झटपट ढोकळा : फक्त बेसनाचा .

Submitted by स्वस्ति on 12 January, 2012 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन : १ वाटी
पाणी

हिरव्या मिरच्या : २ ते ३
आले : पाव इंचाचा तुकडा

हळद
मीठ
साखर : १ टी स्पून
मिरी : ३-४ दाणे
तेल : १ टेस्पून

१ ईनो सॅशे

फोडणीसाठी :
हिंग
मोहरी
तेल

कोथिंबीर
ओलं खोबरं

क्रमवार पाककृती: 

मिरच्या व आले एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.

एका पातेल्यात बेसन घेउन त्यात हळद ,मीठ,साखर ,वाटलेल्या मिरच्या-आलं ,मिरीचे दाणे-जाड्सर ठेचून घाला.हळूहळू पाणी घालून मिश्रण भजी-पीठापेक्शा थोडे पातळ करा.चमचाभर तेल घालुन चन्गले ढवळून घ्या.

कूकरमध्ये थोडे पाणी घेउन त्यात एक पाण्याने भरलेला वाडगा ठेवा.
कूकरच्या ड्ब्याला , आतुन तेलाचा हात लावून घ्या.
कूकर मोठया आचेवर गरम करायला ठेवा.

बेसनाच्या मिश्रणात ईनो घालुन मिश्रण चमच्याने चांगले फेटुन घ्या(१).
लगेचच कूकरच्या डब्यात ओतुन , डबा कूकरमध्ये ठेवा(२).कूकरवर मोठे ताट झाकण म्हणून ठेवा.

गरम तेलात हिन्ग , मोहरी घालून फोडणी करून घ्या.

२० मिनिटांनंतर कूकरखालचा गॅस बन्द करून झाकणी बाजूला काढून ठेवा(३).

थोड्या वेळाने कूकरचा डबा बाहेर काढून थंड करायला ठेवा.
त्यावर थंड फोडणी ओता.

ढोकळा थंड झाल्यावर, ओलं खोबरं आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन तुकडे पाडा (४)

अगदी लुसलुशित होतो असं नाही पण बर्यापैकी हलका होतो .

घरात ईनो आणि बेसन असलं तर पाहुणे कधीही येउदेत...... Happy

वाढणी/प्रमाण: 
खाणार्याच्या कपॅसिटीवर आणी बेसनाच्या वाटीच्या आकारावर अवलंबून :) .पण साधारणपणे ४ लोकांना पूरेसा होतो
अधिक टिपा: 

(१)मिश्रण किंचित फुगुन येत.
(२)ईनो घातल्यावर , मिश्रण कूकरमध्ये ठेवायला जितका जास्त वेळ लावाल तितका ढोकळा खप्पड बनेल.
(३)झाकणी तशीच राहीली तर शिजलेल्या ढोकळ्यात परत पाणि पडून ढोकळा ओलसर बनेल. ( मी २-३ वेळा केलं आहे म्हणून .... Happy )
(४)गरम ढोकळ्याचे तुकडे पाडता येत नाहित. "गरम असताना खोबरं घातलं आणि मग ढोकळा शिल्लक राहिला तर खराब होइल " ( ईति सा.बा.)

माहितीचा स्रोत: 
माझ्या सासुबाई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कूकरमध्ये थोडे पाणी घेउन त्यात एक पाण्याने भरलेला वाडगा ठेवा.>>>>>>> या वाड्ग्याच काय करायचं?

ढोकळ्याचे पीठ शक्यतो हातानेच मिसळावे...
ढोकळा कुकरमधुन किंवा अवनमधुन काढल्यावर लगेचच अर्धा ग्लास (किंवा त्यापेक्षा थोडे कमी - ढोकळ्याची साईझ पाहुन अंदाजाने) पाणी शिंपडावे...
फोडणीतच खोबरे आणि थोडे पाणी टाकुन थंड ढोकळ्यावर फोडणी ओतावी... ढोकळा एकदम स्पॉंजी होतो...
माहीतीचा स्रोत: माझी भाभी

ढोकळा कुकरमधुन किंवा अवनमधुन काढल्यावर लगेचच अर्धा ग्लास (किंवा त्यापेक्षा थोडे कमी - ढोकळ्याची साईझ पाहुन अंदाजाने) पाणी शिंपडावे...>>> साखरेचे पाणी शिंपडल्यास मस्त चव येते.