तीळ+शेंगदाण्याची पावडर - अर्धा कप
कन्डेन्स्ड मिल्क - अर्धा कप
दूध - अर्धा कप
मिल्क पावडर - दोन चमचे शीगोशीग भरून
जायफळ पावडर किंवा वेलची पावडर किंवा केशर किंवा केशर वेलची सिरप - स्वादासाठी - आपल्या आवडीनुसार
सजावटीसाठी - पांढरे तीळ किंवा सुकामेवा - आपल्या आवडीनुसार
तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजून थंड झाल्यावर मिक्सरमधून काळजीपूर्वक हळूहळू फिरवत अगदी बारीक कूट - पावडर - करून घ्या.
सगळे जिन्नस मायक्रोवेवप्रूफ भांड्यात एकत्र करून व्यवस्थित मिसळून घ्या. गुठळ्या राहू देऊ नका.
मायक्रो मोडवर हाय पावरला तीन (एक+एक+एक) मिनीटांसाठी ठेवा. एकेका मिनिटानंतर भांडं बाहेर काढून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण साधारण दीड मिनीटासाठी (३० सेकंद + ३० सेकंद + ३० सेकंद) पुन्हा मायक्रोवेवमधे ठेवा. मिश्रण साधारण आळले की तूप लावलेल्या ताटात थापा. सजावट करा आणि थंड झाल्यावर बर्फ्या कापा.
तिळाचं कूट नको, पावडरच करा, तरच बर्फी छान गुळगुळीत होईल.
मी स्वादासाठी फक्त जायफळ पावडर घातली आहे.
इंतरेस्तींग
इंतरेस्तींग
छान फोटोची वाट पाहतो...
छान
फोटोची वाट पाहतो...
मंजुडी. कन्डेन्स मिल्क
मंजुडी.
कन्डेन्स मिल्क +दुध+मिल्क पावडर=गोड मावा ...अरे वा वा ..खुपच मस्त..कुट अगदी बारीक केल्याने वडीची चव अप्रतिम असणार..
वा. करुन पाहाते. मस्त ग
वा. करुन पाहाते. मस्त ग
मला कन्डेन्स्ड मिल्क ट्युब
मला कन्डेन्स्ड मिल्क ट्युब मधे मिळाले आहे तर त्याचे प्रमाण कसे घ्यायचे?
उद्या करायचा विचार आहे.
मंजू- कल्पनाविस्ताराची
मंजू- कल्पनाविस्ताराची परिसीमा झाली बघ माझ्या. प्लीज. प्लीज फोटो टाक. कशी दिसत असेल ते समजत नाहीये.
नवीन पदार्थ & क्रियेटीव्ह पाकृ. तुला पाककलाविशारद ही पदवी देण्यात येत आहे.
मस्तच लागत असणार फोटो टाकून
मस्तच लागत असणार फोटो टाकून आम्हालाही करायला भाग पाडावे
मला कन्डेन्स्ड मिल्क ट्युब
मला कन्डेन्स्ड मिल्क ट्युब मधे मिळाले आहे तर त्याचे प्रमाण कसे घ्यायचे?>>> nirmayi, जेवढ्या प्रमाणात बर्फी करायची आहे आहे तेवढंच कन्डेन्स्ड मिल्क ट्यूबमधून वाटीत काढून घ्या.
रैना, अगं मलई बर्फी सारखीच दिसतेय ही बर्फी, खाताना तिळाचा स्वाद, चव जाणवते.
मागे एकदा एका नातेवाईकांनी इंदोरहून अशी तिळाची बर्फी आणली होती, ती खूपच आवडली होती. सुलेखाने तिकडे माव्याच्या तिळाच्या बर्फीचा उल्लेख केल्यावर एकदम आठवली आणि प्रयोग केल्याशिवाय राहवेनाच. आणि प्रयोग यशस्वी झाल्यावर इकडे लिहिल्यावाचून राहवेना
केश्वे, जमलं तर २९ ला घेऊन येईन ही बर्फी
मला पाहिजे.
मला पाहिजे.
मी कोणे एके काळी तिळाच्या
मी कोणे एके काळी तिळाच्या लवंग लतिका केल्या होत्या. मस्त झाल्या होत्या. ती रेसिपी जपून ठेवली आहे (पूजा करत).
मंजुडी मला असे विचारायचे होते
मंजुडी मला असे विचारायचे होते की वर कंन्डेन्स्ड मिल्क चे प्रमाण अर्धा कप दिले आहे तर ट्युब मधे मिळाले आहे ते पण अर्धा कपच घ्यायचे क?? ते पेस्ट सारखे थिक आहे. ़का सगळे असेच अस्तात?
मंजूडी, फोटो टाक ना.
मंजूडी, फोटो टाक ना.
फोटो टाकला आहे
फोटो टाकला आहे
वा वा ! मस्त !!
वा वा ! मस्त !!
छान
छान
चला.. घरी चक्कर मारायला हवी..
चला.. घरी चक्कर मारायला हवी..
मला उत्तर द्या ना प्लिज.....
मला उत्तर द्या ना प्लिज.....
सेनापती, त्वरा करा! निर्मयी,
सेनापती, त्वरा करा!
निर्मयी, कन्डेन्स्ड मिल्क घट्टच असते. तुमच्याकडे कुठल्या ब्रँडचे आहे ?
वा! मस्त दिसते आहे. ही खरी
वा! मस्त दिसते आहे.
ही खरी फ्यूजन रेसिपी आहे तर.
मस्त आहे. मंजुडी भारी आयडीया
मस्त आहे. मंजुडी भारी आयडीया आहे एकदम.
मंजूडी.. मी कसला येतोय.. सहज
मंजूडी.. मी कसला येतोय.. सहज म्हणालो ते..
सध्या ठाण्यात नाहीये... नाहीतर लगेच धाड टाकू शकलो असतो...
मी मिल्क पावडर , दूध न टाकता
मी मिल्क पावडर , दूध न टाकता केली...चवीला खुपच छान झालीय्..धन्यवाद सोपी पाक्रु दिल्याबद्दल..
अश्विनी, लवंगलतिका>> रेसिपी
अश्विनी, लवंगलतिका>> रेसिपी शेअर कर ना
मस्तं जमली. ए, पहिल्यांदाच
मस्तं जमली. ए, पहिल्यांदाच पकवून (??) फोटो-बोटो टाकतेय... टिंगल कराल तर येऊन धोपटेन
ते डावीकडचे केदारने पळवलेत... मी उजवीकडचा एकच तुकडा.
छान रेसिपी. कन्डेन्स्ड मिल्क
छान रेसिपी.
कन्डेन्स्ड मिल्क ऐवजी दूध पावडर वापरली तर चालेल का? साखर किती घालावी लागेल?
मायक्रोवेव्ह ऐवजी गॅसवर शिजवले तर नेहमी वड्या करताना जसे गोळा होईपर्यंत शिजवतो तसे केले तर चालेल का?
शनिवारी करीन.
दाद, उजवीकडचेही दोन तुकडे
दाद, उजवीकडचेही दोन तुकडे गायब आहेत मस्त दिसतेय बर्फी!
मधु-मकरंद, मिल्क पावडर घालायची आहेच, तुम्हाला कन्डेस्ड मिल्क वापरायचं नसेल तर तीळ-दाण्याच्या कूटाएवढीच साखर, तेवढंच दूध आणि तेवढीच मिल्क पावडर घेऊन प्रयोग करून पहा.
शनिवारी केल्या. तुम्हाला
शनिवारी केल्या.
तुम्हाला कन्डेस्ड मिल्क वापरायचं नसेल तर तीळ-दाण्याच्या कूटाएवढीच साखर, तेवढंच दूध आणि तेवढीच मिल्क पावडर घेऊन प्रयोग करून पहा. >>> असेच केले. चवीला छान झाल्या. थोड्या ओलसर-मऊ झाल्या. घरात आवडल्या.
मायक्रोवेव नसेल तर?...
मायक्रोवेव नसेल तर?...