बाई माझी, ही तंगडी मोडली

Submitted by विदेश on 7 January, 2012 - 12:52

(चाल: बाई माझी, करंगळी मोडली )

ऐन दुपारी, नमुना फेरी,
गाडी नवी काढली - काढली
बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ ||

झणी मारून मी कट वळताना
कुठून अचानक आला श्वान हा
गुपचुप येऊन, पाठीमागून
माझी साडी ओढली || बाई माझी ...

समोर भुंके कसा आडवा
पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा
मी ओरडले, तिथेच पडले,
उठताना मोडली || बाई माझी ...

गुलमोहर: 

छान

व्वा काय मस्त विडंबन आहे ! गाडी नक्कीच दुचाकी असावी. बघा असा काही उल्लेख जुळवता येतोय का ?

कुत्र्याने साडी ओढली म्हणजे टु व्हीलर असन्याचेच चान्सेस जास्त.. फोर विलरमध्ये बसून दार बंद केले तर कुत्रा साडी कशी ओढेल?

टू व्हीलरच्या टेस्ट राईड्चा अनुभव.
जामोप्याना टू व्हीलर बरोबर जाणवली.
शिवाय कुत्र्याने पाय धरणे , 'मी' तिथेच पडणे , उठताना पाय मोडणे ह्या गोष्टी चार चाकीमधे मला तरी असंभवनीय वाटतात. इतका खुलासा पुरे ?