हिमगौरी (?) च्या शोधात : अखेर

Submitted by विशाल कुलकर्णी on 27 January, 2012 - 04:45

मागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्‍या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?

प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....

प्रचि २
जिकडे बघावे तिकडे दुकानेच-दुकाने...
प्रत्येक ठिकाणी डिस्काऊंटच्या पाट्या....

प्रचि ३
नोप, ती तू नक्कीच नव्हेस ....!

प्रचि ४
बोल्डरला नुसतीच खादाडी आटोपुन पुढे 'कॅसलरॉक' मॉलला प्रयाण केले. खरेतर मॉलला जायला मला अजीबात आवडत नाही. (विनाकारण नको असलेल्या वस्तु गळ्यात पडतात आणि खिश्याला चाट बसते)
पण 'कॅसलरॉक' हा प्रकारच अजब होता. मॉल म्हणल्यावर डोळ्यासमोर उभी राहते एखादी पुष्कळ दुकाने असलेली अवाढव्य बहुमजली इमारत. पण इथे एक छोटेसे गावच वसलेले होते. फक्त शॉपींग ! (कुलकर्णी बाई आनंदाने वेड्याच झाल्या असत्या आणि मी खिश्याला चाट बसल्याने)

प्रचि ५
विकडे असल्याने आज हा भाग बर्‍यापैकी शांत होता. अधुन मधुन माझ्यासारखे चुकार (रस्ता चुकलेले Wink )
पर्यटकच काय ते दिसत होते.

प्रचि ६

प्रचि ७
इथे पण बर्फाळ पर्वतरांगांची सोबत होतीच..

प्रचि ८
कितीही आणि काहीही घ्यायचे नाही असे ठरवले तरी जगातल्या सगळ्या विख्यात ब्रँड्सवर किमान ४०% सुट मिळतेय हे पाहिल्यावर मोह होणे साहजिकच होते. बर्‍याच प्रमाणात खिश्याला चाट बसल्यावर भानावर आलो आणि घड्याळात पाहीले. दुपारचे ४.३० वाजत आले होते. तेव्हा आटोपते घेवुन हॉटेलकडे परत निघालो.
मध्ये वॉलनट क्रिकमध्ये कुठेतरी जेवण करायचे आणि हॉटेलवर परत....
इथे माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटरीने दावा साधला होता, त्यामुळे पुढचे फोटो मोबाईलच्या कॅमेर्‍याने काढले..

प्रचि ९
वॉलनट क्रिक ही वेस्टमिंन्स्टर्सची विख्यात खाऊगल्ली कम शॉपींग सेंटर (नॉट अगेन) आहे. त्यामुळे इथेही परत सटर फटर खरेदी झालीच.

प्रचि १०

प्रचि ११
बघा रे कुठे दिसतेय का ते?

प्रचि १२
जेवण करुन निवांत एका दुकानाबाहेरील बेंचवर बसलो होतो, तेवढ्यात फोन वाजला. घरुन होता....
काय करतोयस?
"ऐक , आज सॉलीड खरेदी केलीये. खुश होवून जाशील."
"ते सोड, तू परत कधी येतोयस? मला जाम कंटाळा आलाय आता.....
मिसींग यु ! आज शेवटचा दिवसा आहे, उद्या परत फिरतोयस ना?
टण्ण...टण्ण.....
कुठेतरी आत घंटा वाजली. मला माझी हिमगौरी सापडली होती. भले ती हिमगौरी नसेल पण माझी तर आहे ना......!
दिल खुश हो गया..........

प्रचि १३
आता परतीचे वेध.....

विशाल.

गुलमोहर: 

कुठेतरी आत घंटा वाजली. मला माझी हिमगौरी सापडली होती. भले ती हिमगौरी नसेल पण माझी तर आहे ना......!
दिल खुश हो गया.......... >>> अरे.... खासच.... Happy

सगळी प्रचि अ फ ला तु न.....

Happy

मस्तं.....

<< मला जाम कंटाळा आलाय आता.....>>
आम्हाला पण आला होता... Proud Light 1

च्यामारी हिमगौरीच्या नावाखाली कसलेही फोटो राव..... Wink

बादवे खिसा मात्र पार हलका झाला ना भौ ? Happy

Dont grow up! Wink Its hard to find people like you! Happy

फोटोग्राफी मस्त केली आहेस.

अरे वा.. ! हिवाळ्यात डेन्वर का? भारीच ! फार सुंदर असतं तिथे.. माउंटन्समध्ये घुसला नाहीस का? डेन्वरपासून पश्चिमेला थोडं पुढे म्हणजे साधारण तासभर अंतरावर माऊंट्न्समधली खूप सुंदर हिल स्टेशन्स आहेत. पुढच्यावेळी जा नक्की.. Happy बोल्डर टाऊनपण मस्त आहे खूप.. टिपीकल युनिव्हर्सिटी टाऊन... ! खूप देसी जनता आहे त्या युनित..

फोटोंमध्ये खूप मजा नाही आली पण सिरीजची कल्पना आवडली.. पुप्रशु .. ! Happy

जिप्स्या, जाच रे बोल्डरला. फक्त बोल्डरमध्ये रमु नकोस फार काळ. तिथुन पुढे (अगदी बोल्डरला लागुनच) रॉकीजचा इलाखा सुरु होतो त्यात घुस. तुझ्या कॅमेर्‍याला आणि कौशल्याला सॉलीड वाव मिळेल तिथे.
धन्यवाद मंडळी Happy

छान.