मायबोली शिर्षकगित -- माझा अनुभव - (वर्षा.नायर)

Submitted by वर्षा.नायर on 29 January, 2012 - 23:56

गेल्या अनेक महीन्यात खरेतर मला मायबोलीवर येयला देखिल वेळ झाला नाही. ऑफिसमधे मायबोली ब्लॉक्ड आहे आणि बाकी इतर अनेक गोष्टींमधे बिझी झाल्याने घरी आल्यावर देखिल मायबोली वर येता येत नव्हते. अर्थात मनात ह्याबद्दल रुखरुख आणि खंत जरुर असते. दुबईतील माझ्या माबोकर मित्र-मैत्रिणींकडुनपण नेहमीच मायबोलीवरील खास अपडेट्स मिळत असतात. मायबोली शिर्षक गिताची स्पर्धा झाली आणि त्याला योग चाल लावणार हे मला त्यांच्याकडुनच समजले.
ह्या उपक्रमाबद्दल मस्त वाटले. उल्हास भिडेंनी खरोखरच उत्तम आणि समर्पक गित लिहीले आहे.
आणि ह्या गिताला चाल लावुन त्याला मायबोलीकरांकडुनच गावून घ्यावे ह्या कल्पनेला मी खरच दाद देते. अप्रतिम कल्पना आणि त्यामागे योग ने घेतलेले परिश्रम दोन्हीलाही माझा सलाम.

नाटकातून मी कामे केलीत.... करते, कविता, लेख लिहीते, चित्र काढते, चित्रपटात देखिल गंमत म्हणुन छोटा रोल केला, इथे कार्यक्रमातून गाणी देखिल गायली आहेत आणि गाते.....थोडक्यात मला कलेच्या सर्व प्रांतात काही ना काही थोडेफार करण्याचा योग आला .......
बस पण एकच स्वप्न पुर्ण झालं नव्हतं आणि ते म्हणजे..... स्टुडिओमधे जाउन स्वतःचे गाणे रेकॉर्ड करणे........
नक्कीच हे स्वप्न मी बघितलं होतं, कि कधिना कधी आपण देखिल हौस म्हणुन आपले गाणे रेकॉर्ड करुन घ्यावे. हौसेला मोल नसते... :-)
पण मायबोली मुळे हा देखिल योग आला.... मायबोली जिंदाबाद.... जियो....
योग ने जेव्हा सांगितलं कि मी स्टुडिओ बुक केला आहे आणि आपल्याला अमुक अमुक तारखेला रेकॉर्डींग करायला जायचे आहे तेव्हा मला खुप आनंद झाला. खुपच एक्सायटेड वाटलं....

rehers at yog2.JPG

आधी योगच्य घरी २-३ वेळा आमची रिहर्सल झाली. तेव्हाच गाणे खुप आवडले. प्रत्येक कडव्याची चाल वेगळी होती. मग योगने आम्हाला रफ ट्रॅक घरी रिहर्सल करण्यासाठी दिला. घरी प्रॅक्टीस केल्याने मुलाचे गाणे देखिल पाठ झाले.

आम्ही सर्वजणा मग ठरलेल्या तारखेला स्टुडियोमधे गेलो. मस्त लेटेस्ट टेक्नॉलॉजीने equipped तो स्टुडिओ होता.
नुकतच 'कोलावेरी' गाणे हिट झाले होते आणि त्याचा व्हिडीओ फारच popular झाला होता. हा स्टुडीओपण अगदी तसाच होता त्या गाण्यात दाखविला होता तसा. माझा मुलगा इतका खुष झाला तो स्टुडिओबघुन.... तो म्हणाला आई मला 'कोलावेरी' गाणेच म्हणायचे आहे (वय वर्ष ९) इथे आत्ता. :D त्याला मला समजावयाला लागलं कि बाळा इथे आपण 'कोलावेरी' नाही मराठी गाणे रेकॉर्ड करायाला आलो आहोत. :-)

maayboli_song2.JPG

रेकॉर्डींग स्टुडिओ मधे अगदी प्रत्येक चुक किती magnify होते ते देखिल समजले. म्हणजे सुरात तुम्ही १००% बरोबरच असले पाहीजेत, छोटीतली छोटी चुक पण तिथे लगेच कॅच होते.
रेकॉर्डींग इंजिनियर इराणी होता त्याला मराठीचा गंध देखिल नव्हता पण सुर हलले की तो बरोबर पकडायचा.
एकुण काय खुपच शिकण्यासारखा आणि अतिशय अनोखा अनुभव मिळाला.

पुन्हा एकदा मी समस्त मायबोली टिम, उल्हास भिडे आणि योग ह्यांचे आभार मानते कि त्यांच्यामुळे माझे स्टुडिओ रेकॉर्डींगचे स्वप्न पुर्ण झाले.

"मिले सूर मेरा तुम्हारा" प्रमाणे ह्याचा व्हिडिओ देखिल बनवावा गायक आणि इतर सर्व माबोकर घेउन असे मला सुचवावेसे वाटते.

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा,
छान लिहीला आहेस अनुभव.. त्या दिवशी मुलांपेक्षा तुझ्या चेहेर्‍यावर जास्त एकंदर एक्साईटमेंट दिसत होती.. Happy

>>"मिले सूर मेरा तुम्हारा" प्रमाणे ह्याचा व्हिडिओ देखिल बनवावा गायक आणि इतर सर्व माबोकर घेउन असे मला सुचवावेसे वाटते.
छान कल्पना आहे! अनुमोदन.

अनुभव लेखन आवडलं...
खाजगी कार्यक्रमात गाणं, जाहीर कार्यक्रमात गाणं, आणी आता स्टूडिओमधे पूर्णपणे नवीन गाणं... हे तीनही घेतलेले अनुभव महत्वाचे आहेत... आता यापूढे 'स्टूडिओ' मधलाच अनुभव लक्षात ठेऊन, गाण्याचा सराव सुरू ठेवा... पुढे त्याचा खूप उपयोग होईल...
हार्दीक शुभेच्छा...!!! Happy

वर्षा...... खूप छान लिहिलं आहेस Happy
रेकॉर्डिंग चा अनुभव फक्त बाकी होता....... आता तो सुद्धा मिळाला........ अब लगे रहो ........ Happy

माझा मुलगा इतका खुष झाला तो स्टुडिओबघुन.... तो म्हणाला आई मला 'कोलावेरी' गाणेच म्हणायचे आहे (वय वर्ष ९) इथे आत्ता. >>>>>
आता मायबोली मायबोली हे हीट होणार आणि त्या बरोबर आपली मायबोलीही!! Happy

रेकॉर्डींग इंजिनियर इराणी होता त्याला मराठीचा गंध देखिल नव्हता पण सुर हलले की तो बरोबर पकडायचा. >> ज्यांचे कान तयार झालेत त्यांचा मला जाम हेवा वाटतो ... मस्त लिहिलय!

वर्षा,
थोडक्यात पण छान लिहिलेत अनुभव तुमचे.
या गीताच्या निमित्ताने अनेक मायबोलीकर परत अ‍ॅक्टिव्ह होतायत ही आनंदाची गोष्ट आहे.

गीतकार, संगीतकार आणि अ‍ॅडमिन वगैरे यांच्या कृपेने आजच शीर्षकगीत ऐकायला मिळाले. धन्यवाद.
अप्रतिम !!
काय करणार ... शब्दभांडार खूपच तोकडे पडते आहे आनंद वर्णन करायला. कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाहीये.
सर्व सहभागी कलावंतांचे हार्दिक अभिनंदन !! .. आणि योगला त्रिवार मुजरा. सितार, संतुर, बासरी, तबला वगैरे बरोबरच टाळ्या / चुटक्यां काय सही वापरल्या आहेत.

वर्षा, छान आहे तुमचाही अनुभव Happy
रेकॉर्डींग इंजिनियर इराणी होता त्याला मराठीचा गंध देखिल नव्हता पण सुर हलले की तो बरोबर पकडायचा. >>> मस्तच !

धन्स लोक्स..

गाण्यातले सर्व टिम मेंबर्स.. आपण सर्वजण एकमेकांना भेटलेलो देखिल नाही... तरिही टिम स्पिरीट नक्कीच अनुभवला आणि अनुभवत आहे.... Its a great feeling.. something different...

सा-या कलागुणांना दे वाव मायबोली.....
सहजिच जिवनाचा अविभाज्य भाग झाली.....>>> मायबोली जिंदाबाद.... जियो....

खरच खुप अभिमान वाटतोय कि मला ह्या प्रोजेक्टमधे सहभागी होता आलं.

संपुर्ण गाणं ऐकतांना खरंच डोळ्यात पाणी आलं