फळभाज्यांची सभा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 August, 2008 - 03:49

एकदा फळ भाज्यांची सभा भरली
प्रत्येकाने आप-आपली स्तुती गायली

काकडी म्हणाली,
मी कधी सरळ कधी वाकडी
सगळ्यांत थंड आहे मी एकटी

गाजर म्हणाला,
रंग माझा सगळ्यांत सुंदर
माझ्यामुळे स्वच्छ होते नजर

बीट म्हणाला,
भोवर्‍याच्या आकाराचा मी बीट
माझ्यामुळे राहतात सगळे फिट

टोमॅटो म्हणाले,
माझा रंग आहे लालेलाल
माझ्यामुळे होतात गुलाबी गाल

कांदा म्हणाला,
मी आहे जरासा तिखट
खावून मला चव जाते फिकट

मुळा म्हणाला,
माझा रंग स्वच्छ, सफेद
मला खाताना कसला खेद?

सगळ्यांची मग गट्टी झाली
कोशिंबीर नावाची टीम त्यांनी केली.

प्राजक्ता

गुलमोहर: 

अरे वा! जगु.. भाज्या न खाणार्या मुलाना दाखवली पहिजे तुझी कविता..
छान आहे.. आता पुढची टाक..

वा किती छान कवीता Happy मस्त जमली आहे कोशिंबीर

छान आहे.. मुलांना भाज्यांची ओळख करुन द्यायला छान आहे कविता. Happy

कविता मस्तच आहे.

अवांतरः काकडी आणि टोमॅटो सोडले तर इतर चौघे कंदमुळं वर्गात मोडतात.

जगु, छान आहे कविता.

छान! प्राजक्ता

धन्यवाद चेतना, अखि, साधना, सत्यजीत, प्रमोद, अश्विनी आणि निखिल.

कोशिंबीरीचा बेत छान आहे जगु.