नमस्कार मंडळी,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्तातर्फे काही उपक्रम राबवले जातात. यावर्षी संयुक्ताने एका महत्वाच्या विषयाला धरून परिसंवाद करायचे ठरवले आहे.
आज जगात वावरताना कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्री-पुरूषांशी आपला संपर्क येतो. या सगळ्यांशी वागताना समोरची व्यक्ती स्त्री की पुरूष आहे यावर आपल्या बर्याच प्रतिक्रिया अवलंबून असतात. हेच मैत्रीतही होते. पण कधी कधी असं होतं की समोरची व्यक्ती आणि आपण स्वतःही स्त्री वा पुरूष आहोत हा केवळ एक तपशील असतो. कामाच्या संदर्भाने, मैत्रीच्या संदर्भाने हा तपशील बिनमहत्वाचा होतो. कधीकधी होतही नाही.
स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का? असेच समोरच्याकडे पाहता येते का? अशी मैत्री असू शकते का? आणि मग या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत? या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर आम्हाला तुमची मनोगतं जाणून घ्यायची आहेत.
परिसंवादाचा विषय आहे 'लिंगनिरपेक्ष(जेण्डरलेस) मैत्री-लिंगनिरपेक्ष ओळख'.
या विषयावर १००० शब्दापर्यंत लेख/ अनुभव/ विचार तुम्ही आम्हाला पाठवायचे आहेत. ८ मार्च २०१२ रोजी आलेल्यातून निवडलेले लिखाण एका परिसंवाद विशेषांकामधे प्रसिद्ध केले जाईल.
लिखाण कुठे आणि कसे पाठवायचे, अंतिम तारीख याबद्दलचे तपशील लवकरच प्रसिद्ध करू. तोवर तुम्ही लिहायला तर सुरूवात करा.
या उपक्रमाच्या संपादक मंडळासाठी आम्हाला केवळ संयुक्ताच नव्हे तर संपूर्ण मायबोलीमधून स्वयंसेवकांची जरूर आहे. हा संयुक्तातर्फे घडत असलेला उपक्रम असला तरी या उपक्रमाच्या संयोजनामधे आम्हाला सर्व मायबोलीकरांच्यातून मंडळ अपेक्षित आहे. केवळ स्त्री सदस्याच नव्हेत तर पुरूष सदस्यसुद्धा.
तर कृपया ज्यांना या मंडळात काम करायला/ मदत करायला आवडेल तसे त्यांनी इथे धाग्यावर किंवा sanyukta@maayboli.com या ठिकाणी इमेल करून कळवावे. तसेच मंडळामधे कुठल्या प्रकारचे काम करायला आवडेल याबद्दलही सुचवल्यास आवडेल.
कुठल्याही विशेषांकाची असू शकतील अशीच सर्व कामे इथेही असणार आहेत.
आलेले लिखाण वाचणे, त्यातून निवडणे, त्यासंदर्भाने चर्चा, अंकाचे स्वरूप ठरवणे, रूपडं सजवणे, जाहिरात, निवडलेल्या लिखाणांचे मुद्रितशोधन इत्यादी सर्व.
तर मंडळी तुमच्या प्रतिसादांची वाट पहात आहोत.
अरे वा! छान विषय आहे. मंडळात
अरे वा! छान विषय आहे.
मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल.
छान विषय. जर लेख कंपाइल करणार
छान विषय.
जर लेख कंपाइल करणार असू तर याला परिसंवाद कसं म्हणणार?
अनेकदा सार्याजणी किंवा
अनेकदा सार्याजणी किंवा अंतर्नादमधे एखादा विषय देऊन त्यावर लिखाण मागवले जाते. त्याला परिसंवाद असेच म्हणले जाते की गं.
बाकी ऑनलाइन असल्याचा उपयोग करून घेत चर्चा असणारच आहे.
हाँ, ओके.
हाँ, ओके.
छान विषय ... नुकताच मागचा
छान विषय ... नुकताच मागचा उपक्रम झाला असं वाटतय.. आला पण महिला दिन जवळ !
अरे वा! छान विषय आहे. मंडळात
अरे वा! छान विषय आहे.
मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल. >>>> अनुमोदन
छान विषय ... नुकताच मागचा
छान विषय ... नुकताच मागचा उपक्रम झाला असं वाटतय.. आला पण महिला दिन जवळ !
>> दीपांजली + १
मंडळात काम करायला आवडेल.
मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल. >>>> अनुमोदन
सानी, सुरश, धारा, धाग्यात बदल
सानी, सुरश, धारा,
धाग्यात बदल करून एक साधारण कल्पना येऊ शकेल अशी कामांची यादी टाकली आहे. कृपया बघावी.
रुपडं सजवणे आणि जाहिरात मधे
रुपडं सजवणे आणि जाहिरात मधे काम करायला आवडेल. सुचवलेल्या विषयावर लिहायला १००० शब्द पुरतील असे वाटत नाही. पण विषय छान आहे. नक्की लिहीन.
मामी +१, खोखो आठवला. छान उपक्रम होता तो.
सानी +१
सानी +१
छान विषय. मामी,नादखुळा- अरे
छान विषय.
मामी,नादखुळा- अरे वा बरे वाटले लोकांच्या स्मरणात खोखो आहे ते वाचून.
लिहिण्याचा नक्की प्रयत्न
लिहिण्याचा नक्की प्रयत्न करणार.
धागा वरती आणत आहे.
धागा वरती आणत आहे.
माझी काही मदत होणार असेल तर
माझी काही मदत होणार असेल तर जरूर सांगा.
मला ह्या किंवा मराठी भाषा
मला ह्या किंवा मराठी भाषा दिवसातल्या कार्यक्रमांमध्ये मंडळात काम करायला किंवा बाहेरूनही कुठली मदत करायला आवडेल.
मला मुशो करण्यात मदत करता
मला मुशो करण्यात मदत करता येईल. त्या कामाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकेन का हे आत्ताच नाही सांगता येत, पण जमेल तशी मदत करायला आवडेल.
मला पण आवडेल मदत करायला.
मला पण आवडेल मदत करायला.
छान विषय आहे. मलादेखील मदत
छान विषय आहे. मलादेखील मदत करायला आवडेल.
विषय छानच आहे. पुरूष
विषय छानच आहे.
पुरूष सदस्यांना लिहायला परवानगी आहे ही एक आणखी चांगली गोष्ट आहे. यातुन साधक बाधक चर्चा नक्की होईल.
विषय छानच आहे............
विषय छानच आहे............ लिहायला आवडेल........आणि मदत करायलाही.......
लिहायला आवडेल.
लिहायला आवडेल.
छान विषय, लिहायला आवडेल पण
छान विषय, लिहायला आवडेल पण पुरुष सदस्यान्नी लिहीणे अपेक्षित आहे का?
लिहायचा प्रयत्न करतो
लिहायचा प्रयत्न करतो
आलेले लिखाण वाचणे, त्यातून
आलेले लिखाण वाचणे, त्यातून निवडणे, त्यासंदर्भाने चर्चा, लिखाणांचे मुद्रितशोधन >>> ही कामं करता येतील
पण पुरुष सदस्यान्नी लिहीणे
पण पुरुष सदस्यान्नी लिहीणे अपेक्षित आहे का?
हा उपक्रम जरी संयुक्तातर्फे असला तरी सर्व मायबोलीकरांसाठी आहे.
मला आवडेल अस काम करायला.कधी
मला आवडेल अस काम करायला.कधी ही तयार आहे.