मासे ३९) इंग्लिश मासा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 January, 2012 - 04:56
english mase
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इंग्लिश मासे
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत. जर मासे मोठे असतील तर त्याच्या तुकड्या पाडाव्यात.

नंतर त्याला मिठ, हळद, मसाला, हवे असल्यास वाटण चोळून ठेवावे.

गॅसवर पॅन चांगला गरम करावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर पाच पाच मिनीटांनी उलथापालथ करून खरपूस तळून घ्याव्यात.

हे आहेत खरपूस तळलेले इंग्लिश मासे.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असा गैरसमज करून घेउ नये. Lol हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.
कोणाला ह्या माश्याचे खरे नाव माहीत असल्यास नक्की कळवा ह्या माश्यांच्या जमाती मार्फत त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल Happy
रस्सा करायचा असल्यास इतर रश्या प्रमाणे खोबर्‍याच्या वाटण घालून करता येतो.
माशाला चव चांगली असते.

माहितीचा स्रोत: 
भेट आलेले मासे व माहीती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच , माझे सासरे आणतात हे मासे .त्यांना खुप आवडतात . ते ह्यांना खाडीचे मासे म्हणतात , खाडीत सापडतात म्हणून Happy

सारीका भाषेचा म्हणावा की नावाचा ? Happy

नुतन म्हणजे ह्याचे नाव तुमच्या एरीयातही माहीत नाही.

प्रिती हो मराठी माणसांनी मराठीतच खायचे.

दक्षे तु पसंत केलीस म्हणजे रेसिपी पास झाली.

सेनापती मस्त नाव आहे एकदम.

मानुरुची, डॅफोडील्स, नन्ना, भाऊ किती नाव आली तुमच्याकडून, आता चिठ्ठ्याटाकाव्या लागतील बक्षिसासाठी. आणि बक्षिस मी नाही त्या माश्याची जमत देणार आहे हे वरती स्पष्ट लिहीले आहे, खात्री करुन घ्यावी Lol

<< बक्षिस मी नाही त्या माश्याची जमात देणार आहे हे वरती स्पष्ट लिहीले आहे, खात्री करुन घ्यावी >> अहो, त्या जमातीने मानवजातीवर आधीच इतके प्रचंड उपकार करून ठेवलेत; वर, त्याना 'नांवं ठेऊन' आम्ही शिवाय त्यांच्याकडूनच बक्षिसाचीही अपेक्षा करायची म्हणजे कृतघ्नतेचा कळसच !!! Wink

भाऊ , हि " काळून्द्री " नव्हेत. " तिलापिया " सारखीच तळ्यात, खाडीत , गोड्या पाण्यात सापडणारी ,तसेच पोयनाड , हाशिवरा , वाघ्रण या रायगड मधील गावात शेतात , कोल्हापुर ठीकाणी मी पाहिली आहेत. नाव तिलापिया असेच किंवा काही ठिकाणी " पालव " असे ऐकले आहे.

परदेसाई, जाई धन्यवाद.

अहो, त्या जमातीने मानवजातीवर आधीच इतके प्रचंड उपकार करून ठेवलेत; वर, त्याना 'नांवं ठेऊन' आम्ही शिवाय त्यांच्याकडूनच बक्षिसाचीही अपेक्षा करायची म्हणजे कृतघ्नतेचा कळसच !!!

भाऊ काटा अडकला घशात.

गुरुदास रायगड जिल्ह्यातील आहात का ?

<< भाऊ , हि " काळून्द्री " नव्हेत. >> गुरूदासजी, नसतीलही ; मला खूपच साम्य वाटलं, इतकंच.
<< या रायगड मधील गावात शेतात , कोल्हापुर ठीकाणी मी पाहिली आहेत >> मी अनेक वेळा रायगडात धरमतर खाडीजवळ असलेल्या माझ्या मित्राच्या घरी गेलो आहे, त्याच्या शेतातल्या छोट्या तळ्यातले चविष्ठ मासेही चाखले आहेत. त्याला नक्की माहित असेल या माशाचं स्थानिक नांव. विचारतो.
<< भाऊ काटा अडकला घशात. >> जागूजी, तुम्ही इतकी प्रतिष्ठा मिळवून दिलीय 'त्या' जमातीला कीं कांटा घशात अडकणं अशक्य आहे तुमच्या बाबतीत ! Wink

जागु ,
मी मालवण [ सिंधुदुर्ग] चा. पण वैद्यकीय सेवेसाठी त्या भागात काही दिवस होतो. त्यावेळी असे मासे खाल्ले आहेत.
भाऊ, काळुन्द्री थोडी मध्ये पसरट असतात.

भाऊ Happy

गुरुदास तसेच काळे मासे समुद्रातले मी मुरुडला पाहीले होते. त्याचे कोळणीने खडप्पालू असे नाव सांगितले.

<< बक्षिस मी नाही त्या माश्याची जमात देणार आहे >>>>>>> जागुतै बक्षिस म्हणुन एक सुरमई, दोन चार मोठे पापलेट, एक वाटा सफेद कोळंबी थोडी काळी खेकडी पाठवा म्हणावं त्यांना. Happy

नन्ना तुमचा निरोप सांगते.

अश्वे काढायची ग. कधी करतेयस ? Lol

Pages