डिंक--मेथी चे लाडु

Submitted by सुलेखा on 4 January, 2012 - 01:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नसघातले तरी चालते..लाडु साठी तुप गायीचे अथवा घरी लोण्यातुन कढवलेले असावे..अगदी शक्य नसेल तर बाजारचे तुप पुन्हा एकदा गरम करुन वापरावे..खाली दिलेल्या प्रमाणात मी सगळे जिन्नस घेतले आहेत..कमी-जास्त प्रमाण चालु शकते..
Dink-methi ladoo...JPG
साहित्यः--
१५० ग्राम मेथीची पुड..
ही पुड ,भिजेल इतके तुप घालुन २ दिवस पर्यंत भिजवुन ठेवावी..त्यानंतर च्या दिवशी लाडु करायचे आहेत..
१५० ग्राम/२ मुठ डि़क..डिंकाचे खडे बारीक करुन घ्यावे..
डिंक मावे.मधे १-१-१ मिनिट टाईम तुपाशिवाय -कोरडाच फुलवुन घेतला..मी घेतलेला डिंक अगदी बारीक होता..
१५० ग्राम मखाणे..हे दोनदा मावेत थोडे कुरकुरीत करुन घेतले..व त्याना हाताने चुरुन घेतले ..
१५० ग्राम बदाम..
१५० ग्राम काजु..
२५० ग्राम खारका..खारकेची बी काढुन खारीक पुड करुन घेणे..[खारीक गरम करायची नाही.]
सुके खोबरे-२ अर्ध्या वाटया किंवा १ पूर्ण गोळा.. सुके खोबरे किसुन मावेत परतुन घ्यावे..[१०-१०-१० सेकंद]
१०० ग्राम खसखस..मावेत गुलाबीसर परतुन याची बारीक पुड करुन घेणे..२ लहान चमचे भाजलेली कणीक घालुन वाटावी म्हणजे छान वाटली जाईल..
१ जायफळ व १२-१५ वेलची..
हे दोन्ही मावेत २० सेकंद गरम करुन त्याची पुड करुन घ्यावी..
२ वाटया कणीक व १ वाटी बेसन..हे तुपात वेगवेगळे खरपुस रंगावर भाजुन घ्यावे..
४ वाटया पिठीसाखर व १ वाटी गुळ..[हे प्रमाण आवडीप्रमाणे घ्यावे..]
या सगळ्या मिश्रणाचे लाडु वळण्या साठी गरम तुप..[अंदाजे पाउण किलो]
१ किलो तुपाचा एकुण अंदाज आहे..

क्रमवार पाककृती: 

साधारण पाऊण वाटी बदाम-काजु चे लहान तुकडे करावे .व उरलेल्याची पुड करावी..
मखाण्याची पुड करावी..
तुपात भिजवलेली मेथीपुड २ -३चमचे भाजलेली कणीक घालुन मिक्सरमधे फिरवुन घ्यावी..आता ही पुड मोकळी होईल..
खोबरे फक्त एकदाच मिक्सरमधे फिरवुन घ्यावे..
गुळ व ३-४ चमचे भाजलेली कणीक मिक्सरमधुन फिरवुन घ्यावी..
फुललेला डिंक व २-३ चमचे कणीक मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावा..
सगळे जिन्नस एका मोठया पातेल्यात एकत्र करावे वरुन गरम केलेले तुप टाकत ढवळत रहावे..लाडु वळण्याइतपत घट्ट झाले कि मध्यम आकाराचे लाडु वळावे..

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ९० लाडु झाले..
अधिक टिपा: 

लाडु केल्यावर दुसरे दिवशी मुरतो तेव्हा मेथीचा कडुपणा जाणवत नाही..
कडु लाडु आवडत असतील तर कणीक कमी घालावी..
बेसनाचा खमंग स्वाद वेगळा जाणवतो..
कणीक व बेसन घातल्याने [एखाद वेळेस]दोन खाल्ले तरी चालेल..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सासुबाई फार सुरेख करतात डिंकाचे लाडु. इतक्या वर्षात कधी पहायचा योग आला नाही, नुसता खायचाच आला. कृती विचारली तर मी असेपर्यंत मीच करणार म्हणतात. एकेक गंमत.
तर..

धन्यवाद सुलेखाताई. सध्या जमण्यासारखे नाही, पण कधी ना कधीतरी नक्की करुन पाहणार. Happy

आश,
घरात असलेले जिन्नस वापरुन कर..खारीक ऐवजी काही घेता येणार नाही..तसेच मी दिलेले सगळे जिन्नस घेतले पाहिजे असेही नाही..पुढच्या वेळेस खारीक घालुन कर..मी इतर वेळी खायला लाडु करते तेव्हा कणीक,बेसन व खारीक पुड २-१-१/२ या प्रमाणात घेवुन करते..आई ला स़काळ चा नाश्ता हा लाडु असतो..त्यात बदाम-काजु ही नसतात..वयापरत्वे थोडे तुप,खारीक [पौष्टीक्]अनायासे पोटात जाते व कणीक असल्याने बाधत नाही ..

खूपच छान रेसिपी आहे . थँक्स शेयर केल्या बद्दल . नक्की करुन बघनार . माझे फेवरेट आहेत हे लाडू Happy
प्रिया , माझ्या मते तरी द्यायला काही हरकत नाही . मि ही देते माझ्या पिल्लुला.

प्रिया ७,
पिल्लु ला एकावेळी अर्धा लाडु पर्यंत द्यायला हरकत नाही...किंवा त्याच्यासाठी काही लाडु, तिळाच्या लाडु च्या आकाराचे वळ..म्हणजे त्याला पुर्ण लाडु खाल्ल्याचे समाधान होईल..तसेच इतर वेळी खायला फक्त खारीक पुड-कणीक-बेसन घातलेले लाडु कर..खारीक हाडांच्या बळकटीसाठी,दातांसाठी,सर्दी होऊ नये म्हणुन गुणकारी आहे..

चंपी.जिन्नस कमी-जास्त असले [अथवा काही जिन्नस नसले]तरी चालते..सगळेच जिन्नस गुणकारीच आहेत..थंडीत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुपाबरोबर खाण्याची पुर्वापार प्रथा आहे..

१५० ग्राम मेथीची पुड..
ही पुड ,भिजेल इतके तुप घालुन २ दिवस पर्यंत भिजवुन ठेवावी.. >>> ही पुड कच्च्याच मेथ्यांची आहे की मेथी भाजुन घेऊन नंतर त्यांची पुड करायची आहे ?

वनराई, मेथी भाजुन घ्यायची नाही..कच्च्या मेथीचीच पुड ,तुप गरम करुन त्यात भिजवुन [पातळसर मिश्रण ]ठेवायची आहे..तुप थोडे जास्त असले तरी चालेल..मेथी भिजली कि मिश्रण घटट होते..

हो,साखर , गुळा पेक्षा गोड असते.त्यामुळे मेथीची कडु चव कमी होते..पण गुळ गुणकारी आहे म्हणुन गुळ तर हवाच..गुळ साखर ३:१ प्रमाणात घेतले तरी चालेल

मी हीच रेसीपी शोधत होते. धन्यवाद. मी केलेत छान झालेत. प्रमाण ;'घरात यातील ज्या ज्या वस्तु होत्या त्या घेतल्या. ते मखाणे म्हणजे काय ते नाही मिळाले. बाकी लाडु छान झालेत. फक्त वजनावर परिणाम नको व्हायला. धन्यवाद सुलेखा.