... सांगून जोक गेले (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 20 January, 2012 - 22:02

''जोक' या गझलेचे हे विडंबन नाही. मात्र त्यातील जोक शब्दामुळे त्याच लयीत सुचलेली हझल.तिथे गझलेत न वापरलेला काफिया घेतला आहे.

गावात दांडग्यांचे हसण्यात झोक गेले
जेथे खट्याळ जोशी, साने नि ओक गेले

हसणे बघा मलाही क्रमप्राप्त आज होते
लिहिली गझल नि वरती सांगून जोक गेले

त्यांचा घसा कधीचा बघ कोरडा असावा
समजून त्यास मदिरा गटवून कोक गेले

बदनाम होत आहे मुन्नी बघा अजुनही
इतकी कि नाव सारा भरुनी त्रिलोक गेले

सांभाळ पृथ्विराजा आता जरा स्वतःला
पाहून ठेव कैसे सहजी अशोक गेले

अमुच्या ट्युबा न पेटो, डोके नकाच लावू
जे लावण्यास गेले त्यांचेच चोक गेले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Rofl

Rofl

अमुच्या ट्युबा न पेटो, डोके नकाच लावू
जे लावण्यास गेले त्यांचेच चोक गेले.....

हा हा हा.....सही सही