बाळं माझ गुणाचं

Submitted by सत्यजित on 30 August, 2008 - 07:42

कुणाचं गं कुणाचं ?
बाळं माझ गुणाचं

पापा देत करुन चंबू
मालिश करुन घाला शंभु

गरम गरम काढा पाणी
शंभुबाची म्हणा गाणी

फेसाच हे केवढं लोणं
पाण्यात मस्ती करतय कोण?

डोकं पुसा पदराला
पाऊ लावा अंगाला

खुदुखूदू हसतयं कोण?
गालावरच्या खळ्या दोन

छान छान कपडे घालुन
टाटा करत गेलं पळुन

लबाडं मस्ती करतय कोण?
त्याला मिळणार फटके दोन...

कुणाचं गं कुणाचं ?
बाळं माझ गुणाचं...

-सत्यजित.

गुलमोहर: 

Happy ग्गो ग्गोड बाळ!

>>पाऊ लावा अंगाला>> कित्त्ती गोड Happy