचा जसा खेळ खेळतो तसेच काहीसे हे काम वाटते.

७) ह्या शिल्पकृतीत इंद्र त्याचे वाहन त्रिमुखी हत्ती ऐरावतावर आरुढ झालेला आहे.
८) इथे पुर्वी शिवलिंग होते. इथल्या मुर्तींची बर्याच प्रमाणात चोरी झालेली आहे.

९) ह्या शिल्पावर देवता लक्ष्मी दाखवली आहे. बाजूला दोन हत्ती तिच्या गळ्यात फुलांचे हार घालत आहेत. आपल्याकडे दिवाळीच्या दिवसात बाजारात जे पोष्टर्स विकायला येतात. त्यात एक पोष्टर असेच असते ज्यात धनदेवतेला हत्ती हार घालत आहे.
१०) मी वर कृष्ण आणि अर्जुनाचे एक शिल्पचित्र दिले आहे. पुर्ण प्रसंग खूपच रसभरीत आहे तो असा: अर ऐरावतावर आरुढ इंद्र आहे. इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. अग्निला स्वतःची शक्ती परत मिळवायची असते म्हाणून ती खांडव वनाला आग लावू पहाते पण इंद्र मात्र दरवेळी पाऊस पाडून ती अग्नि विझवून टाकतो. कारण खांडव वनात इंद्राचा मित्र नाग तक्षक राहत असतो. म्हनून अन्गि कृष्ण आणि अर्जुनाची मदत घेतो. बाणाच्या सहाय्यानी अर्जुन पाऊस अडवतो. खांडववनाला आग लागून नाग तक्षक आणि त्याचे इतर मित्र लगेच खांडव वन सोडून पळून जातात. (प्रश्न पडतो मग लाक्षग्रहाला जेंव्हा आग लागते तेंव्हा खांडव वन त्यात नष्ट होते. ती कथा नि ही कथा दोन्ही वेगळ्या.)
१०) कृष्ण क्रुर कंसाचा वध करतो आहे...

११) हे चित्र राजवाड्यातील आहे. इथे कृष्ण क्रुर कसांचा वध करतो आहे.

१२) हा मंदिराचा काही भाग. डाव्या नि उजव्या बाजुला यक्ष हे द्वारपाल आहेत. तसेच वानेर, सिंह, गरुड हेही काही ठिकाणी द्वारपाल म्हणून दाखवले आहेत.

१३) हा प्रसंग किशकिंधमधील वालि आणि सुग्रीव ह्यांच्या लढाईतील आहे. वालि सुग्रीवाचे राज्य लुटतो आणि त्याची पत्नी तारा बळकावतो. सुग्रीव श्रीरामाची मदत मागतो. खालि बघा वालि नि सुग्रीव ह्यांचे युद्ध सुरु आहे. बाजूला राम धनुष्य घेऊन बाण सोडतो आहे. श्रीरामाच्या बाजूला लक्ष्मण आहे. दुसर्या बाजुला सुग्रीवाची बायको तारा भयभीत झालेली दिसते आहे. दगडांमधील रेघा पण स्पष्ट दिसत आहेत.

१४) ही आणखी एक अप्सरा:

१४) इथे मयुरावर आरुढ कुबेर आहे (पण कुबेराचे डोके मात्र चोरीला गेलेले आहे).

१५) काळाच्या ओघात मंदिरे कसेबसे असे टिकून आहे. सबंध मंदिर जंगलानी वेढलेले आहे. जेंव्हा सापडले तेंव्हा मंदिराच्या अंगावर झुडपे झाडे वेली सगळे काही होते. बहुतेक त्यांनीच मंदिराचे जतन केले असावे.

१६) जवळून घेतलेले एक छायाचित्र. बहुतेक प्रत्येक शिल्पकृतीत झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, माणसे, अलंकार दाखवलेले आहेत.

१७) इथे अगदी ठळकपणे दिसत आहे की कृष्णानी कंसाचा शेवटी वध केला..(लहानपणी वाईटांचे असे वध वगैरे झाले की फार मजा यायची महाभारत रामायण ऐकताना नि बघताना.)

१८) इंद्र आणि ऐरावताचा जवळून घेतलेला फोटू:

१९) वालि-सुग्रीव युद्ध..

२०) कुबेर ... मयुर त्याचे वाहन...

२१) नंदीवर बसलेले आहेत शिव आणि पार्वती. पण कंबोडियामधे पार्वतीला उमा हेच नाव आहे.

२२) इथे बघा कोण कोण द्वारपाल आहेत. सिंह, वानेर आणि यक्ष हे द्वारपालाचे काम करत आहेत.

२३) जमा झालेले पर्यटक..

२४) मंदिर आणि द्वारपाल..

जर हे चित्र आवडले असतील तर मग 'बान्ते सराईवरची' ही सात भागांची सर्वाधिक छान चित्रफित बघा: http://www.youtube.com/watch?v=Cb99mpJytsw&feature=related
वीरगळ म्हणजे नक्की काय होते?
वीरगळ म्हणजे नक्की काय होते?
वीरगळ - ढोबळ मनाने सांगायचे
वीरगळ - ढोबळ मनाने सांगायचे तर एखाद्या वीराच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगडी स्तंभ. ज्यात लढाईचे चित्ररूप वर्णन असते.
धन्यवाद सेनापती.
धन्यवाद सेनापती.
अप्रतिम कल्पना!
अप्रतिम कल्पना!
बी, प्रकाशचित्रे अप्रतिम
बी,
प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. बघून थक्क झालो.
छान
छान
१. (श्री?) सदाशिवसाक्षी २.
१. (श्री?) सदाशिवसाक्षी
२. श्रीदिवानवीरसा
३. (हि?).. किलेदारअल
४. गप्रौ..राजमा(ची)
५. (सिषत्तदोरीआता)
६. (की)अर्धांगश्रीदेव
मस्त धागा ...
मस्त धागा ...
Pages