सुगरण ( हजल )

Submitted by वर्षा_म on 6 January, 2012 - 03:48

मी "गझल रचना.... तरही गझल" मधे केलेली एकमेव हजल गुलमोहरात टाकतेय Happy

===========================================

सुगरण तुला उगीचच्,म्हणण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही

तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही

तू पापलेट केले,मज आवडे म्हणूनी
इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही

येता घरी अतीथी,व्यंजन हजार केले
ताटात सपक सारे,देण्यात अर्थ नाही

दिलि जाहिरात आता,ठेवीन खानसामा
बेहाल उदर आता,करण्यात अर्थ नाही

================

डॉ. कैलाश यांना स्पेशल धन्स दुरुस्तीसाठी Happy

गुलमोहर: 

ए अग ए
Angry
इत्का पण वाईट स्वयंपाक करत नाही मी
सुगरण नसले तरी "अशी" पण नाहीये मी Proud

Pages