
केक म्हणजे गोडाचाच प्रकार म्हटला जातो..पण हा मेथीचा केक काहीसा "हांडवा" प्रकारात मोडतो असे मला वाटते..उसगावातल्या माझ्या पंजाबी मैत्रीणीने हा केक शिकवला..पार्टी ला केलेल्या 'स्टार्टर 'पदार्थ प्रकारात हा होता..मोजके च जिन्नस वापरुन ,कमी मेहनतीत उत्तम पदार्थ तयार होतो..गरम्,थंड कसाही खा ..स्वाद फर्मास..
१ मेथीच्या जुडीची पाने,कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील..धुवुन जाडसर चिरुन घ्यावी..
१ कप जाड रवा..
३/४ कप बेसन..
१ कप तेल..
१ कप दुध..
१ कांदा बारीक चिरलेला..
१ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न..[
[अमेरिकन कॉर्न थोडया दुधात वाफवुन घेतले तरी चालेल ..]
हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे..[मिरचीचा तिखटपणा व आपली आवड त्याप्रमाणे]
मीठ चवीनुसार..
हळद १ टी स्पुन.
१ टी स्पुन बेकिंग पावडर..
२ टी स्पुन साखर...
१ कप काजु+बदाम तुकडे..[भरपुर हवे]
किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी....[ केक बेक करण्याआधी वरुन पेरायला..]
एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..
आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा..
काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा..
बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..
ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा..
थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..
बटरी सेल डिस्चार्ज झाल्याने फोटो नीट आला नाही..पुन्हा चार्ज होइपर्यंत केक उरला नाही..म्हणुन फोटो नाही..
कधीचा करायचा ठरवत होते मेथी
कधीचा करायचा ठरवत होते मेथी आल्यापासून आता सिझन संपत आल्यावर मुहूर्त लागला. तेल अर्धा कपच घातलं.
मी खूप वेळा हा केक केलाय, जो
मी खूप वेळा हा केक केलाय, जो खातो तो प्रेमात पडतो केकच्या
ऑर्किड, मी लाडवाचा बारीक रवा, उपम्याचा जाड रवा दोन्ही वापरून केलाय हा केक. दोन्ही प्रकारे चांगला होतो. बारीक दलिया वापरून बघितला नाही, पण त्याचाही चांगला होईल असे वाटते. मिश्रण कदाचित थोडेसे पातळ करावे लागेल, दलियाला शिजताना जास्त द्रव पदार्थ लागेल.
धन्यवाद साधना, करून बघिन हा
धन्यवाद साधना, करून बघिन हा प्रकार.
आज बारीक दलिया वापरून केला.
आज बारीक दलिया वापरून केला.
4:30 पासून साहेब भूक भूक करत होते.
नेमका हा धागा वर होता.
पटकन तयारी ला लागले.
मी फक्त गाजर किसून घातले. तिखट बेताचाच झाला होता.
चविष्ट झाला , पण , फारच फळफळीत झाला.
चमच्याने खावा लागला. काय चुकले??
टीप : दलिया अगोदर भिजत ठेवा. मी , १० मि. दुधात च भिजवला.पण माझ्यामते 30मि तरी ठेवा.
एक कप तेल, दूध वगैरे तेलकट
एक कप तेल, दूध वगैरे तेलकट नाही बनवत?
मी करून बघितला..खूप छान झाला.
मी करून बघितला..खूप छान झाला. धन्यवाद या रेसिपीसाठी
स्वस्ति, तू दलिया वापरून
स्वस्ति, तू दलिया वापरून केलास? मग तू दलिया शिजायला जितका द्रव पदार्थ लागतो तितका घातला नसणार. दलियाने होते नव्हते ते सगळे द्रव खेचून घेतले असणार व म्हणून फळफळीत झाला असणार.
झांपी, तेलकट होत नाही.
ओके साधनाताई . मग दुपट्ट दूध
ओके साधनाताई . मग दुप्पट दूध/पाणी घालू म्हणताय ?
बॅटर ईडली पीठासारखं झाल होतं परत कधी केला तर आणखी पातळ करून पाहीन
धन्स
धन्यवाद साधना.
धन्यवाद साधना.
दलिया शिजायला भरपूर वेळ आणि
दलिया शिजायला भरपूर वेळ आणि भरपूर पाणी लागतं.
स्वस्ति आधी रव्याचा करून बघ,
स्वस्ति आधी रव्याचा करून बघ, मग अंदाज येईल.
झंपी, रेसिपीत 1 कप तेल लिहिले असले तरी मी अर्धा कप तेल वापरून करते. चांगला होतो, तेलकट होत नाही. 1 कप तेलानेही तेलकट होणार नाही, फ्लेकी खुसखुशीत होईल असे वाटते. मी पहिल्यांदा केला तेव्हा अर्धा कप तेल वापरून केला. दुसऱ्यांदा तेल अगदीच कमी वापरले, 1 चमचा वगैरे, तेव्हा खूप कोरडा झाला, चव थोडी बिघडली. आता अर्धा कप तेल वापरूनच करते. चांगले टेक्श्चर येते.
ओवन शिवाय कराय्चा झाल्यास काय
ओवन शिवाय कराय्चा झाल्यास काय करावे?
एक शंका... दुधात मीठ व तत्सम
एक शंका... दुधात मीठ व तत्सम पदार्थ टाकल्यावर दूध नासत नाही का???
सगळे मिश्रण जाडसर होते, मीठ
सगळे मिश्रण जाडसर होते, मीठ घातल्यावर दूध लगेच फाटत नाही, गरम केले तरच फाटते. इथे मिश्रण गरम होईपर्यंत दूध स्वतःचा फॉर्म गमावून बसलेले असते.
ह्याचे अप्पे घालूनही होतील
ह्याचे अप्पे घालूनही होतील
ओवन शिवाय कराय्चा झाल्यास काय
ओवन शिवाय कराय्चा झाल्यास काय करावे?
>>> जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर मिश्रणाचं भांडं ठेवा. वरून दुसरी कढई/पातेलं ठेवा.
चांगलाच होईल. मेथी कमी घालेन.
चांगलाच होईल. मेथी कमी घालेन.
वेगवेगळे रवे वापरून पाहायला हवेत. तांदुळाचा घेतल्यास केक म्हणता येणार नाही, ढोकळा होईल.
प्रकार आवडला.
छान रेसीपी. बिना सा़खरेचा केक
छान रेसीपी. बिना सा़खरेचा केक करुन बघायला हवा.
मी मेथीचा एक केला होता.
मी मेथीचा एक केला होता. काचेचे झाकण असलेल्या कढईत. मध्यम आचेवर.
वरच्या रेसिपी मधे फक्त काही बदल. कॉर्न, कांदे वापरल नव्हते. गाजर किसून टाकले होते.
दुधा ऐवजी दही १ वाटी, एक वाटी रवा एक वाटी बेसन साठी. पाणी एक कप. (अर्धा अर्धा कप, एकदा मिश्रण करताना, एकदा १० मिनिटे भिजवून झाल्यावर.)
आणि नॉन स्टिक पसरट कढईमधे मिश्रण टाकायच्या आधी जीरे, तीळ, लाल तिखट, कढी पत्ता तेलात परतून त्यावरच मिश्रण टाकायचे.
फोटोत एकाच बाजूला लागलेले तीळ स्वयंपाक्याच्या अनुभवाची कमी दाखवतात.
विक्रम काका , केक एक्दम
विक्रम काका , केक एक्दम टेम्टीन्ग दिसतोय
सध्या दर आठवड्याला मेथीची जुडी आणली जाते .
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून झाल्या , पराठे झाले .
आता एकदा हा केक करेन . मागे दलिया घालून केला होता . तेन्व्हा भुसभुशीत झाला होता . परत प्रयत्न करेन .
यात मेथी म्हणून शब्द्खूण नाहीये म्हणून माझ्या नजरेत आला नाही , नाहीतर बर्याचदा पाक्रू अॅप वापरते मी .
छान
छान
मी केला होता खूपच छान झाला
मी केला होता आज . कुकरमध्ये केला. खूपच छान झाला होता.

हा फोटो
मी पण करून पाहिला काल हा केक.
मी पण करून पाहिला काल हा केक. छान झाला. रव्याच्या ऐवजी स्टील कट ओट्स वापरले. दूध आणि दही अर्धा कप प्रत्येकी घेतले. दूध अजून दोन टेबलस्पून वाढवले ओट्स शिजण्यासाठी. छान न्याहारीचा प्रकार आहे. मी सोबत हिरवी चटणी (मिरची, कोथिंबीर, आले, किंचित दही घालून) वाढली.
आवडला.
आवडला.
दूध आणि तेल एकत्र करण्याची
दूध आणि तेल एकत्र करण्याची कल्पना काही केल्या मनाला पटत नाहिये....
ढुधा ऐवजी पाणी / ताक /गोड
ढुधा ऐवजी पाणी / ताक /गोड दही वापरले तर चालेल . तेल पाउण वाटी तर हवेच . मिश्रण सरसरीत होईल इतके असावे. त्यानुसार द्रव पदार्थ प्रमाण असावे.
Ok....:-)
Ok....
ताक वापरून करून पाहीन
कढईत करायाला गॅस वर कीती वेळ
.
मी आज केला आहे हा केक.. खूप
मी आज केला आहे हा केक.. खूप छान झाला आहे नेहमीप्रमाणेच.
बरेच वेळा केला आहे आजवर, पण इथे अक्नॉलेज केलं नव्हतं. कसं काय देवजाणे!
Chhan ahe recipe
Chhan ahe recipe
Pages