गणेशोत्सव संपता संपता, योगेशची मेल आली, असं असं मायबोली शिर्षक गीत करायच आहे त्यात तुम्ही म्हणजे मी, माझा मुलगा कौशल आणि मुलगी देविका तिघांनी गायच आहे. सोबत त्या बाफची लिंक जोडलेली होती. सुट्टी संपत आली होती, बराच वेळ हाताशी असणार होता गायला आवडतच आणि पुन्हा मायबोलीसाठी असं असल्यामुळे जोरात हो म्हणून सांगितल.
इथे झालेल्या काही(संगीत) गटगमुळे माझ्या मुलांचा आणि माझा आवाज योगेशला ठाऊक होता त्यामुळे आमची या प्रोजेक्टसाठी डायरेक्ट एंट्री असणार होती म्हणे :) मोठ्या लोकांशी असलेल्या मैत्रीचा अभिमानच वाटला एकदम. :)
मग दिवाळी अंकासाठी कवितावाचन रेकॉर्ड करायला त्याच्या घरी गेले तेव्हा साधारण रफ ट्रॅक तयार होता योगेशकडे तो ऐकवला त्यानी. चाल खरोखर कॅची असल्यामुळे आम्ही गुणगुणतच घरी आलो.
एके दिवशी फायनल ट्रॅक मेलबॉक्समधे येऊन धडकला, कौशलचे क्लासेस, सरावासाठी योगेशकडे जाणं त्यासाठीचा ट्रांसपोर्ट, माझ्या भारतवा-या. अशा अनंत अडचणी समोर, तरी योगेशनी सरावासाठी दोन दिवस जमवले होते कसेबसे. एक दिवस सराव उत्तम झाला. दुस-या वेळचं मात्र जमवता आलं नाही.
योगेशच्या घरी सराव करताना श्यामली आणि देविका
कौशल, देविका आणि दीया
त्यानंतर मी भारतात, मुले इथे, सरावासाठी योगेश, सारिका, आणि प्रमोद (माझे यजमान) या तिघांनी कसं काय जमवलं ते त्यांच त्यांनाच ठाउक.
स्टुडिओमधे आमची लिटिल चँप दीया, देविका, कौशल आणि त्यांचे बाबा.
माझ्या लेकिच्या (देविका केंभावी) मनात नसताना तिच्याकडून गाणं गाऊन घेणं म्हणजे महा कठीण काम, पण हे गाणं पूर्ण होईपर्यंत तिच्या मनानी गाणं गायच नाही हे घेतल नाही याचं श्रेय योगेशला द्यावं का दीयाला? :)
दोघांसाठीही स्टुडिओमधे जाऊन गाणं डब करणं नवीन नव्हतं, पण दुबईतला स्टुडिओ, आणि मायबोलीचं गाणं (शिर्षक गीत, आम्हाला लक्षात रहात नाही रे! योगेश काका) आणि ते पण दीया बरोबर म्हणून दोघही जाम खुश होते.
दीया, योगेशच्या मुलीबद्दल मुद्दाम इथे लिहिनच मी.
या मुलीला हे गाणं अक्खच्या अक्ख सगळ्या बारकाव्यांसकट प्रत्येक शब्दाच्या स्पष्ट उच्चारासकट पाठ आहे वय वर्ष पावणेचार, भारीच कौतुक वाटतं नेहमी या बाळाचं. घरात असणा-या गाण्याचा मुलांवर किती सहज संस्कार होतो याचं उत्तम उदाहरण.
कौशलचा अर्धवट फुटलेला आवाज, त्याला गायला त्रास देत होता, योगेशला त्याचा आवाज हवाच होता, आणि तो वेळोवेळी त्यानी गायलेल्या छोट्या छोट्या जागांच कौतुक करुन त्याला प्रोत्साहन देत होता. योगेशचा पेशन्सला दाद द्यायला हवीच.
गाणं पूर्ण डब झालं, कोणी किती गायलं आहे, फायनल मिक्सिंग कसं झालं आहे हे सगळ अजून आम्हाला ठाऊक नसलं तरी. सगळ्यांनी जीव ओतून काम केलं आहे. आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळतच मिळत हा माझा विश्वास असल्यामुळे हे गाणं इतिहास घडवणार या बद्दल शंका नाही.
आता मला वेळ नसल्यामुळे मी गाण्यात नसणार होते, आता आईच मायबोली गाणं न राहता हे 'आमचं गाणं' झालं आहे :) आणि त्यांनी आमचं म्हटल्यावर, मला वाटणारं कौतुक शब्दाच्या पलिकडचं आहे. योगेश तू जे काय दिलं आहेस त्याबद्दल तुझे खरोखर आभार.
हे झालं गाण्याच्या प्रवासाबद्दल. आता जरा गाण्याच्या शब्द्दांबद्दल उल्हास भिडेंच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक ओळीला सलाम....आम्ही नुसतच मायबोलीवर प्रेम करतो, पण लिहायला असं लिहायला सुचलंच नाही!!!!...आणि अगदी प्रांजळपणे सांगते थोडासा हेवापण वाटतोच आहे. :) तरीपण मायबोली रॉक्स!!
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
व्वाह शामली तै, मनापासून
व्वाह शामली तै,
मनापासून लिहीलेलं, पोचतंय
तुमच्या सगळ्यांच्या मनोगतांवरुन योग ने दिलेलं योगदान आणि प्रत्येकाच्या नजरेतून साकारलेला योग वाचण्याचा अनुभवही खास!
खरेच कौतुक ह्या संपुर्ण टीमचेच!
ब्राव्हो!
आम्ही नुसतच मायबोलीवर प्रेम
आम्ही नुसतच मायबोलीवर प्रेम करतो, पण लिहायला असं लिहायला सुचलंच नाही!!!!...आणि अगदी प्रांजळपणे सांगते थोडासा हेवापण वाटतोच आहे.
+१
मस्त!
मस्त!
**दिया मोड ऑन श्यामली काकू,
**दिया मोड ऑन
श्यामली काकू, नाईस!
>>असं लिहायला सुचलंच नाही!
अनुमोदन...
छोट्या सह-कलाकारांच्या वतीने
छोट्या सह-कलाकारांच्या वतीने लिहिलेलं मनोगत आवडलं...
तीव्र ईच्छा असुन देखिल, 'रेकॉर्डींग स्टूडीओ' मधे पाऊल ठेवण्यासाठी मला वयाची २८ वर्षं पार करावी लागली होती. त्या मुळेच या सर्व छोट्या कलाकारांना मिळालेली ही संधी बघून, खरोखर हेवा वाटतो... मात्र एकच सांगतो - रेकॉर्डींगच्या वेळी स्वतः रेकॉर्डीस्टने दिलेल्या सुचना (आवाज, उच्चार आणी माईक संदर्भातल्या...) नीट लक्षात घेऊन, या छोट्या दोस्त मंडळी कडुन 'रोज'चा सराव करुन घ्या... पुढच्या काळात त्यानांच त्याचा फायदा होणार आहे...
हार्दीक शुभेच्छा...!!!...
(No subject)
छान
श्यामली........खूप छान उतरलंय
श्यामली........खूप छान उतरलंय सगळं मनातलं.
देविका, कौशल सोबत तुझाही आवाज असता तर अजून मजा आली असती गं
छानच लिहिलंय. गाण्यात भाग
छानच लिहिलंय. गाण्यात भाग घेतल्याबद्दल छोट्या मंडळीचंही कौतुक!
देविका आणि कौशल लगे रहो!
देविका आणि कौशल लगे रहो!
जयु, मला तर माझा आवाज ऐकू
जयु, मला तर माझा आवाज ऐकू येतोय
कान देऊन ऐक उद्या 
<हे 'आमचं गाणं' झालं
<हे 'आमचं गाणं' झालं >..आवडलं
देविका आणि कौशल ला अनेक शूभेच्छा!!
श्यामली, खूप मनापासून शीर्षक
श्यामली,
खूप मनापासून शीर्षक गीतासाठी तुम्ही सर्वांनी केलेली धडपड,
आणि गीतात माबोमधल्या आबालवृद्धांचा सहभाग म्हणजे
हे आपल्या मायबोलीच्या कुटुंबाचं गीत झालंय.
मी लिहिलेल्या शब्दांबद्दल सांगायचं तर,
मायबोलीवरच्या गेल्या दोन-अडीच वर्षातल्या अनुभवातून ते आपोआपच स्फुरलं.
तुम्हां सर्वांच्या मनातले विचार, भावना माझ्याच नकळत कुणीतरी खरडून गेला मनात.... मी निमित्तमात्र.
मायबोलीच्या अनुभवसागरातली एक ओंजळ भरून मी मायबोलीला अर्घ्य म्हणून समर्पित केली इतकंच.
श्यामली, छान लिहिलंय. छोटी
श्यामली, छान लिहिलंय. छोटी मंडळी रॉक
शामले मस्त लिहिलयस !
शामले मस्त लिहिलयस !
.
.
श्यामली मस्तच लिहिलयस.आवाज पण
श्यामली मस्तच लिहिलयस.आवाज पण मस्त आलेत्,तुझे आणि देविका आणि कौशलचे तर खास अभिनन्दन.गाते ठेव त्याना:)
खरंय गं. मुलांकडुन गाऊन घेणे
खरंय गं. मुलांकडुन गाऊन घेणे फार अवघड.
मस्त लिहीलेस श्यामली. मुलांचा
मस्त लिहीलेस श्यामली. मुलांचा आवाज ऐकला आणि खूप कौतुक वाटलं.
व्वा क्या बात है श्यामली ,
व्वा क्या बात है श्यामली , बच्चे कंपनी ग्रेट
छान लिहिलयस शामली.
छान लिहिलयस शामली. बच्चेकंपनीला खूप खूप शुभेच्छा.
अग तुझ्या मुलांचा किती गोड
अग तुझ्या मुलांचा किती गोड आवाज आहे...खुप खुप कौतुक त्यांच.. त्यांच गीत अजुन बहरु दे..तु आहेसच त्यांना खत पाणी घालायला...
ग्रेट!!
एकंदर संपुर्ण गाण सुंदर झालेय पण बच्चे कंपनींचा आवाज तर परफेक्ट लागलाय...
दुबई बच्चे कंपनी जिंदाबाद !!!
दुबई बच्चे कंपनी जिंदाबाद !!!
मनःपूवक धन्यवाद मंडळी अथक,
मनःपूवक धन्यवाद मंडळी

अथक, तुम्ही पण प्रकट झालात चक्क, शुक्रिया दोस्त