Nut Mixture:
१/४ कप साखर
१ टेबलस्पून दालचिनी पावडर
१/४ कप अक्रोडाचा चुरा
केकसाठी :
२ कप मैदा (चाळून)
१ टिस्पून बेकिंग पावडर
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/४ टिस्पून मीठ
१/२ कप बटर ( ११० ते ११३ ग्रॅम्स)
१ कप साखर
१ टिस्पून व्हॅनिला इसेन्स
२ अंडी
8-oz sour cream
(हा जरा पूर्वी केलेला तेव्हाचा फोटो. साखर साधी वापरल्याने व दालचिनीची पूड घरी केल्यामुळे नट मिक्ष्चर काही छान दिसत नव्हते, व सिनॅमन स्वर्ल देखील धड आला नव्हता. त्यामुळे परत केला केक.. )
१) अव्हन ३५०डिग्रीजला प्रिहिट करायला ठेवा.
२) नट मिक्ष्चर तयार करून ठेवा. मी साध्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर वापरली.
३) मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.
४) साखर, बटर व व्हॅनिला एकत्र मिक्सरमधून काढून एका भांड्यात ठेवा.
५) त्यात अंडी एकावेळेस एक अशातर्हेने नीट beat करा.
६) या मिश्रणात (मैदा+बेपा+बेसो) व सावर क्रिम घालून ते सर्व स्मुद होईपर्यंत ब्लेन्ड करा.
७) बटर लावून तयार केलेल्या केकच्या अव्हनच्या भांड्यात अर्धे मिश्रण घालून त्यावर नट मिक्ष्चर पसरा व उरलेले केकचे मिश्रण घालून त्यावर उरलेले नटचे मिक्ष्चर पसरा.
८) ४० मिनिटे किंवा केकमध्ये खुपसलेली सुरी क्लिन येईपर्यंत बेक करा..
९) मायबोलीवर पाकृ द्या किंवा फोटो अपलोड करा!
१०) मगच खा! कॉफीबरोबर अमेझिंग लागतो हा केक!
माझ्यासारखा हावरटपणा न करता
माझ्यासारखा हावरटपणा न करता खाल्ला तर
मस्त
पण cream दिसत नाय
मस्त मी आधी फोटो पाहिलेला.
मस्त मी आधी फोटो पाहिलेला.
प्रितीभूषण क्रिम बॅटरमध्ये
प्रितीभूषण क्रिम बॅटरमध्ये आहे. दिसणार नाही.. खाताना कळेल. असला मॉइस्ट मस्त होतो केक.
वाह बस्के.... काय दिसतोय
वाह बस्के.... काय दिसतोय केक... एकदम मस्त!!
तोंपासु! बस्कू,
तोंपासु!
बस्कू, शब्दखुणांमध्ये 'केक' ही लिही.
सही रेसिपी बस्के. अगदी
सही रेसिपी बस्के. अगदी प्रोफेशनल दिसतोय केक
वॉव बस्कु. मस्त दिसतोय केक
वॉव बस्कु. मस्त दिसतोय केक
छान छान, कोणी केला तर खायला
छान छान, कोणी केला तर खायला नक्की बोलवा.
मस्त दिसतोय केक ...सही
मस्त दिसतोय केक ...सही रेसिपी
बस्के... बस की आता... पाहून
बस्के... बस की आता... पाहून भूक लागते...
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय. आता हा केक बघून
मस्त दिसतोय. आता हा केक बघून बेचव चिरीओज अजुनच बेचव झाले.
मस्त
मस्त
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
काय दिसतोय केक
काय दिसतोय केक
जबरी !
जबरी !
पहिला फोटो पार्ल्यात टाकला
पहिला फोटो पार्ल्यात टाकला होतास ते आठवतंय ..
छान रेसिपी आणि फोटो ..
धन्यवाद सर्वांना. पौर्णिमा,
धन्यवाद सर्वांना.
पौर्णिमा, शब्दखूण टाकली. थँक्स.
मी करुन पाहिला. मस्त
मी करुन पाहिला. मस्त झाला.दालचिनीचा स्वाद छान लागला.
धन्यवाद बस्के.
इथे फोटो कसा अपलोड करु? प्रयत्न केला पण upload failed असं दिसतंय.
अरे वा, थँक्स मेघा
अरे वा, थँक्स मेघा फिडबॅकबद्दल!
मस्त
मस्त