२ कांदे
१ बटाटा
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
३ अंडी... साधी नेहेमीची
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
अर्धा चमचा गरम मसाला
तेल
मीठ
- कांदे चौकोनी बारीक चिरून घ्यावेत
- बटाटा धूवून कांद्यासारखाच चिरून घ्यावा
- हिरव्या मिरच्या धूवून बारीक चिराव्यात
- कोथिंबीर धूवून बारीक चिरावी
- एका पॅनमध्ये तेल तापवावं
- गरम तेलात मिरच्या + कांदा घालावा, परतावा
- कांदा पारदर्शक झाल्यावर बटाटा घालावा
- परतावं. आलं-लसूणपेस्ट घालावी, नीट मिसळावं. झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यामुळे बटाटा शिजेल...
- आता हळद, तिखट घालावं. परतावं.
- अंडी फोडून घालावीत, नीट मिसळावं
- गरम मसाला, मीठ घालावं, छान परतावं
- भुर्जी जरा सुकली की, कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी
- यात टोमॅटो नाही वापरला कारण बटाटयालापण शिजतांना पाणी सुटतं
- अगदी शेवटी, ग्लेज येण्याकरता चमचाभर तेल घालता येतं
- गरम पराठा, फुलक्याबरोबर छान लागते
चुकीबद्द्ल माफी... दोन फोटो
चुकीबद्द्ल माफी... दोन फोटो होते पण क्रॉप करतांना करप्ट झालेत म्हणून नाही टाकलेत